Leading International Marathi News Daily

सोमवार, २९ जून २००९

(सविस्तर वृत्त)

आल्या सरीवर सरी.. बाग फुलवा घरोघरी..
नागपूर, २८ जून / प्रतिनिधी

गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या दमदार पावसाने विदर्भासह नागपुरात हजेरी

 

लावल्यामुळे फुटपाथवर रोपटय़ाची विक्री करणाऱ्यांच्या दुकानात ग्राहकांची गर्दी वाढू लागली आहे.
साधारणत मृग नक्षत्राला प्रश्नरंभ झाला की बहुतांश नागरिक अंगणामध्ये वेगवेगळी रोपटे लावून घराभोवतीचा परिसर निसर्गरम्य करीत असतात मात्र यंदा पावसाने उशिरा हजेरी लावल्यामुळे त्याचा परिणाम रोपटय़ाची विक्री करणाऱ्या दुकानदारांवर झाला होता. कालपासून संततधार पावसामुळे आता घरोघरी बाग फुलवायला सुरुवात झाली आहे. आपल्या अवती भोवती झाडे असावी, झाडाच्या सावलीत काही वेळ आसरा घ्यावा, असे प्रत्येकाला वाटत असले ज्यांच्या घरी अंगण आहे त्यांना ते शक्य आहे पण आज सिमेंट क्रॉक्रीटच्या काळात अंगण कमी झाली आहे त्यामुळे अनेक लोक छोटय़ा मोठय़ा कुंडय़ांमध्ये वेगवेगळी रोपटे लावित असतात. शहरातील विविध भागातील फुटपाथवर वेगवेगळ्या फुलांची, शो ची रोपटे आणि आकर्षक कुंडय़ांची विक्री होत आहे. उत्तर अंबाझरी मार्गावर रस्त्याच्या कडेला असलेल्या फुटपाथवर वेगवेगळ्या फुलांची व शोच्या रोपटय़ांची विक्री करणारे अनेक लोक दिसून येतात. त्यांच्याजवळ २०० ते २५० प्रकारची वेगवेगळी रोपटे विक्रीला आहे. कळमेश्वर भागात हुबळी या गावात राहणारे यादवराव शेंदरे यांनी सांगितले की, हुबळी या गावात सहा एकर शेती असून त्या भागात वेगवेगळी झाडे लावण्यात आली आहे. शिवाय आमच्या भागात चार ते पाच नर्सरी आहेत. नागपूरला गेल्या सहा वर्षांपासून हा व्यवसाय करीत आहे. आमच्याकडे येणारे गिऱ्हाईक शोची झाडे अधिक पसंत करतात. दिवानखान्यात ठेवण्यासाठी विविध प्रकारची शोची झाडे विक्रीला आहे. शिवाय वेगवेगळ्या रंगाच्या गुलाबाला चांगली मागणी आहे. झाडांना पाणी देणे रोज आवश्यक असते. उन्हाळ्यामध्ये पाण्याची मोठय़ा प्रमाणात समस्या असल्यामुळे झाडाची विक्री कमी झाली होती. आता पावसाने हजेरी लावल्यामुळे रोपटय़ांची विक्री चांगली होत असल्याचे शेंदरे यांनी सांगितले. शोच्या आणि गुलाबाच्या फुलांच्या रोपटय़ांना चांगली मागणी असल्याचे शेंदरे यांनी सांगितले. भंडारा, गोंदिया, अमरावती, अकोला, चंद्रपूर या जिल्ह्य़ातून रोपटे विक्रीला आली आहे. बाहेरच्या राज्यातून अनेक लोक हा व्यवसाय करण्यासाठी आले आहे. शो च्या झाडेची शहरात जागेची समस्या आहे त्यामुळे आज या उत्तर अंबाझरी मार्गावर तर उद्या दुसरीकडे कुठेतरी व्यवसाय करणारे अनेक लोक आहे. या जागेवर मात्र गेल्या पाच वषार्ंपासून हा व्यवस्या करीत आहेत त्यासाठी महापालिकेची रितसर परवानगी घेतली असली तरी पोलीस अनेकदा त्रास देत असतात. अतिक्रमण विभागाचे कर्मचारी येऊन अनेक माल घेऊन जात असतात, असेही शेंदरे म्हणाले. शहरात सामाजिक वनीकरण विभागाच्या पाच नर्सरी असून गेल्या चार दिवसापासून ६०० ते ७०० रोपटय़ांची विक्री करण्यात आली असल्याचे तेथील एक कर्मचाऱ्याने सांगितले. शोभेच्या झाडामध्ये पॉम, क्रोटन, स्टारलय, फायक्स, अशोका, रबर प्लान्ट, मनी प्लान्ट इत्यादी ५० पेक्षा अधिक शोभेची झाडे आहेत तर फुलांमध्ये गुलाब फोरलिनिया, मोगरा, पिटोनिया, जास्वंद, चाफा, गौरी चाफा, टिपू आदी प्रकार विक्रीला आहेत. २० रुपयांपासून २०० रुपयांपर्यंत विविध फुलांची आणि शोची रोपटे बाजारात विक्रीला आहे. अजून पाच ते सहा दिवस असाच पाऊस राहिला तर रोपटय़ाची विक्री वाढेल, असेही शेंदरे यांनी सांगितले.