Leading International Marathi News Daily

शनिवार, २७ जून २००९

(सविस्तर वृत्त)

सनदी लेखापालांच्या संस्थेचा आज हीरक महोत्सव
ठाणे/प्रतिनिधी - इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियाच्या पश्चिम विभागीय

मंडळाच्या ठाणे शाखेतर्फे इन्स्टिटय़ूटचे हीरक महोत्सवी वर्ष साजरे केले जात असून यानिमित्ताने शनिवार, २७ जून रोजी गडकरी रंगायतन, ठाणे येथे विशेष कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय समितीच्या सदस्या भावना दोषी या अध्यक्षस्थान भूषविणार असून, विभागीय मंडळाचे अध्यक्ष जैन हेदेखील उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठाणे शाखेच्या महिला विभागाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अंतर्गत सकाळी ८.३० ते १२.०० दरम्यान वामनराव ओक रक्तपेढी यांच्या सहयोगाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच कार्यक्रमानंतर प्रसिद्ध गायिका मृदुला दाढे-जोशी व गायक विनायक जोशी यांचा गायनाचा कार्यक्रम होणार आहे. हा संपूर्ण कार्यक्रम चार्टर्ड अकाऊंटंट्स, त्यांचे कुटुंबीय व सीए करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असेल.
या कार्यक्रमामध्ये ठाणे क्षेत्रातील वरिष्ठ चार्टर्ड अकाऊंटंट्स, तसेच सीएच्या परीक्षेत विशेष कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष संजीव ब्रrो यांनी सांगितले.
इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियाच्या पश्चिम विभागीय मंडळाच्या ठाणे शाखेची स्थापना २६ जानेवारी २००६ रोजी झाली. ठाणे शाखेअंतर्गत २,९०० सभासद व ९,००० विद्यार्थी आहेत. या शाखेअंतर्गत दोन संगणक प्रशिक्षण केंद्र आहेत. एक ठाण्यात, तर एक डोंबिवली येथे आहे. ठाणे शाखेअंतर्गत सहा अभ्यासवर्ग आहेत, त्यापैकी दोन ठाणे येथे व प्रत्येकी एक डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर आणि भिवंडी येथे आहेत. दि इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडिया, ठाणे शाखेतर्फे विविध कार्यशाळा, सेमिनार व सभांचे आयोजन केले जाते. ठाणे शाखेतर्फे गेली तीन वर्षे सभासदांसाठी आंतरराष्ट्रीय अभ्यास दौऱ्यांचे आयोजन करण्यात येते. ल्ल सनदी लेखापालांच्या संस्थेचा आज हीरक महोत्सव
ठाणे/प्रतिनिधी - इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियाच्या पश्चिम विभागीय मंडळाच्या ठाणे शाखेतर्फे इन्स्टिटय़ूटचे हीरक महोत्सवी वर्ष साजरे केले जात असून यानिमित्ताने शनिवार, २७ जून रोजी गडकरी रंगायतन, ठाणे येथे विशेष कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय समितीच्या सदस्या भावना दोषी या अध्यक्षस्थान भूषविणार असून, विभागीय मंडळाचे अध्यक्ष जैन हेदेखील उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठाणे शाखेच्या महिला विभागाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अंतर्गत सकाळी ८.३० ते १२.०० दरम्यान वामनराव ओक रक्तपेढी यांच्या सहयोगाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच कार्यक्रमानंतर प्रसिद्ध गायिका मृदुला दाढे-जोशी व गायक विनायक जोशी यांचा गायनाचा कार्यक्रम होणार आहे. हा संपूर्ण कार्यक्रम चार्टर्ड अकाऊंटंट्स, त्यांचे कुटुंबीय व सीए करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असेल.
या कार्यक्रमामध्ये ठाणे क्षेत्रातील वरिष्ठ चार्टर्ड अकाऊंटंट्स, तसेच सीएच्या परीक्षेत विशेष कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष संजीव ब्रrो यांनी सांगितले.
इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियाच्या पश्चिम विभागीय मंडळाच्या ठाणे शाखेची स्थापना २६ जानेवारी २००६ रोजी झाली. ठाणे शाखेअंतर्गत २,९०० सभासद व ९,००० विद्यार्थी आहेत. या शाखेअंतर्गत दोन संगणक प्रशिक्षण केंद्र आहेत. एक ठाण्यात, तर एक डोंबिवली येथे आहे. ठाणे शाखेअंतर्गत सहा अभ्यासवर्ग आहेत, त्यापैकी दोन ठाणे येथे व प्रत्येकी एक डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर आणि भिवंडी येथे आहेत. दि इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडिया, ठाणे शाखेतर्फे विविध कार्यशाळा, सेमिनार व सभांचे आयोजन केले जाते. ठाणे शाखेतर्फे गेली तीन वर्षे सभासदांसाठी आंतरराष्ट्रीय अभ्यास दौऱ्यांचे आयोजन करण्यात येते.