Leading International Marathi News Daily

शनिवार, २७ जून २००९

क्रीडा
(सविस्तर वृत्त)

फ्लिन्टॉफ फॉर्मात
लंडन, २६ जून, वृत्तसंस्था

 

इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू अ‍ॅन्ड्रय़ू फ्लिन्टॉफ अ‍ॅशेस मालिकेपूर्वी फॉर्मात आलेला आहे. इंग्लंडच्या काऊंटी क्रिकेटमधील ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत त्याने फक्त ४१ चेंडून ९६ धावांची वादळी खेळी साकारली. २००५ च्या अ‍ॅशेस मालिकेमध्ये इंग्लंडने ऑस्ट्रलियाला पराभूत केले होते. यावेळी फलंदाजी आणि गोंलंदाजीमध्ये फ्लिन्टॉफने चमकदार कामगिरी केली होती. त्यावेळी कर्णधार असलेल्या मायकेल वॉनने विजयाचे श्रेय फ्लिन्टॉफला दिले होते. त्यावेळी ऑस्ट्रेलियानेही त्याचा चांगलाच धसका घेतलेला होता. त्यामुळे यंदाच्या अ‍ॅशेस मालिकेतही ऑस्ट्रेलियाच्या रडारवर फ्लिन्टॉफ असेल यात शंकाच नाही. त्यामुळे अ‍ॅशेस मालिकेपूर्वी फ्लिन्टॉफ फॉर्मात येणे हे इंग्लंडच्या संघसाठी महत्वाचे होते. गेल्या काहि सामन्यंमध्ये फ्लिन्टॉफला सूर गवसलेला नव्हता. त्याचबरोबर दुखापतीनेही तो पुरता हैराण झालेला होता. त्यामुळे या खेळीने त्याचे मनोधैर्य चांगलेच उंचावलेले असेल. डर्बीशायरविरूद्ध ट्वेन्टी-२० सामना खेळताना फ्लिन्टॉफने ४१ चेंडूत नऊ चौकार आणि सहा षटकारांच्या सहाय्याने ९३ धावा फटकाविल्या. त्याच्या या खेळीच्या जोरावर लॅंकेशायरला सहा विकेट्सच्या मोबदल्यात सर्वाधिक २२० धावा करणे शक्य झाले.