Leading International Marathi News Daily

सोमवार, २९ जून २००९

(सविस्तर वृत्त)

निर्यात केंद्रासाठी नागपूर योग्य ठिकाण -जैन
नागपूर, २८ जून / प्रतिनिधी

नागपूरचे भौगोलिक महत्त्व लक्षात घेता हे निर्यातीसाठी एक चांगले केंद्र म्हणून उदयास येऊ शकते,

 

असे मत चार्टर्ड अकाऊन्टट पवन कुमार जैन यांनी व्यक्त केले.
इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाऊन्टटस् ऑफ इंडियाच्या नागपूर शाखेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कर पद्धतीवरील चर्चासत्रात ते बोलत होते. गेल्या काही वर्षात या विभागाचा सर्वागीन विकास झाला आहे.
मिहान प्रकल्पाचे कामही सुरू आहे. विविध आंतरराष्ट्रीय कंपन्या त्यांची कार्यालये याठिकाणी स्थापन करीत आहेत. त्यामुळे भविष्यात नागपूरला चांगल्या व्यावसायिक संधी उपलब्ध होणार आहेत. यावेळी विशेष आर्थिक क्षेत्रातील करपद्धती आणि इतर करविषयक पद्धतींची माहिती त्यांनी दिली. या भागात व्यावसायिकदृष्टय़ा आंतरराष्ट्रीय घडामोडींना चांगलाच वेग आल्याने कर सल्लागार म्हणूनही या भागात चार्टर्ड अकाऊन्टटस्ला चांगल्या संधी असल्याचे जैन म्हणाले.
चर्चासत्राच्या सुरुवातीला नागपूर शाखेचे अध्यक्ष मिलिंद पटेल यांनी नागपूर विभागात राबवण्यात येणाऱ्या विविध घडामोडींची माहिती दिली. तसेच आयात-निर्यात व्यवसायासाठी सल्लागारांची मोठय़ा प्रमाणात आवश्यकता भासणार असल्याचे पटेल यांनी सांगितले. कार्यक्रमाला पी.आर. रिसबूड, सतीश सारडा, स्वप्नील अग्रवाल, अभिजित केळकर, किशोर बरडिया, मंजुषा गुढे, अतुल खेमका यांच्यासह इतर सदस्य मोठय़ा संख्येने उपस्थित होते.