Leading International Marathi News Daily

सोमवार, २९ जून २००९

‘विठ्ठल दर्शन एक्सप्रेस’ अमरावतीहून पंढरपूरकडे रवाना
अमरावती/खामगाव, २८ जून / प्रतिनिधी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथील विठ्ठल दर्शनाच्या सोहोळ्याची अनुभूती घेण्यासाठी अमरावती शहरातून सुमारे २ हजार यात्रेकरू रविवारी दुपारी येथील रेल्वे स्थानकावरून ‘विठ्ठल दर्शन एक्सप्रेस’ने पंढरपूरकडे रवाना झाले. गेल्या पाच वर्षापासून दरवर्षी अमरावती रेल्वे स्थानकावरून पंढरपूरसाठी विशेष रेल्वे सोडण्यात येत असते. यावर्षी या रेल्वेच्या चार फेऱ्या होणार असून परतीच्या प्रवासासाठीही रेल्वेने व्यवस्था केली आहे.

बालमृत्यूंपुढे आरोग्य यंत्रणेचे दावे फोल !
चंद्रकांत ढाकुलकर

सरकारी आरोग्य यंत्रणा कितीही दावे करीत असली तरी त्यांचेच दावे त्यांच्याच कार्यकर्तृत्वामुळे त्यांच्याच मुळावर यापूर्वीही आलेले आहेत. ग्रामीण भागातील ६ वर्षे वयापर्यंतच्या बालकांना अंगणवाडीमार्फत सकस आहार पुरवला जात असल्याचा दावा या यंत्रणेकडून केला जात असतानाच नागपूर विभागातील पूर्व विदर्भात वर्षभरात शून्य ते ६ वर्षे वयोगटातील ३ हजार १२४ बालकांचा मृत्यू झालेला आहे. त्यात १ हजार ४०६ बालके केवळ कुपोषणामुळे, १ हजार ३६ अर्भक मृत्यू आणि उर्वरित ६८२ बालके विविध आजारांनी दगावलेले आहेत. अर्भक व बालमृत्यू रोखण्यासाठी विविध योजना शासकीय पातळीवरून राबवल्या जात असल्या तरी त्या त्या योजनांचा योग्य तो लाभ त्या त्या लाभार्थीपर्यंत पोहोचत नसावा, हे या आकडेवारीवरून स्पष्ट होते, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म ।
भेदाभेद भ्रम अमंगळ ।।

येत्या ३ जुलैच्या आषाढी एकादशीनिमित्त साऱ्या वारकऱ्यांची पावले पंढरपूरकडे वळली आहेत. त्यानिमित्त- ‘पंढरीची वारी’ आणि ज्ञानोबा-तुकोबांचा पालखी सोहळा हे महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव आहे. श्री विठ्ठल भक्तीनं भारलेला लाखो वैष्णवांचा महामेळा ‘जीवाचे जीवन’ असणाऱ्या विठुरायाच्या भेटीसाठी आळंदी ते पंढरपूर असा दीर्घप्रवास मोठय़ा आनंदात पार करतात हे जगातलं महादाश्चर्य आहे. ‘पंढरीची वारी’ हा केवळ धार्मिक सोहळा नाही तर ती सामाजिक, सांस्कृतिक परिवर्तनाची लोकचळवळ आहे आणि या चळवळीला अधिष्ठान आहे, वैष्णव धर्माचं ।

मतदारसंघाच्या सर्वागीण विकासाचा ध्यास
राजकुमार गोयनका

परिसीमनामुळे खामगाव विधानसभा मतदारसंघातून शेगाव शहर वगळण्यात आले आहे. आमदार दिलीप सानंदा खामगाव मतदारसंघाचे प्रतिनिधित्व गेल्या १० वर्षापासून करीत आहेत. पूर्वी हा मतदारसंघ भाजपचा गड होता. आमदार सानंदा यांनी सेवा व राष्ट्रीय एकात्मतेचा मूलमंत्र ध्यानी घेऊन कार्य सुरू केले. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पांडुरंग फुंडकर यांच्या नावाने हा मतदारसंघ पूर्वी ओळखला जात होता परंतु, दोन वेळा मताधिक्याने विजयी होऊन आमदार सानंदा यांनी हा भाजपचा गड नेस्तनाबूत केला.

