Leading International Marathi News Daily

शनिवार, २७ जून २००९

नवनीत

जी व न द र्श न
पती आणि पत्नी

 

एकदा भगवंत मदुरा आणि निरंजना यांच्यामधील राजरस्त्याने चालले होते. या रस्त्यावर त्यांना पुष्कळ गृहस्थ व त्यांच्या पत्नी भेटल्या.तेव्हा भगवंतांनी रस्ता सोडून एका झाडाखाली आसन स्वीकारले. गृहस्थ आणि त्यांच्या पत्नींनी त्यांना अशा रीतीने स्थानापन्न झाल्याचे पाहिले. ते सर्व भगवंताजवळ आले. त्यांनी भगवंतांना अभिवादन केले आणि जवळच बसून त्यांना विचारले, ‘पती-पत्नींतील सुयोग्य संबंध कोणता?’ यावर भगवंतांनी त्यांना उत्तर दिले. ‘‘हे गृहस्थ हो, पती-पत्नींना चार प्रकारे एकत्र राहता येते. दुष्ट पुरुष दुष्ट स्त्रीबरोबर राहत असेल. दुष्ट पुरुष देवतेबरोबर राहत असेल. सत्पुरुष दुष्ट स्त्रीबरोबर राहत असेल आणि कदाचित सत्पुरुष एखाद्या देवतातुल्य स्त्रीबरोबर राहत असेल.’’ ‘‘गृहस्थ हो! दुष्ट पुरुषाचे जीवन म्हणजे हत्या, चोरी, अपवित्रता, असत्- भाषण, मद्यपान, दुष्ट आणि पापी वर्तणूक, मोहाविष्ट मन आणि सत्पुरुषांची निंदा याने भरलेले असते आणि त्याच्या दुष्ट स्त्रीचे जीवनही तद्वतच असते. अशा प्रकारे सद्गृहस्थहो, दुष्ट पुरुष दुष्ट स्त्रीबरोबर जीवन व्यतीत करीत असतो.’’ ‘‘गृहस्थ हो, दुष्ट पती आणि देवतातुल्य पत्नी यांच्या जीवनात पती वर सांगितल्याप्रमाणे वर्तत असतो; परंतु पत्नी हत्या, चोरी, व्यभिचार, असत्य भाषण, मद्यपान यापासून परावृत्त असते. तिची वर्तणूक सद्गुणी आणि हितकर असते. अंत:करण मोहाधीन नसते. ती आपल्या कौटुंबिक जीवनात सद्गुणी माणसांची निंदा करीत नाही किंवा त्यांना उद्देशून अपशब्द बोलत नाही. याप्रमाणे गृहस्थ हो, दुष्ट मनुष्य देवतातुल्य पत्नीसह राहत असतो. गृहस्थ हो सज्जन, देवतुल्य पुरुष आणि दुष्ट पत्नी यांचे जीवन असे असते. या जीवनात पती हत्या, चोरी, व्यभिचार, असत्य भाषण, मद्यपान यांपासून परावृत्त होऊन राहतो. त्याची वागणूक गुणयुक्त व हितकर असते. मोहाधीन होऊन आपल्या कौटुंबिक जीवनात तो सद्गुणी पुरुषांची कधी निंदा करीत नाही किंवा त्यांना उद्देशून अपशब्द बोलत नाही. परंतु त्याची पत्नी मात्र वर वर्णिलेल्या दुष्ट स्त्रीसारखी वागत असते. ‘‘गृहस्थ हो, चौथ्या प्रकारची पती-पत्नी जीवनात जणू काय देव, देवतेबरोबर राहत आहे, अशी वागतात. कारण ते दोघेही पती-पत्नी हत्या, चौर्यकर्म, असत्य-भाषण, व्यभिचार, मद्यपान यांचा आपल्या वर्तनाला स्पर्श होऊ देत नाहीत आणि मोहाधीन होऊन सत्पुरुषांच्या निंदेने आपली जीभ विटाळीत नाहीत.’’ ‘गृहस्थ हो, पती-पत्नीच्या एकत्र जीवनाचे असे चार प्रकार आहेत.’ एके समयी भगवंत श्रावस्ती येथील जेतवनातील अनाथ पिंडिकाच्या विहारात राहत होते. त्या वेळी मध्यरात्र उलटल्यानंतर आपल्या तेजाने जेतवन दीप्तिमान करीत एक देव भगवंतांच्या जवळ आला आणि त्यांच्या सन्निध जाऊन आदराने त्यांना अभिवादन करून बाजूला उभा राहिला आणि भगवंतांना उद्देशून पुढील श्लोक म्हणाला-‘‘गौतमा, मी तुला अध:पतन पावणाऱ्या माणसाविषयी काही प्रश्न करणार आहे. कृपा करून अध:पतनाची कारणे काय असतात ते मला सांग!’’ भगवंतांनी ती सांगण्याचे मान्य केले आणि ते म्हणाले, कोणाची उन्नती होत आहे आणि कोण अधोगतीला जात आहे हे सहज समजण्यासारखे आहे. धर्मप्रेमी हा उन्नतपथावर, तर धर्मद्वेष्टा हा अधोगतीच्या पथावरील वाटसरू आहे.
‘‘अधोगतीच्या वाटसरूला दुर्गुणी माणसे प्रिय वाटतात आणि सद्गुणी माणसे अप्रिय वाटतात. त्याची दुर्गुणी माणसांवर श्रद्धा असते हे त्याच्या अधोगतीचे दुसरे कारण होय.’’
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
(बुद्ध आणि त्यांचा धम्म)

