Leading International Marathi News Daily

सोमवार, २९ जून २००९

(सविस्तर वृत्त)

ऑरेंज सिटी आणि संशोधन संस्थेच्या पहिल्या महिला क्लिनिकचा शुभारंभ
नागपूर, २८ जून/प्रतिनिधी

ऑरेंज सिटी रुग्णालय आणि संशोधन संस्थानतर्फे मध्य भारतातील पहिल्या महिला क्लिनिकचा

 

शुभारंभ नुकताच करण्यात आला. यावेळी इस्पितळाचे संचालक डॉ. अनुप मरार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
महिला क्लिनिकच्या वैशिष्टय़ांचा उल्लेख करताना डॉ. मरार म्हणाले, वैद्यकीय क्षेत्र आधुनिकीकरणाकडे वाटचाल करीत असले, तरी समाजात आजही स्त्रियांकडे विशेषत त्यांच्या स्वास्थ्याकडे दुर्लक्ष करण्यात येते. विविध कारणांमुळे त्यांच्या आरोग्याशी निगडित प्रश्न घरातील वडिलधाऱ्या मंडळींबरोबर चर्चा करण्यास त्या तयार नसतात. हे प्रश्न स्वत:च हाताळण्याचा त्या प्रयत्न करतात. त्यामुळे पुढे गंभीर आजार निर्माण होण्याची भीती असते. त्यामुळे अशाप्रकारचे महिलांसाठी स्वास्थ्य क्लिनिक उपलब्ध करून देऊन त्यांना सर्वसमावेशक चेकअप करून देण्याचा हेतू असल्याचे डॉ. मरार म्हणाले. यावेळी डॉ. मरार यांनी स्त्रियांना विविध वयोगटात येणाऱ्या आजारांबद्दल माहिती दिली. ऑरेंज सिटी रुग्णालय आणि संशोधन संस्थेमध्ये महिलांसाठी क्लिनिक रवी नायर हॉस्पिटल प्रश्नयव्हेट लिमिटेडच्या संचालिका आणि मॅमोग्राफी विशेषज्ञ डॉ. उषा नायर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे. या क्लिनिकमध्ये बाह्य़ रुग्ण विभागात सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. अपर्णा मुन्शी, ब्रेस्ट सर्जन डॉ. वंदना टोमे, मिनीमल इन्वेसिव्ह चिकित्सक डॉ. प्रश्नची महाजन रुग्णांची तपासणी करतील. गायनॉकॉलॉजिस्ट डॉ. बिंदू मेनन सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत, फिजिशियन सल्लागार डॉ. देवयानी बुचे सकाळी १० ते दुपारी ३, तर दुपारी ३ ते ६ वाजेपर्यंत आहारतज्ज्ञ मानसी अंधारे मार्गदर्शन करतील. सायंकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत डॉ. अंजली चिव्हाने, गायनॉकॉलॉजिस्ट सल्लागार डॉ. नितू हेडा, डॉ. सुनीता लवंगे आणि युट्रोलॉजिस्ट आणि रेडिओलॉजिस्ट डॉ. वर्षा सारडा आणि पॅथॉलॉजिस्ट डॉ. स्वाती अटल आणि इतर तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. महिला आरोग्य केंद्र रविवार वगळता इतर दिवशी सकाळी ८ ते ८ वाजेपर्यंत सुरू रांहणार आहे. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी (६६३४८९) वर संपर्क साधावा.