Leading International Marathi News Daily

सोमवार, २९ जून २००९

(सविस्तर वृत्त)

ट्रक चालकाला लुटण्याच्या प्रयत्नातील तिघे अटकेत
नागपूर, २८ जून / प्रतिनिधी

तिघा लुटारूंनी ट्रक चालकाला लुटण्याचा प्रयत्न केल्याची घटना कामठी मार्गावरील उप्पलवाडी

 

पुलाजवळ शनिवारी मध्यरात्रीनंतर घडली.
अन्वरअली मुश्ताक अहमद (रा़ उत्तरप्रदेश) त्याचा दहा चाकी ट्रकने (युपी७२/डी/९१९६) लखनऊ ला जात होता. कामठी रोडवर उप्पलवाडी पुलाजवळ हिरो होंडाने (एमएच३१/बीव्ही/४६५) तिघे आले आणि त्यांनी ट्रक थांबवला. केबीनच्या दोन्ही बाजून चढून त्याला धमकावत खिशातील पैसे हिसकण्याचा प्रयत्न केला. चालकाने लगेचच पोलिसांना कळवले. जरिपटका पोलिसांनी तेथून पळून गेलेल्या नीलेश हिरामण विजयकर, पिंटू उर्फ शामसुंदर जवाहर ठाकूर (दोघे रा. शिवशक्तीनगर) व अजय देवानंद गडपायले (रा़ पवननगर) या तिन्ही आरोपींना अटक केली़
चेन स्नॅचिंग
दुचाकीस्वार महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र मोटारसायकलवर आलेल्या लुटारूंनी खेचल्याची घटना सोमवारी क्वार्टरमधील विमा रुग्णालयासमोर शनिवारी रात्री साम्डेनऊ वाजताच्या सुमारास घडली. शालिनी दशरथ दुधे (रा़ शाहुनगर) या स्पीरीटने (एमएच३१/एसी/७०६८) घरी जात असता मागून आलेल्या काळया रंगाच्या पल्सर मोटारसायकलवरील दोन तरुणांनी सोन्याचे मंगळसूत्र खेचून पळून गेले. सक्करदरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला़