Leading International Marathi News Daily

सोमवार, २९ जून २००९

(सविस्तर वृत्त)

संशयित ‘स्वाईन फ्लू’च्या रुग्णाचा अहवाल नकारार्थी
नागपूर, २८ जून / प्रतिनिधी

मेडिकलमध्ये दाखल झालेला संशयित तिसऱ्या रुग्णाच्या रक्ताचा व थुंकीचा अहवालही नकारार्थी

 

आल्याने मेडिकलमधील डॉक्टरांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. या रुग्णापूर्वीही ‘स्वाईन फ्लू’चे दोन संशयित रुग्ण दाखल झाले होते. त्यांचाही अहवाल नकारार्थीच आला आहे.
शमशाद अली नैमुल हक (२७) असे या रुग्णाचे नाव असून तो छत्तीसगडमधील द्रुग येथील रहिवासी आहे. गुरुवारी पहाटे ३.३० वाजता तो अबुधाबी येथून नागपुरातील आंतरराष्ट्रीय बाबासाहेब आंबेडकर विमानतळावर आला. तेथील डॉक्टरांनी त्याची तपासणी केली असता ताप, खोकला व घशात खरखर होत असल्याचे त्याने डॉक्टरांना सांगितले. डॉक्टरांना ‘स्वाईन फ्लू’चा संशय आल्याने त्याला उपचारासाठी मेडिकलमध्ये पाटविले. त्याला भरती करून घेऊन त्याच दिवशी त्याच्या रक्ताचे, थुंकीचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील राष्ट्रीय प्रयोगशाळेत पाठवले. आज रविवारी त्याच्या रक्ताचा व थुंकीच्या नमुन्याचा नकारार्थी अहवाल मेडिकलला प्रश्नप्त झाला. त्याला उद्या, सोमवारी सुटी होणार असल्याची माहिती मेडिकलच्या सूत्रांनी दिली.