Leading International Marathi News Daily

सोमवार, २९ जून २००९

(सविस्तर वृत्त)

प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेणार -आमदार बावनकुळे
कोराडी, २८ जून / प्रतिनिधी

कोराडी-महादुला येथील प्रकल्पग्रस्तांना नोकरी मिळावी, यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले असून

 

त्याला यश आल्याची माहिती आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
प्रकल्पग्रस्तांच्या पाल्यांना कोराडी व खापरखेडा औष्णिक वीज केंद्रात नोकरी मिळावी, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन सुरू होते. या आंदोलनग्रस्तांची दखल घेऊन मी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित केला. तेव्हा येत्या ३१ जुलैपर्यंत औद्योगिक प्रशिक्षण घेतलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या पाल्यांना नोकरीत घेऊ. तसेच ज्यांनी प्रशिक्षण घेतले नाही, त्यांनाही प्रशिक्षित करून रिक्त पदावर घेऊ, असे आश्वासन संबंधित मंत्र्यांनी दिल्याचे बावनकुळे यांनी याप्रसंगी सांगितले.
४५० प्रकल्पबाधीत बेरोजगारांना जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्यात आले आहे. तसेच १४४ उमेदवार हे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून प्रशिक्षण घेतलेले आहे, अशी माहितीही बावनकुळे यांनी यावेळी दिली.
पत्रकार परिषदेला राजेश रंगारी, के.पी. राऊत, संजय मैंद, कोराडीच्या सरपंच अनुराधा अमिन यांच्यासह प्रकल्पग्रस्त बेरोजगार मोठय़ा संख्येने उपस्थित होते.