प्रियकराने केली प्रेयसीच्या भावाची हत्या
अकोला, २८ जून/प्रतिनिधी

प्रियकराने प्रेयसीच्या मावसभावाची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना जुन्या आळशी प्लॉट भागात घडली. प्रेयसीचे दुसरीकडे लग्न लावण्याच्या घरच्या मंडळींच्या प्रयत्नांना प्रियकराचा विरोध होता. अशातच प्रेयसीला भावाने मारहाण केल्यामुळे शनिवारी हा वाद विकोपास गेला.

ताडोबात ऑप्टीकल फायबर केबल टाकण्याची ‘बीएसएनएल’ची योजना
चंद्रपूर, २८ जून/ प्रतिनिधी

वन अधिकारी व कर्मचाऱ्यांना मिळणारी मोबाईल सेवा अधिक गतिमान करण्यासाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात ऑप्टीकल फायबर केबल टाकण्याची भारत संचार निगमची योजना असून एखाद्या संरक्षित जंगलात मोबाईलची ऑप्टीकल फायबर टाकणारा ताडोबा राज्यातील पहिला प्रकल्प ठरणार आहे.

भंडारा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
भंडारा, २८ जून / वार्ताहर
गौरव पशिने आत्महत्येप्रकरणी विविध राजकीय पक्ष आणि संघटनेच्यावतीने पुकारलेल्या भंडारा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. व्यापाऱ्यांनी स्वत:हून प्रतिष्ठाने बंद ठेवली. गौरव पशिने आत्महत्या प्रकरणाचा निष्पक्ष तपास करून आरोपींवर कडक कारवाई करावी, तपास सीबीआयकडे सोपवून आरोपींची ‘नार्को’ चाचणी करावी, या मागण्यांचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक सुरेश सागर, निवासी उपजिल्हाधिकारी पंकज चौबळ यांना एका शिष्टमंडळाने दिले.
सकाळी ८ वाजता गांधी चौकात शिवहरे कलार समाज, विविध राजकीय पक्ष व संघटनांच्या वतीने गौरव पशिने याला आदरांजली वाहण्यात आली. यावेळी आमदार मधुकर कुकडे, डॉ. प्रकाश मालगावे, नगराध्यक्ष महेंद्र गडकरी, उपाध्यक्ष रूबी चढ्ढा उपस्थित होते. गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. तपासात दिरंगाई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध यावेळी घोषणा देण्यात येत होत्या.

शेतकऱ्यांची पिळवणूक होत असल्याची तक्रार
वडनेर, २८ जून / वार्ताहर

शेती पीक कर्जासाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांसाठी तलाठय़ांकडून आर्थिक पिळवणूक केल्या जात असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. वडनेर भागातील शेतकऱ्यांची सध्या खरिपासाठी लागणाऱ्या पीक कर्ज घेण्यासाठी धावपळ सुरू आहे. कर्ज घेण्यासाठी तलाठय़ांकडून लागणाऱ्या सातबारा, आठ-अ, नकाशा आणि इतर कागदपत्रे शेतकरी तलाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहे.

