Leading International Marathi News Daily

शनिवार, २७ जून २००९

(सविस्तर वृत्त)

जीवन शिक्षण माध्यमिक विद्यालयाचा निकाल १०० टक्के
धारूर, २६ जून/वार्ताहर

तालुक्यातील पिंपरवाडा येथील जीवन शिक्षण माध्यमिक विद्यालयाचा माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र

 

परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला आहे. या विद्यालयातून उषा तिडके ६९.५३ टक्के गुण घेऊन प्रथम आली आहे. तसेच उषा नागरगोजे (६६.३० टक्के) द्वितीय, तर नामदेव तिडके (६२.६१ टक्के) तृतीय आला आहे. या यशाबद्दल संस्थेचे सचिव ईश्वर मुंडे, अध्यक्ष विजयकुमार मुंडे आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
जिल्हा परिषदेचा २२ टक्के निकाल
एकेकाळी नावाजलेली शाळा म्हणून जिल्हा परिषद माध्यमिक शाळा ओळखली जात होती. मात्र या वेळी शाळेचा फक्त २२ टक्के निकाल लागला आहे. एकूण १२६ विद्यार्थ्यांपैकी २९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
हुतात्मा विद्यालयाचा ९२.५० टक्के निकाल
शहरातील हुतात्मा पापासिंग विद्यालयाचा निकाल ९२.५० टक्के एवढा लागला आहे. शाळेतील अमरदीप कांबळे (९०.७६- प्रथम), प्रशांत सुर्यवंशी (८९.०७- द्वितीय), वैभव फरके (८८.१७- तृतीय) हे विद्यालयात सर्वाधिक गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.
जनता विद्यालयाचा ५८ टक्के निकाल लागला असून दीपाली फुन्न्ो (८५.०७) प्रथम, तर विशाल सेदवाड (८१.०६) द्वितीय आला. सरस्वती विद्यालयाचा ४७ टक्के निकाल लागला आहे. शाळेतील प्रश्नजक्ता काळे (८७ टक्के) प्रथम, प्रशांत गुन्हाल (७५ टक्के) द्वितीय आला आहे.