कु तू ह ल
प्रतिपदार्थ
प्रतिपदार्थ (अँटीमॅटर) म्हणजे काय?
प्रतिपदार्थाची संकल्पना इ.स. १९३० सालच्या सुमारास अस्तित्वात आली. पॉल डिरेक या इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञाने विद्युत आणि चुंबकीय क्षेत्रातील इलेक्ट्रॉनच्या गतिसंबंधिचे सापेक्षतावादावर आधारलेले सूत्र मांडले. या सूत्रांतून हिरेक याला इलेक्ट्रॉनसारखेच गुणधर्म असलेल्या पण घन विद्युतभार असलेल्या कणाच्या अस्तित्वाची शक्यता आढळून आली.अशा कणाचा प्रत्यक्ष शोध इ. स. १९३२ साली कार्ल अँडरसन या अमेरिकन शास्त्रज्ञाने लावला आणि याला पॉझिट्रॉन हे नाव दिले गेले. हाच पहिला जात प्रतिपदार्थ इ. स. १९५५ साली अमेरिकेतील कॅलिफोíनया विद्यापीठात ॠण विद्युतभार असलेला प्रोटोनचा प्रतिकण निर्माण केला गेला. इ. स. १२९९५ साली सर्न या स्विट्झलँडमधिल प्रयोगशाळेत प्रतिप्रोटोन आणि पॉझिट्रॉन यांनी मिळून तयार झालेल्या प्रतिहायझेजनच्या अणुंची निर्मिती करण्यात शास्त्रज्ञांना यश आले.
पदार्थ आणि प्रतिपदार्थ एकत्र आल्यावर ते त्वरीत नष्ट होऊन त्यांचे गामा किरणांच्या स्वरुपातील उर्जेत रुपांतर होते. आपले विश्व हे प्रामुख्याने पदार्थापासून तयार झाले आहे. विश्वनिर्मितीनंतर पदार्थ हे प्रतिपदार्थाच्या तुलनेत किंचितशा अधिक प्रमाणात निर्माण झाले असावेत. पदार्थाच्या संपर्कात आल्यावर, विश्वातले सर्व प्रतिपदार्थ हे नष्ट होऊन फक्त अतिरिक्त ‘पदार्थ’ मागे उरलेअसावेत, दुसऱ्या एका सिद्धांतानुसार पदार्थ आणि प्रतिपदार्थाचे गुणधर्म हे वेगळे असू शकतात. त्यामुळे पदार्थ आणि प्रतिपदार्थ हे अगदी सारख्या प्रमाणात निर्माण झाले असले तरी एकमेकांच्या संपर्कात आल्यावर प्रतिपदार्थ हे पूर्णपणे नष्ट होऊन, पदार्थ हे काही प्रामाणात मागे उरले असावेत. प्रतिपदार्थापासून दीíघकाही तयार होऊ शकतात. अशा दीíघका इतर दीíघकांपेक्षा वेगळ्या दिसणार नाहीत. परंतु आजूबाजूच्या पदार्थाच्या संपर्कात आल्यामुळे त्यांच्याकडून लक्षणीय प्रमाणात गामा किरणंचं उत्सर्जन व्हायला हवे. अशी प्रारणे काही आपल्या निरिक्षणांत आलेली नाहीत.
अरिवद परांजपे
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

