Leading International Marathi News Daily

सोमवार, २९ जून २००९

(सविस्तर वृत्त)

बीपीएड परीक्षेतील रॅकेट उघड
काटोल पोलीस ठाण्यात तक्रार
प्रभारी प्रश्नचार्यासह चौघांची नावे
काटोलच्या माजी विद्यार्थ्यांस अटक
नागपूर, २८ जून/ प्रतिनिधी
बीपीएडच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने पैसे घेऊन उत्तीर्ण करणाऱ्या टोळीचे पितळ उघडे पाडले असून त्यांच्यावर काटोल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात लाखो रुपयांची देवाणघेवाण झाली असून त्यात चार जणांची नावे पुढे आली आहेत. काटोलच्या छत्रपती शारीरिक

 

शिक्षण महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी अनिमेष मंडल याला काटोल पोलिसांनी अटक केली आहे. तसेच, सावरगावच्या राणी लक्ष्मीबाई शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचा प्रभारी प्रश्नचार्य राजेंद्र गोरे, नागपूरच्या ताजुद्दीन हजरत बाबा महाविद्यालयाचा अधिव्याख्याता बाबुलाल धोत्रे आणि विद्यापीठातील शारीरिक शिक्षण अभ्यास मंडळाचा अध्यक्ष चंद्रकांत दुबळे यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते.
यावर्षी ४० शारीरिक शिक्षण महाविद्यालयांचे २३०६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १४० विद्यार्थी गैरहजर होते. त्यातून ६८२ उत्तरपत्रिका बनावट असल्याचे निष्पन्न झाले. बीपीएडच्या प्रथम वर्षाच्या ‘प्रिन्सिपल इन हिस्ट्री ऑफ फिजिकल एज्युकेशन’, ‘स्पोर्टस् सायकॉलॉजी’ आणि ‘अनॉटॉमी अ‍ॅण्ड फिजॉलॉजी’ या तीन विषयांसाठी पैशाची देवाणघेवाण झाली. बीपीएडच्या तीन विषयांच्या ६६१ उत्तरपत्रिका बनावट असल्याचे विद्यापीठाच्या डिसिप्लिनरी कमिटीपुढे सिद्ध झाले. शिवाय, एम.पी.एड.च्या प्रथम वर्षाच्या २ आणि एम.पी.एड.च्या दुसऱ्या वर्षाच्या १९ उत्तरपत्रिका बनावट असल्याचे निष्पन्न झाल्याने बनावट उत्तरपत्रिकांची एकूण संख्या ६८२ झाली आहे. यात किती विद्यार्थ्यांचा समावेश आहे, हे पोलिसांच्या तपासानंतरच निष्पन्न होईल, असे प्र-कुलगुरू गौरीशंकर पाराशर यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी कुलसचिव सुभाष बेलसरे, परीक्षा नियंत्रक डॉ. देवेंद्रनाथ मिश्रा, उपकुलसचिव प्रशांत मोहिते आणि अ‍ॅड. भानुदास कुलकर्णी प्रश्नमुख्याने उपस्थित होते.
पाराशर म्हणाले, १५ विद्यार्थ्यांनी २७ जूनला (शनिवारी) भेट घेऊन त्यांना फसवण्यात आल्याची तक्रार विद्यापीठाकडे केली. कुलगुरूंच्या परवानगीने आणि पोलीस व विद्यापीठ परीक्षा मंडळाच्या सहकार्याने उपरोक्त टोळीची ‘कामगिरी’ उघडकीस आली आहे. दरम्यान हाती आलेल्या माहितीनुसार, परप्रश्नंतीय विद्यार्थ्यांना बीपीएडमध्ये प्रवेश देण्यापासून ते उत्तीर्ण करण्याची हमी देणाऱ्यांचे मनसुबे उधळण्यास विद्यापीठ गेल्या चार महिन्यांपासून प्रयत्नशील होते. काही लोक विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन त्यांना उत्तीर्ण करण्यात सक्रिय असल्याची एक तक्रार विद्यापीठाकडे १ मार्चला आली होती. मात्र, त्या प्रकरणात कुणी पुढे आले नाही. त्यानंतर ४ एप्रिलला चिमूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयात सामूहिक कॉपी होत असल्याची सूचना विद्यापीठाला मिळाली. त्यात ३९ विद्यार्थ्यांना नागपूर विद्यापीठाच्या भरारी पथकाने पकडले. बी.पी.एड.चा ‘ऑफिसिएटिंग आणि कोचिंग’चा पेपर त्यावेळी सुरू होता. केंद्रावर एकूण ५५ विद्यार्थ्यांची परीक्षा होती. त्यापैकी ११ विद्यार्थी गैरहजर होते. उर्वरित ३९ विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडण्यात आले तर, ८ विद्यार्थी पळून गेले. त्यावेळी कुणाच्याच विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. मात्र, विद्यार्थ्यांना कारणे दाखवा नोटिस बजावण्यात आली होती. विशेष म्हणजे, हे सर्व ३९ विद्यार्थी परप्रश्नंतीय होते. त्यानंतर पुन्हा काही दिवसांपूर्वी कामठीच्या एका महाविद्यालयात विद्यापीठाच्या भरारी पथकाने छापा घालून काही विद्यार्थ्यांना पकडले होते. त्यांनाही कारणे दाखवा नोटिसही बजावली होती.
विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन या सर्व प्रकरणामागे कुणाचा हात आहे? कोण त्यांच्याकडे पैशाची मागणी करते, असे विचारण्यात आले होते. मात्र, त्यांच्यापैकी कुणीच विद्यापीठाला काहीच कळवले नाही. त्यांना कारणे दाखवा नोटिस बजावून विद्यापीठाने काही शारीरिक शिक्षण महाविद्यालयांचे निकाल विविध कारणांमुळे रोखून ठेवले होते. त्यात हेही एक कारण होते. परप्रश्नंतीय विद्यार्थ्यांपुढे पुढील पर्यायच उपलब्ध नसल्याने त्यांनी शनिवारी थेट प्र-कुलगुरूंचे कार्यालय गाठले आणि उत्तीर्ण करून देण्याच्या हमीवर त्यांच्याकडून हजारो रुपये उकळण्यात आल्याचा वृतांत त्यांनी सप्रमाण सांगितला. त्यातून पैसे देऊन उत्तीर्ण करणाऱ्या टोळीचा पत्ता लागला.
असे घडले स्टिंग ऑपरेशन
पैसे देऊन उत्तीर्ण करण्याचा प्रकार केव्हापासून सुरू होता, हे पोलीस तपासानंतर उघडकीस येईलच. मात्र, यातील मुख्य सूत्रधार राणी लक्ष्मीबाई शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रभारी प्रश्नचार्य राजेंद्र गोरे याच्या इशाऱ्यावर हे सर्व कुभांड रचले जात होते. त्याच्या बरोबर नागपूरच्या ताजुद्दीन हजरत बाबा महाविद्यालयाचा अधिव्याख्याता बाबुलाल धोत्रे आणि विद्यापीठातील शारीरिक शिक्षण अभ्यास मंडळाचा अध्यक्ष चंद्रकांत दुबळे व काटोलच्या छत्रपती शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी अनिमेष मंडल सक्रिय होते. यातील विशेष बाब म्हणजे, विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण अभ्यासक्रमामध्ये परप्रश्नंतीय विद्यार्थ्यांचाच मोठय़ा प्रमाणात भरणा आहे. या परप्रश्नंतीय विद्यार्थ्यांशी संपर्क साधून अनिमेष मंडल विद्यार्थ्यांना त्यांच्या ठरलेल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश देत असे. या विद्यार्थ्यांकडे जाऊन त्यांच्याशी पैशाच्या व्यवहाराबद्दल बाबुलाल धोत्रे बोलत असायचा. कलकत्त्याच्या या १५ विद्यार्थ्यांनाही असाच प्रवेश मिळाला होता. त्यांना पैसे देऊन उत्तीर्ण करण्याचे अमिष दाखवण्यात आले होते. त्यांनी त्याचवेळी राजेंद्र गोरेकडे पैसे भरलेल्या पावतीची मागणी केली मात्र, तशी पावती देण्यास गोरेने स्पष्ट नकार दिला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी पैसे देताना फोटोही घेतले. तसेच गोरे व इतरांचे संभाषणही वेळोवेळी टेप केले.
शारीरिक महाविद्यालयांचे निकाल रोखले गेले तेव्हा विद्यार्थ्यांनी राजेंद्र गोरेला फोन केला की, ‘आपने तो कहा था की, पैसे देणे पर आप हमको पास कर देंगे. हमको तो शो-कॉज नोटिस मिला है’ त्यावर गोरे म्हणाला, देखो इतने पैसे मे बात नही बनेंगी. बोर्ड ऑफ स्टडीजके चेअरमनको भी पैसे देणे पडते है तो और ५००० हजार सबको देणे पडेंगे. अनिमेष पटेल आपको श्रीराम धर्मशालामें लेके जायेगा’. हे संभाषणही विद्यार्थ्यांनी टेप केले होते.
जे विद्यार्थी या चौकडीच्या अमिषाला बळी पडत असत त्या विद्यार्थ्यांना ‘विशिष्ट कोड’ असलेल्या उत्तरपत्रिका दिल्या जायच्या. उत्तरपत्रिकांच्या पहिल्या आणि शेवटच्या पानावर ‘ओम’, ‘हरिओम’ आणि ‘समाप्त’ असे विद्यार्थ्यांनी लिहिले आणि एकदा का उत्तरपत्रिका व्हॅल्युअरच्या हाती गेल्या की, संबंधित व्हॅल्युअरने ही विशिष्ट भाषा समजून विद्यार्थ्यांची गुणपत्रिका न तपासताच त्याला उत्तीर्ण करायचे, असे हे षडयंत्र होते. मात्र, विद्यापीठ गेल्या काही महिन्यांपासूनच या संपूर्ण प्रकरणाच्या पाळतीवर असल्याने त्यांनी आलेल्या उत्तरपत्रिका ताबडतोब डिसिप्लिनरी समितीकडे पाठवल्या. त्यातील ६८२ उत्तरपत्रिका बोगस असल्याचे उघडकीस आले. उत्तरपत्रिका तपासण्यासाठी व्हॅल्युअरली निवड बोर्ड ऑफ स्टडीचा अध्यक्ष करतो. त्यामुळेच मौद्याच्या बाबुराव तिडके शारीरिक शिक्षण महाविद्यालयातील चंद्रकांत दुबळे यांच्यावरील संशय आणखी गडद होतो. पैशाची देवाण-घेवाण काटोलमध्ये होत असल्याने या प्रकरणी काटोल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.