Leading International Marathi News Daily

शनिवार, २७ जून २००९

विविध

लालगडपासून जवळच असलेले कडसोले खेडे सुरक्षा दलांच्या ताब्यात
गोलतोर (पश्चिम बंगाल), २६ जून/पीटीआय

 

लालगडमधील विजयानंतर सुरक्षा दलांनी आता आसपासच्या परिसरात कारवाई सुरू केली असून आज सशस्त्र अशा माओवाद्यांवर सुरक्षा दलांनी नव्याने हल्ला चढवला. नक्षलवाद्यांनी दोन सुरूंगांचे स्फोट केले. लालगडवर ताबा मिळविल्यानंतर पाच दिवसांनी केंद्रीय निमलष्करी दले व राज्य पोलीस यांनी आज लालगडपासून २० किमी अंतरावरील कडसोले या ठिकाणावर हल्ला केला व ते ताब्यात घेतले. सुरक्षा जवान जसे आगेकूच करू लागले तसे माओवाद्यांनी गोळीबार केला. कडसोले येथे पंधरा माओवाद्यांच्या एका गटाने गोळीबार केला असता सुरक्षा दलांनी लाईट मशिनगन व एके ४७ च्या मदतीने प्रत्युत्तर दिले. माओवाद्यांनी सुरक्षा दलांना रोखण्यासाठी दोन सुरूंगांचे स्फोट केले, त्यात कुणीही जखमी झाले नाही. इतर दोन सुरूंग सीआयडीच्या बॉम्ब शोधक पथकाने निकामी केले. हे सुरूंग कडसोले येथील एका पुलाजवळ लावण्यात आले होते.