Leading International Marathi News Daily

सोमवार, २९ जून २००९

(सविस्तर वृत्त)

भर पावसातही ‘जननी सुरक्षा योजना जागृती अभियान’ सुरू
नागपूर, २८ जून/ प्रतिनिधी

धो धो पावसातही ‘जननी सुरक्षा योजना जागृती अभियान’ वस्त्या वस्त्यांमध्ये उत्साहात आणि

 

प्रचंड उपस्थितीत साजरे करण्यात आले. २८ ते ३० जून दरम्यान महाराष्ट्रातील सात शहरांमध्ये हे अभियान राबवले जात असून नागपुरातील ४५ वस्त्यांमध्ये या अभियानांतर्गत मातामृत्यू व नवजात बाळाच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्याच्या हेतूने केंद्र सरकारने सुरू केलेली ‘जननी सुरक्षा योजना’ (जेएसवाय) आणि ‘मातृत्व अनुदान योजने’ची (एमएवाय) माहिती पथनाटय़ आणि गीतांच्या माध्यमातून वस्त्यामध्ये पोहोचवण्यात आली. वस्त्यांमध्ये त्या त्या भागातील उल्लेखनीय मंडळींना कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले होते. अभियानाचे उद्घाटन महापौर माया इवनाते यांनी हिरवा झेंडा दाखवून केले. यावेळी नगरसेवक हरीश ग्वालवंशी, तेथील नागरिक अमित कोये, म्युर मेमोरियल हॉस्पिटलचे संचालक डॉ. विलास शेंडे, डॉ. रजनी शेंडे आणि ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’चे समन्वयक डॉ. सतीश गोगुलवार प्रश्नमुख्याने उपस्थित होते. यावेळी गोंडमोहल्ला, सुरेंद्रगढ, गंगानगर, जगदिशनगर आदी वस्त्यांमधील सामाजिक कार्यकर्त्यां आणि आरोग्यसखी मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या. आरोग्यसखींनी पथनाटय़ाच्या माध्यमातून जेएसवाय आणि एमएवायची माहिती पावसात उपस्थित नागरिकांना दिली. नागरिकांनी त्यावर प्रश्नही उपस्थित केले. माया इवनाते म्हणाल्या, या दोन्ही योजना केवळ सरकारी रुग्णालयातून राबवल्या जात असून त्यात खाजगी रुग्णालयांनाही सामील करून घेण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून त्यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येईल.
प्रश्नस्ताविक डॉ. गोगुलवार यांनी केले. संचालन स्वरूपा राऊत यांनी केले. यावेळी उमा शेंडे, प्रतिभा भोंगे आणि समस्त आरोग्यसखींचे विशेष सहकार्य लाभले. भांडेवाडी येथील वस्तीमध्ये अभियानाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते हिराचंद भिमटे यांनी केले. भांडेवाडी चौकातील बुद्धविहारात झालेल्या उद्घाटन कार्यक्रमात जेएसवाय आणि एमएवाय योजनेसंदर्भात जोरजोरात घोषणा देऊन परिसरातील नागरिकांना पथनाटय़ाद्वारे योजनांची माहिती देण्यात आली. संचालन सारिका सोनटक्के यांनी केले. यावेळी मंगला घोडेस्वार, सविता कांबळे, नसरिन अंसारी आणि चयन यांच्या नेतृत्वात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ममता माने, हिरा दहिवले, माया उरकुडे, सुषमा लोणारे, कनिजा दिलावर शेख, यास्मिन सय्यद मुख्तार, शबनम निजाम शेख, ममता कांबळे, रेखा गाडगे, लता रामटेके, माया दुरुगकर, रंजना सेलोकर, आशा जाधव आणि ममता कांबळे यांच्या सहकार्यामुळे वस्तीतील महिलांनी अभियानात हिरीरीने भाग घेतला.