Leading International Marathi News Daily

सोमवार, २९ जून २००९

(सविस्तर वृत्त)

मेघे फाऊंडेशच्या फिरत्या संगणक केंद्राला इंटेलच्या अधिकाऱ्यांची भेट
नागपूर, २८ जून/ प्रतिनिधी

दत्ता मेघे रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने गरीब मुलांना फिरत्या संगणक केंद्राद्वारे मोफत संगणक

 

प्रशिक्षण मागील दोन वर्षापासून देण्यात येते. या संगणक केंद्राला इंटेल या संगणक कंपनीच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट दिली.
इंटेल कंपनीचे आशिया पॅसेफिकचे उपाध्यक्ष नवीन शेनॉय आणि मार्केटिंग विभागाचे महाव्यवस्थापक तृश ग्लोमफिल्ड यांनी केंद्राची भेट घेऊन उपक्रमाची माहिती घेतली. त्यांच्यासोबत दिल्लीहून कंपनीच्या साऊथ एशिया विभागाचे व्यवस्थापकीय संचालक आर. शिवकुमार आणि मुंबई येथील मार्केटिंग ग्रुपचे संचालक राजेश गुप्ता उपस्थित होते. प्रत्यक्ष फुटाळा वस्तीतील मुलांना प्रशिक्षण देत असताना या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. उपक्रमाने प्रभावित होऊन या अधिकाऱ्यांनी ही मोबाईल व्हॅन अधिक उच्च दर्जाची आणि अत्याधुनिक करण्यासाठी कंपनीतर्फे वायरलेस ब्रॉडबँड कनेक्शनची व्यवस्था तसेच अत्यंत आधुनिक संगणक पुरवण्याचे आश्वासन दिले. इंटेलच्या चमूने अत्रे ले-आऊट येथील दत्ता मेघे रिसर्च फाऊंडेशनलाही भेट दिली. यावेळी फाऊंडेशनतर्फे समीर मेघे आणि संगणक व्हॅनचे तांत्रिक विश्लेषक मनीष हडप यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी फाऊंडेशनचे पदाधिकारी सयाजी जाधव, राजू लोहे, प्रशिक्षक अमिताभ बासू, मंगेश जाधव, आशीष कराडे आणि प्रशिक्षण समन्वयक श्रीकांत भोगे उपस्थित होते.