Leading International Marathi News Daily

सोमवार, २९ जून २००९

(सविस्तर वृत्त)

ज्योती सुताणे यांनी रेखाटलेल्या चित्राच्या प्रदर्शनाचे आज उद्घाटन
मान्सून बोनांझा , नागपूर, २८ जून / प्रतिनिधी

मुंडले एज्युकेशनल ट्रस्ट संचालित सेंट्रल इंडिया स्कूल ऑफ फाईन आर्टस (सिस्फा)तर्फे

 

लक्ष्मीनगरातील सिस्फा की छोटी गॅलरीत सुरू असलेल्या मान्सून बोनांझा या चित्रप्रदर्शन मालिकेत सहावे प्रदर्शन चित्रकार सिस्फाच्या प्रश्नध्यापक ज्योती सुताणे यांनी रेखाटलेल्या ‘हिडन एक्सप्रेशन्स’ चित्राचे चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
उद्या, सोमवारी सायंकाळी ६.३० वाजता दंत शल्यचिकित्सक डॉ. अनिल पिंपळापुरे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उदघाटन होणार असून प्रदर्शन १ जुलैपर्यंत सायंकाळी ४.३० ते ८.३० पर्यंत रसिकांसाठी खुले राहील. हिडन एक्सप्रेशन्स या चित्रप्रदर्शनात ज्योती सुताणे यांच्या चित्रात दडलेल्या भावना क्षितिजाच्या पलीकडे घेऊन जातात. दगड, शिळांच्या माध्यमाने मानवाने आपली अभिव्यक्ती साकारली तसेच दगडाच्या चेहऱ्यावरील भाव ज्योती सुताणेंनी अचूक टिपली आहे. कधी त्रिमितीत घेऊन जाणारी तर कधी चित्राच्या पृष्ठभागावरच रेंगाळणारी स्पेस, कधी वास्तविक तर कधी अमूर्त वाटणारी घटक मांडणी प्रेक्षकांशी हितगुज करणार आहे. या प्रदर्शनात ज्योती सुताने यांनी साकारलेले १२ बाय ५ फुटाचे मोठे चित्र या प्रदर्शनात आकर्षण ठरणार आहे. चित्राची एका टोकापासून तर दुसऱ्या टोकापर्यंतचा दृश्यप्रवास निर्माण करणारे हे मोठे चित्रांकन आहे.
या प्रदर्शनासोबतच कलाकारांवर केलेल्या शॉर्ट फिल्मस, कलागोष्टी, स्लाईड शो आणि कलेवरील पुस्तकाचे प्रदर्शनात आस्वाद रसिकांना घेता येणार आहे. पाश्चात्य कलाशैलीवर आधारित कलापुस्तकाच्या कलासंग्रहाचे वैशिष्टय़पूर्ण प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून रसिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिस्फाचे अधिष्ठाता चंद्रकात चन्न्ो यांनी केले आहे.