Leading International Marathi News Daily

शनिवार, २७ जून २००९

(सविस्तर वृत्त)

विद्यापीठ व महाविद्यालयीन सेवानिवृत्त प्रश्नध्यापकांची संघटना स्थापन ; निमंत्रकपदी डॉ. एम. ए. वाहुळ
औरंगाबाद, २६ जून/खास प्रतिनिधी

सेवानिवृत्त होणाऱ्या प्रश्नध्यापकांचे प्रश्न सोडविण्यासाठी विद्यापीठ व महाविद्यालयीन सेवानिवृत्त

 

प्रश्नध्यापक संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. या संघटनेच्या निमंत्रकपदी डॉ. एम. ए. वाहुळ यांची निवड करण्यात आली.
सेवानिवृत्त प्रश्नचार्य, विद्यापीठातील सेवानिवृत्त प्रमुख आणि सेवानिवृत्त प्रश्नध्यापकांची नुकत्याच झालेल्या बैठकीत सेवानिवृत्त प्रश्नध्यापकांचे प्रश्न प्रभावीपणे शासनासमोर मांडण्यासाठी विद्यापीठ व महाविद्यालयीन सेवानिवृत्त प्रश्नध्यापक संघटना स्थापण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
संघटनेच्या अस्थायी समितीचे सचिव म्हणून प्रश्नचार्य महम्मद शफी आणि कोषाध्यक्ष म्हणून प्रश्न. एस. बी. नाफडे यांची निवड करण्यात आली. प्रश्नचार्य डॉ. शरद अदवंत, प्रश्नचार्य डॉ. जे. एन. मंत्री, डॉ. डी. जी. धुळे, डॉ. पी. के. निकम, डॉ. के. जी. जोशी, डॉ. एम. डी. जहागीरदार, प्रश्न. ए. आर. कुलकर्णी, प्रश्न. ए. के. घाटे हे या अस्थायी समितीचे अन्य सदस्य आहेत. इच्छुकांनी ९८८१७७०९९५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन संघटनेने केले आहे.