विद्यानिकेतनचा निकाल शंभर टक्के
चंद्रपूर, २८ जून/प्रतिनिधी

चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र ऊर्जानगर वसाहतीतील विद्यानिकेतन हायस्कूलचा निकाल शंभर टक्के लागला असून अक्षय चंद्रकांत निमजे हा विद्यार्थी ९२.१५ टक्के गुण घेऊन प्रथम आला आहे. ऊर्जानगर विद्यामंदिर हायस्कूलने सुद्धा उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली असून या शाळेतून प्रथम क्रमांक ऋचा पुंडलिक खडतकर हिने मिळवला असून हिला ९१.०७ टक्के मिळून दुसरा क्रमांक आला. ९०.४६ टक्के गुण घेऊन प्रतीक दिवाकर देशमुख हा शाळेतून तिसरा क्रमांकावर आला. ऋचाचे वडील सहाय्यक अभियंता आहेत तर भाऊ मृणाल हा मार्च २००२ च्या परीक्षेत याच शाळेतून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला होता.

डॉ. संदीप जोगे यांची निवड
वर्धा, २८ जून / प्रतिनिधी

केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाच्या जीवजंतू कल्याण मंडळाने येथील पशुसेवी संस्थेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप जोगे यांची ऑस्ट्रेलियातर्फे दिल्या जाणाऱ्या विशेष प्रशिक्षणासाठी निवड केली आहे. या प्रशिक्षण शिबिरात ऑस्ट्रेलियाचे दहा तज्ज्ञ विविध प्रश्नण्यांवरील शस्त्रक्रिया, कॅन्सर, औषधोपचार याबाबत आधुनिक माहिती देतील.

अनुराग हिरापुरे, मयूर वाघवानी, सनम खत्री सेंट झेवियर्स शाळा अव्वल
गोंदिया, २८ जून / वार्ताहर
येथील सेंट झेवियर्स हायस्कूलचा निकाल १०० टक्के लागला आहे. जिल्ह्यातील सर्वोत्तम शाळेच्या यादीत सेंट झेवियर्स शाळेने आपले स्थान कायम ठेवले आहे. सनम खत्री (८९.५३), मयूर वाधवानी (८९.६), अनुराग हिरापुरे (८८.४७) यांनी शाळेतून प्रथम, द्वितीय व तृतीय स्थान पटकावला आहे. सोळा विद्यार्थ्यांनी विशेष प्रश्नवीण्यता प्रश्नप्त केली आहे.

शिवाजी महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के
गोंदिया, २७ जून / वार्ताहर

उच्च कला परीक्षा संचालनालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या कला शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाचा शिवाजी चित्रकला महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे. या परीक्षेला बसलेले महाविद्यालयातील सर्व आठही विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून दीपक कांबळे प्रथम, हरीश विठ्ठल खापरे द्वितीय, नितेश श्रीराम राऊत यांनी तृतीय क्रमांक पटकाविला आहे. उर्वरित पाच विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय महाविद्यालयाचे प्रश्नचार्य तुकाराम वाडगुरे व शिक्षकांना दिले. कुंभारे शाळेचा उत्कृष्ट निकाल सत्यशोधक शिक्षण संस्था द्वारा संचालित अॅड. दादासाहेब कुंभारे मानवता हायस्कूल (छिपीयॉ) या शाळेचा निकाल ९२.५३ टक्के लागला आहे. संचालक, शाळेचे मुख्याध्यापक, यांच्याकडून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

सेवानिवृत्ती वेतन पूर्ण देण्याची मागणी
चंद्रपूर, २८ जून/प्रतिनिधी

सेवानिवृत्तांना पाचव्या वेतन आयोगानुसार पूर्ण सेवानिवृत्ती वेतन देण्यात यावे व सहावा वेतन आयोग लागू करावा व इतर वीस मागण्यांचे निवेदन जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीने मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले आहे. या जिल्ह्य़ात सेवानिवृत्त पेन्शनधारकांची संख्या हजारोंच्या घरात आहे. पाचवे वेतन आयोगातील सर्वच शिफारशी केंद्राप्रमाणे महाराष्ट्र शासनाने मंजूर न केल्याने झालेला अन्याय दूर न केल्यास आंदोलन उभारणार असल्याचा इशारा जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष वा.पां. भांदककर यांनी दिला आहे.