Leading International Marathi News Daily

सोमवार, २९ जून २००९

बालेकिल्ला शेकापचा, तटबंदी सेना- भाजपची!
अनिरुद्ध भातखंडे

दोन दशकांपूर्वी रशियामधील साम्यवाद अस्ताला गेला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये पं. बंगालमध्येही डाव्यांचा धुव्वा उडाला. महाराष्ट्रात गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेणमधून शेतकरी कामगार पक्ष हद्दपार झाला. मात्र या प्रतिकूल परिस्थितीत पनवेलमध्ये मात्र शेकापचा लालबावटा अद्याप फडकत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत शेकापच्या सर्व उमेदवारांच्या पाठीला माती लागली, परंतु पनवेल मतदारसंघातून शेकापचे विवेक पाटील तब्बल तिसऱ्यांदा निवडून आले आणि शेकापचे अस्तित्त्व कायम राहिले. पाटील यांनी त्यावेळी काँग्रेसच्या शाम म्हात्रेंचा ९२ हजार मतांनी पराभव केला होता.

‘उमेदवार आम्हाला भावला आणि नवसाला पावला!’
भगवान मंडलिक
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, नवी मुंबई आणि ठाणे महापालिका हद्दीतील काही प्रभाग, गावांचा समावेश करून कल्याण ग्रामीण हा नवीन विधानसभा मतदारसंघ तयार झाला आहे. भौगोलिकदृष्टय़ा हा मतदारसंघ एखाद्या अमिबासारखा पसरला आहे. तिन्ही महापालिका हद्दीतील नागरिकांशी चांगली सलगी असणारा उमेदवार या मतदारसंघात चांगला बाजी मारू शकतो, पण तेवढे विकासकार्य करणारा कार्यसम्राट अजून या भागात निर्माण झालेला नाही. या मतदारसंघात आगरी समाजाचे प्राबल्य आहे. त्यामुळे ‘आगरी कार्ड’ या ठिकाणी जोरात चालू शकते आणि एखाद्या उमेदवाराला घर बसल्या विजय मिळवता येऊ शकतो, पण तसा आत्मविश्वास या भागातील मतदार नागरिकांचा मिळविण्यात एकही राजकीय नेता अजून या भागात पाहण्यास मिळत नाही.