Leading International Marathi News Daily

सोमवार, २९ जून २००९

(सविस्तर वृत्त)

‘सेवादल कार्यकर्त्यांनी पदाची अपेक्षा न ठेवता काम करण्याची गरज’
नागपूर, २८ जून / प्रतिनिधी

सेवादल हा संस्कार असून या संस्कारातून काँग्रेसचा कार्यकर्ता घडत असतो, त्यामुळे कार्यकर्त्यांनी

 

कुठल्याही पदाची अपेक्षा न ठेवता काम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय काँग्रेस सेवादलाचे प्रमुख संघटक महेंद्र जोशी यांनी केले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलतर्फे आज धंतोली येथील रंगोली हॉटेलमध्ये एक दिवसीय निवडणूक प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी महेंद्र जोशी म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीत सेवादलच्या पदाधिकाऱ्यांनी लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी वस्त्या वस्त्यामध्ये संपर्क साधण्याची गरज आहे. पक्षाची ध्येय धोरण सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम पदाधिकाऱ्यांसहीत कार्यकर्त्यांंनी केले पाहिजे. सेवादलात कुणीही पदाधिकारी किंवा कार्यकर्ता नसतो. महात्मा गांधी कुशल संघटक होते त्यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन कार्यकत्यार्ंनी सेवादलचे काम करावे, असे आवाहन जोशी यांनी केले.
यावेळी सेवादलचे संघटनमंत्री छोटेबाबू राय, संघटक कृष्णकुमार पांडे, शोयब अली, शशिकांत थोरात, यशवंत कुंभलकर, शहर अध्यक्ष जयप्रकाश गुप्ता, प्रदेश कार्यालय प्रमुख बनवारी शर्मा, माजी आमदार यादवराव देवगडे, पूर्व प्रदेश मुख्यसंघटक डॉ. मधुकर भुसारी, जानराव आप्पा मोळके, रामराव खत्री, साहेबराव खडसे, नंदा मिश्रा, अभिमन पेंढारी, वसंतराव गाडगे, प्रश्न. प्रमोद राखुंडे, सुरेश सिंगुरवार यांनी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रश्नरंभी डॉ. हर्डीकर यांच्या प्रतिमेला हार घालण्यात येऊन अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन रामगोविंद खोब्रागडे यांनी केले. सुलभा नागपूरकर यांनी आभार मानले. कामगार नेता दादा लाबंट यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बळवंतराव थेटरे, शंकर आयलवार, स्मिता कुंभारे, शंकरलाल बैसवारे, मालती मुळे, मिलिंद सोनटक्के, रत्नमाला पोफरे, सुनील अग्रवाल, विनोद भोले यांनी परिश्रम घेतले.