दि न वि शे ष
सॅम माणेकशॉ
भारतीय लष्करात ‘फिल्ड’ हा किताब आतापर्यंत फक्त दोनच व्यक्तींना मिळाला. एक जनरल करिअप्पा आणि मार्शल सॅम होर्मसजी फ्रामजी जमशेटजी माणेकशॉ. त्यांचा जन्म ३ एप्रिल १९१४ रोजी अमृतसर येथे झाला. डेहराडून येथील भारतीय लष्करी अकादमीच्या पहिल्या बॅचचे ते विद्यार्थी. शिक्षण पूर्ण झाल्यावर सेकंड लेफ्टनंट या पदावर ते रुजू झाले. तो काळ दुसऱ्या महायुद्धाचा होता. ब्रिटिश इंडियाच्या लष्करातून जपान्यांशी लढताना त्यांच्या पोटात गोळ्या घुसल्या. आणि काही क्षणात हा जवान मरणार म्हणून मेजर कोवेत यांनी स्वत:च्या गणवेशावरचा मिलिटरी क्रॉस त्याच्या गणवेशावर खोचला. ‘मृताला हा क्रॉस बहाल करण्याचा सन्मान दिला जात नाही. हे मेजर यांचे शब्द त्या अवस्थेतही त्यांच्या कानात भिनले. ही घटना त्यांचा जीवनालाच नव्हे तर जिवालाही कलाटणी देणारी ठरली. आणि आपण जगलेच पाहिजे, ही प्रबळ इच्छाशक्ती त्यांच्यात निर्माण झाली. ते जगले आणि मग घडवला इतिहास १९७१च्या लढाईचा. १९६९ च्या सुमारास देशाचे लष्कर प्रमुख म्हणून त्यानी सुत्रे हाती घेतली. तेव्हा पूर्व पाकिस्तानातून म्हणजे आताच्या बांगलादेशातून लाखोच्या संख्येने लोंढे भारतात आले होते. त्यांच्यावर पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या अत्याचारामुळे पंतप्रधान इंदिरा गांधींनी सैन्याला युद्धाचा आदेश दिला. पुढे युद्धजिंकल्यावर फिल्ड मार्शल माणेकशॉ लोकप्रियतेच्या कळसावर होते. पद्मभूषण, पद्मविभूषण यासारखे सन्मान मिळालेले सॅम माणेकशॉ लष्करातून निवृत्ती पत्करल्यावर तामिळनाडूत स्थायिक झाले. अखेरचा श्वास घेण्यापूर्वीही ‘आय एम ओके’ असे ते म्हणाले होते. वयाच्या ९४व्या वर्षी २७ जून २००८ रोजी त्यांची प्राणज्योत मावळळी.
संजय शा. वझरेकर

गो ष्ट डॉ ट कॉ म
क्षेमूरचं फिरणं
त्याचे नाव तैमूर, एका पायानं किंचित लंगडायचा म्हणून फारच कटकट करायचा. सारखा दु:खी असायचा, खरं तर छान शुभ्र पांढरा रंग त्यावर काळे ठिपके. किती देखणा दिसायचा, पण त्याला सारखं वाटायचं कुत्र्याच्या जन्माला घालून आपल्यावर फार मोठा अन्याय करण्यात आला आहे. दु:खानं कुढायचा आणि शरीरानं खंगायचा.
एकदा तैमुरला फिरायला जाताना आमच्या सावलीला निवांत झोपलेली मांजर दिसली. काय सुखी प्राणी आहे. कसली काळजी नाही. पडलीय मजेत. तैमुर आणखीनच खिन्न झाला. निरुत्साहीपणे तो तलावाच्या कोपऱ्याशी अंगावर वाऱ्याच्या पाण्यावरून येणाऱ्या थंड झुळूका घेत जरासा लवंडला. तलावातले मासे पाण्यात त्याच्या बाजूला आले आणि आपसात बोलू लागले. तैमुरने लगेच कान टवकारले. मासा दुसऱ्याला म्हणाला, ‘आपल्या नशिबी फक्त पाणी. हा बाहेर िहडतो, पाण्यातही पोहतो. शिवाय आपल्यासारखं कोळ्यांच्या जाळ्यात सापडण्याची भीतीही नाही. नशिबावान आहे. बेटा!तैमूर उटलातलावातला पाणी जाऊन लपालपा प्यायला. घरच्या मार्गाला लागत वरील झाडावरच्या इवल्या चिमणीची चिवचिव कानावर पडली म्हणून थबकला. ‘अग छोटय़ा चिमणे, तो कुत्रा पाहिलस का? कसा मजेत चाललाय मेला. कसलीही भीती नाही त्याला. आपण कुठं असं जमीनीवर चालू शकतो. लगेच कुणीतरी प्राणी झडप घालेल अन् पकडेल. अगदी ऐटीत चाललय’ दुसरी चिमणी म्हणाली , बरोबर आहे. त्याला आपल्या सारख कान टिपत फिरावं नाही लागत. सगळ आयतं मिळतं. घर सुद्धा न बांधताच मिळत त्याला आपण मात्र जरा जमिनीवर बसलो की याचे जातभाई पकडायला टपलेले असतात. चिमण्यांची चिवचिव ऐकून तैमूर हसला. तेवढय़ात त्याला पुन्हा मांजर दिसली. त्याला पाहून म्हणाली, ‘‘कायतोस रे. मालकाकडून खायलाप्यायला वेळेत मिळत म्हणून ते टेकोजीरावासारखा फिरतोस चैनीत उंदरांना मारून आम्ही माणसांची सेवा करतो, पण बदल्यात काय? खायला मिळतय का म्हणून घरात फिरलं तर पाठीत बडगाच बसतो. आमच्या.
मांजराचं पुढचे बोणलणं ऐकायला तैमूर थांबलाच नाही. पण त्यानंतर त्यानं कधी तक्रार म्हणून केली नाही.
प्राप्त परिस्थितीवर चिडचीड करण्यात अर्थ नसतो. तिच्यावर मात करावी, मात करता येत नसेल नसेल तर निदान त्रागा करू नये.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com