Leading International Marathi News Daily

शनिवार, २७ जून २००९

जलधारांनी मुंबईकर सुखावले; मुंबईतील काही भाग जलमय
प्रतिनिधी
मुंबईत मान्सून पोहोचल्यानंतर कोसळलेल्या पहिल्याच मुसळधार पावसाने आज मुंबईतील अनेक भाग जलमय झाले. ग्रॅन्टरोड, दादर, प्रभादेवी, लालबाग आदी भागांसह मुंबईतील सखल भागांत पाणी साचले होते. मात्र विलंबाने का होईना, पण दमदार हजेरी लावणाऱ्या पावसामुळे मुंबईकर सुखावले. तरुणाईने कॉलेजला बुट्टी मारून समुद्रकिनारी धाव घेतली आणि पावसात भिजण्याचा मनमुराद आनंद लुटला.

‘यू आर ग्रेट, सर’!
प्रतिनिधी

सुमारे १३ वर्षापूर्वी मायकल जॅक्सनचा कार्यक्रम मुंबईत झाला होता. त्याच कार्यक्रमात मुंबईतील काही जणांनी परफॉर्मन्स केला होता. त्यापैकीच एक म्हणजे गिरगावातील सचिन माने. त्या कार्यक्रमात सचिनने चार्ली चॅप्लिनची नक्कल केली होती. आपला परफॉर्मन्स पेश केल्यानंतर सचिन ग्रीनरूममध्ये बसला होता. तेवढय़ात मायकलचा बॉडीगार्ड सचिनला शोधत तेथे आला. आधी सचिनला वाटले की, आपल्याकडून काही चूक झाली की काय? तो अंगरक्षक सचिनला रंगमंचाच्या दुसऱ्या बाजूला घेऊन गेला. चक्क मायकल जॅक्सनने सचिनला बोलावून घेतले होते.

अल्पसंख्याक महाविद्यालयात खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाही अर्जविक्री
प्रतिनिधी

अकरावी प्रवेशामध्ये अल्पसंख्याक महाविद्यालयांनी संबंधित अल्पसंख्याक प्रवर्गासाठी राखीव असलेल्या ५० टक्के जागांवर संस्थास्तरावर प्रवेश देण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या होत्या. पण काही महाविद्यालयांनी या सूचनांचा गैरफायदा घेतला असून खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांनाही अर्ज विक्री केली आहे.

अभिन्यासातील घोळ आणि म्हाडाचा आक्षेप
याच स्तंभात १३ जून रोजी प्रसिद्ध झालेल्या ‘अभिन्यासाचा घोळ’ या लेखातील आठ संदर्भाचा म्हाडाच्या जनसंपर्क अधिकारी श्रीमती र. ल. सावंत यांनी खुलासा केला आहे. ‘वास्तुरचनाकार विभागातील एका वास्तुरचनाकाराच्याच फाईली निकालात काढल्या जातात, अशी चर्चा आहे. मात्र त्यास अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही, या उल्लेखाबाबत आक्षेप घेतला आहे.

ज्या क्षेत्रात जाल तेथे प्रश्नवीण्य मिळवा - रांगणेकर
प्रतिनिधी

सध्याचे युग स्पर्धात्मक असल्यामुळे विद्यार्थ्यांपुढे आव्हान उभे राहिले आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी ज्या क्षेत्रात प्रवेश केला आहे, त्यातच प्रश्नविण्य मिळवावे, असे उद्गार सारस्वत बँकेचे उपाध्यक्ष किशोर रांगणेकर यांनी अलीकडेच येथे काढले.

मालाड शिधावाटप कार्यालयाच्या गैरकारभाराने नागरिक हैराण
प्रतिनिधी
दिंडोशी ते कांदिवली या मोठय़ा क्षेत्राकरिता शिधापत्रिका वितरित करणाऱ्या मालाड पश्चिम येथील ४३ ग या शिधावाटप कार्यालयातील गैरकारभाराने या विभागातील नागरिक भयंकर संत्रस्त झाले आहेत. नवी शिधापत्रिका मिळण्यासाठी तसेच शिधापत्रिकेसंबंधातील अन्य कुठल्याही कामासाठी तब्बल दोन ते तीन महिने लागत असल्याने आणि त्यासाठीही सतत खेपा घालून आठ ते दहा वेळा रस्त्यावर उन्हातान्हात रांगा लावाव्या लागत असल्याने आणि तरीही काम होईल याची शाश्वती नसल्याने लोक कमालीचे हैराण झालेले आहेत.

भारत-रशिया ऋणानुबंधांना ५०० वर्षाची परंपरा
जयंत धुळप

भारत-रशिया या दोघांमध्ये प्रथमच स्नेहधागा जोडण्यासाठी ५३९ वर्षापूर्वी भारतात चौल-रेवदंडा बंदरात आलेले पहिले रशियन प्रवासी अफनासी निकीतीन यांच्याबद्दल आम्हाला नितांत आदर असून, भारत आणि रशिया या देशांमध्ये त्यांनी निर्माण केलेले नाते अद्वितीय आहे, अशी अत्यंत आदरयुक्त भावना कल्चरल सेंटर ऑफ रशियाचे नूतन व्हाइस कॉन्सूल व डायरेक्टर व्लादीमीर विक्टरोविच दिमेन्तिएव यांनी येथे ‘वृत्तान्त’शी बोलताना व्यक्त केली आह़े

आज मदन मोहन स्मृती कार्यक्रम
प्रतिनिधी

स्वरगंधार प्रतिष्ठानतर्फे स्व. मदन मोहन यांच्या सुरेल संगीताच्या स्मृती जागवण्यासाठी शनिवार २७ जून रोजी रात्री ८.३० वाजता दीनानाथ मंगेशकर नाटय़गृहात ‘ए म्युझिकल ट्रिब्युट टू मदनमोहन’ या वाद्यवृंद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सोनाली कर्णिक, अर्चना गोरे, ऋषिकेश रानडे, नेहा वर्मा गाणार असून ज्येष्ठ गायक भूपींदर आणि मिताली सिंग यांचा विशेष सहभाग असेल. मदन मोहन यांनी स्वरबद्ध केलेली पण अप्रकाशित गाणीही या वेळी ऐकायला मिळणार आहेत.

अभिनव विज्ञान चाचणी
प्रतिनिधी

लोकविज्ञान संघटनेतर्फे ‘युरेका-२००९’ ही अभिनव विज्ञान चाचणी आयोजित करण्यात येत आहे. यामध्ये इयत्ता आठवी ते १० वीच्या विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल. या चाचणीत भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी क्रमिक पुस्तके, ठराविक प्रयोग यांच्या पलीकडे जाऊन स्वत:चे निरिक्षण, वेगळे प्रयोग, विद्यार्थी मित्र, शिक्षक-पालक व तज्ज्ञ यांच्याशी चर्चा करून उत्तरे शोधावीत अशी अपेक्षा आहे.
युरेकाची चाचणी तात्काळ उत्तरांच्या कोडय़ाच्या स्वरुपात नाही, तो एक महिन्यात विचारविनिमय करून पूर्ण करण्याचा प्रकल्प आहे. उत्तरपत्रिका पाठविण्याची अंतिम तारीख ३१ जुलै आहे. ‘युरेका-२००९’च्या अधिक माहितीसाठी दू. क्र. २५४५२२४०, २५४३७०९५, मो. क्र. ९८९०८८२७१२ वर संपर्क साधावा. अथवा www.lokvidnyan.org या संकेतस्थळाला भेट द्यावी.