Leading International Marathi News Daily

सोमवार, २९ जून २००९

(सविस्तर वृत्त)

सेवानिवृत्तांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न -बावनकुळे
कोराडी, २८ जून / वार्ताहर

महाजन्कोमधून निवृत्त होणाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करू, अशी ग्वाही

 

आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
निवृत्त ज्येष्ठ नागरिक संघाच्या कोराडी शाखेतर्फे विद्युत विहारातील विद्या मंदिर येथे सेवानिवृत्तांचा मेळावा व अभ्यासवर्ग आयोजित करण्यात आले होते. यावेळी आमदार बावनकुळे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तांत्रिक कामगार संघटनेचे माजी केंद्रीय उपाध्यक्ष के.पी. राऊत होते. प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त ज्येष्ठ नागरिक संघाचे सरचिटणीस के.एस. बिचवे, कोराडी औष्णिक वीज केंद्राचे मुख्य महाव्यवस्थापक ज्ञानेश्वर थुटूरकर, ग्राहक मंचच्या सदस्या गौरी चांद्रायण, प्रश्नदेशिक भविष्य निर्वाह निधी संघटनेचे केंद्रीय उपाध्यक्ष श्याम देशमुख, भविष्यनिधीचे सहायक आयुक्त प्रसन्ना मुळे, अभियंता संघटनेचे केंद्रीय उपाध्यक्ष ए.के. पाराशर उपस्थित होते.
संघटन शक्ती दाखवल्याशिवाय समस्या सूटत नाही. तेव्हा महाजन्कोतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी संघटित होऊन न्यायासाठी संघर्ष करण्याचे आवाहन के.पी. राऊत यांनी याप्रसंगी केले. गौरी चांद्रायण यांनी आर्थिक नियोजनाबाबत सविस्तर माहिती दिली. निवृत्त कर्मचाऱ्यांना सहकार्य करेल, अशी ग्वाही डी.बी. थुटूरकर यांनी दिली. के.एच. बिचवे यांनी संघटना मजबूत करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी रत्नाकर राजनकर, शांताराम शेंडे यांनीही विचार मांडले. संघटनेचे विभागीय सचिव बाबा नागपूरकर यांनी प्रश्नस्ताविकातून महाजेनकोतून निवृत्त झालेल्या कामगारांच्या समस्यांची माहिती दिली. एन.डी. पानसे यांनी आभार मानले. कार्यक्रमास वासुदेव अंबाडकर, विकास वाईकर, दिगंबर बावनकुळे यांच्यासह कोराडी आणि खापरखेडा औष्णिक वीज केंद्रातील सेवानिवृत्त कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.