Leading International Marathi News Daily

शनिवार, २७ जून २००९

(सविस्तर वृत्त)

दहावीच्या परीक्षेत विनायक कडू व केदार पाटील शहापूर तालुक्यात प्रथम!
शहापूर/वार्ताहर - दहावीच्या परीक्षेत वासिंदच्या जी. के. गुरुकुल विद्यालयाचा विनायक रमेश कडू

 

व शहापूरच्या जनकल्याण विद्यालयाचा केदार नरेश पाटील या दोघांनी प्रत्येकी ९२.६१ टक्के गुण मिळवून शहापूर तालुक्यात सर्वप्रथम येण्याचा मान मिळविला आहे.
तालुक्यातून परीक्षेस बसलेल्या तीन हजार ५९३ विद्यार्थ्यांपैकी दोन हजार ६९१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून तालुक्याचा ७४.९० टक्के निकाल लागला आहे. तालुक्यात द्वितीय येण्याचा मान खाडे विद्यालयाचा ओमप्रकाश शिर्के याने ९२.३० टक्के गुण प्रश्नप्त करून मिळविला आहे. वासिंदच्या सरस्वती विद्यालयाची स्नेहल सीताराम चासकर हिने ९२.१५ टक्के गुण मिळवून तालुक्यात तिसरी आली आहे.
शहापूरच्या ग. वि. खाडे विद्यालयाचा ७४.७९ टक्के इतका निकाल लागला असून ओमप्रकाश शिर्के (९२.३०) हा विद्यालयात प्रथम व तालुक्यात तृतीय आला आहे. भाग्यश्री तानाजी गणपाटील व नयन मारुती दांडकर यांनी ९२ टक्के गुण मिळवून द्वितीय तर श्रीरंग शिवाजी भगत ९१.९३ टक्के गुण मिळवून विद्यालयात तृतीय आला आहे.
शहापूरच्या पी. एस. देशमुख इंग्लिश स्कूलचा निकाल १०० टक्के लागला असून स्वप्नाली रमेश घेगडे ९१.८४ टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम आली आहे, तर समीर नंदकुमार शेलवले याने ८३.२३ टक्के मिळवून तृतीय येण्याचा मान मिळविला आहे.
जनकल्याण विद्यालयाचा ८८.१४ टक्के निकाल लागला. योगेश शिवराम बुंदे व भाग्यश्री संतोष वेखंडे ९०.९२ टक्के गुण मिळवून द्वितीय आले आहेत. नीलम सातपुते (८९.३८) तृतीय आली आहे.
वासिंदच्या सरस्वती विद्यालयाचा ७६.४९ टक्के निकाल लागला असून स्नेहल चासकर ९२.१५ टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम आली आहे. श्रद्धा सुरळकर हिने ९१.८४ टक्के गुण मिळवून द्वितीय तर सुशील चासकर ९१.६९ टक्के गुण मिळवून तृतीय आला आहे. जी. के. गुरुकुल विद्यालयाचा ९८.२४ टक्के इतका निकाल लागला. जयेश विदे (८९.०७) द्वितीय तर भूपेश लोणे (८७.६९) हा तृतीय आला आहे. खातिवलीच्या न्यू इंग्लिश स्कूलचा १०० टक्के निकाल लागला असून सायली महाजन हिने ९०.३० टक्के गुण मिळवून प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. हर्षल रोठे (९०.१५) द्वितीय तर अनिकेत महाजन (८९.३८) तृतीय आला आहे.
ठुणे विभाग शारदा विद्यालयाचा ८६.५६ टक्के इतका निकाल लागला असून गणेश शिर्के याने ८९.५३ टक्के गुण मिळवून विद्यालयासह संपूर्ण किन्हवली, डोळखांब या ग्रामीण भागातून प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. नीलेश केदार (७७.०७) हा द्वितीय तर मयूर फर्डे (७५.६९) हा तृतीय आला आहे. किन्हवलीच्या शहा चंदुलाल विद्यालयातून प्रियंका शंकर धोदडे हिने ८८.९२ टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. वैभव यशवंतराव (८६.१५) द्वितीय तर अमेय सोनार (८५.०७) तृतीय आला आहे. विद्यालयाचा ८६.२० टक्के निकाल लागला आहे. सोगाव विद्यालयाचा ८४ टक्के निकाल लागला असून तुषार मुरबाडे (८७.०७) हा प्रथम आला आहे. सागर निमसे (८५.६९) द्वितीय तर जयेश धानके (८४.९२) तृतीय आला आहे.
शेणवा हायस्कूलचा ८१.६३ टक्के निकाल लागला असून अभिजीत चौधरी ८२ टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम आला आहे. चोंढे हायस्कूलचा ८९ टक्के निकाल लागला असून रसिका झोले (८४.७६) ही प्रथम आली आहे. कसारा येथील बी. एच. अग्रवाल विद्यालयातून पूजा भडांगे (८०.७६) प्रथम तर न्यू वंडरलँड शाळेमधून काजल अग्रवाल (८५ टक्के) प्रथम आली आहे. छत्रपती विद्यालयातून प्रमिद सारकुटे (७३.३८) प्रथम आला आहे.
खर्डी हायस्कूलचा ६९.१४ टक्के निकाल लागला असून आदित्य ठाकरे हा ८७.०६ टक्के गुण मिळवून प्रथम आला आहे. दळखणच्या भक्तीसंगम विद्यालयाचा ८६.८४ टक्के निकाल लागला असून दीपक दुभेले (८८.९२) हा प्रथम आला आहे. मुगावच्या समता विद्यालयाचा १०० टक्के निकाल लागला असून आकाश खंडागळे (८६ टक्के) हा प्रथम आला आहे. डोळखांबच्या न्यू इंग्लिश स्कूलचा ७१.३० टक्के निकाल लागला आहे. अश्विनी चौधरी हिने ८८.३० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. दीपाली कोंगेरे (८४.१५) द्वितीय तर हर्षला सांबरे (८२ टक्के) तृतीय आली आहे.
अस्नोलीच्या प्रगती विद्यालयातून नितीन सातपुते याने ८७.०७ टक्के गुण मिळवून प्रथम आला आहे. कविता गवाळे (८५.८४) द्वितीय तर पांडुरंग दिनकर (८२.७६) तृतीय आला आहे. विद्यालयाचा ९६.२९ टक्के निकाल लागला आहे.