Leading International Marathi News Daily
रविवार, २८ जून २००९

अविस्मरणीय घटनांचा काळ
पराक्रमी सूर्य, पंचमात शनी, दशमात राहू आणि लाभात गुरू यांच्यातील प्रतिक्रिया विचारांना वेग देतील. प्रगती व्यापक करतील. त्यातून अनेक क्षेत्रांत मेष व्यक्ती चमकत राहतील. गुरुवारच्या बुध- गुरू नवपंचम योगाच्या आसपास काही घटना अविस्मरणीय ठरणाऱ्या असतील. आर्थिक प्रश्न सुटतील, समाजात सन्मान मिळतील, प्रापंचिक जबाबदाऱ्या कमी होतील. शेतीची प्रकरणे मार्गी लावता येतील. राजकीय प्रतिष्ठा वाढेल. बुध-शुक्राची राश्यांतरे बौद्धिक आणि कला क्षेत्रात प्रभाव निर्माण करतील.
दिनांक : २८, १, २ शुभकाळ.
महिलांना : प्रयत्नाने कार्य मात्र साधता येईल.

परिणाम ठसठशीत होतील
भाग्यांत राहू, दशमांत गुरू यांच्यामुळे प्रवास सुरू राहील. आणि शुक्र, बुध, मंगळ राश्यांतरे प्रवास वेगवान करीत राहतील. त्यातून नवे संबंध- संपर्क प्रस्थापित होतील. त्यामुळे प्रपंच, प्राप्ती, कला, साहित्य, विज्ञान यामध्ये नवे परिणाम ठसठशीत होत राहतील. चतुर्थात असलेल्या शनीची सध्यातरी धास्ती नको. बुध-हर्षल केंद्रयोगात कागदपत्रे, आश्वासन, केलेली कृती यामधील फिरवाफिरव यश अडचणीत आणू शकते, याचे शनिवापर्यंत विस्मरण नको. सावधतेने पावले टाका.
दिनांक : २९, ३०, ३, ४ शुभकाळ
महिलांना : संसारात प्रसन्न राहाल. समाजात सन्मान मिळतील, नवीन उपक्रम सुरू कराल.

सफलता सोपी, पण..
पराक्रमी शनी, भाग्यात गुरू, मंगळवारी राशीस्थानी येत असलेला बुध, गुरुवारचा बुध- गुरू नवपंचमयोग यातून नवे प्रयोग, नव्या युक्ती, हाती येणारी महत्त्वाची कागदपत्रे यामुळे उलाढालीतील सफलता सोपी होत राहील. त्यामध्ये अष्टमातील राहूच्या उपद्रवामध्ये शुक्र, मंगळाची राश्यांतरे सहभागी होणार असल्याने सफलता आणि संधी यांचा झटपट लाभ उठवायला हवा. व्यापार, राजकारण, कला, साहित्य यात प्रत्येक शब्द, प्रत्येक मिनिट यांना महत्त्व येणार आहे, एवढे लक्षात ठेवा.
दिनांक : २८, १, २ शुभकाळ.
महिलांना : समस्या सुटतील, यश मिळेल.

गर्दी-गोंधळाचा काळ
साडेसाती, अष्टमात गुरू, व्ययस्थानी सूर्य, त्यात मंगळवारी बुध प्रवेश, प्रश्नांची गर्दी, विचारांत गोंधळ आणि कृती अस्थिर असे प्रकार अशा ग्रहकाळात होत असतात. संयम, शिस्त, कल्पकता यांचा उपयोग केला तर सप्तमातील राहू- शुक्र, मंगळाची राश्यांतरे साथ देतील. आणि प्रतिष्ठा सांभाळणारे यशही मिळवून देतील. अवास्तव साहस कार्यप्रांतात कटाक्षाने टाळा. श्री मारुतीची उपासना, आराधना, मन:शांतीची ठरेल, यशही सोपे करील. शुक्र- नेपचून नवपंचम योगात अनपेक्षित संकल्प सिद्धीस जाऊ शकतात.
दिनांक : २९, ३०, ३, ४ हा काळ अशाच स्वरूपाचा आहे.
महिलांना : झगडून यश मिळवावे लागणार आहे.

विजय मिळवाल
साडेसाती आणि राहु- केतू यांच्या अशुभ परिणामांना रोखून या वेळी सिंह व्यक्ती विजय प्रस्थापित करू शकतील. त्यात शुक्र, बुध, मंगळ यांचे सहकार्य राश्यांतरे होऊनही कमी होत नाही. हवामानाचा रागरंग पाहून केलेली कृ ती यश देईल. व्यापार, राजकारण, कला, साहित्य, शेती यामध्ये त्यातून प्रतिमा उजळून निघेल. बुध- गुरू नवपंचम योग बौद्धिक क्षेत्रात नवा प्रकाश देणारी शक्तीच ठरावी. प्रार्थनेची पुण्याई मन:शांती देत राहील.
दिनांक : २८ ते २ चंद्रभ्रमण प्रगतीचे आहे.
महिलांना : संधी मिळेल, प्रयत्नाचा वेग वाढवा, यशस्वी व्हाल.

अनिष्टता बंदिस्त कराल
पंचमात राहू आणि शुक्र, बुध, मंगळ यांची राश्यांतरे यामधून नवा विश्वास निर्माण होत राहील. प्रकरणे मार्गी लावता येतील. शनी- गुरूची अनिष्टता युक्ती युक्तीने काही काळ बंदिस्त करू शकाल. नवे संपर्क, संबंध सफलता निश्चित करतील. त्याचे प्रतिसाद व्यापार, प्राप्ती, राजकारण यावर उमटतील. नवे करार, कलाप्रांत गाजवतील. दशमात सूर्य प्रतिष्ठा मजबूत ठेवतो. बुध- हर्षल केंद्रयोगात दस्तऐवज आणि दिलेले शब्द सांभाळले तर यश अधिक चकचकीत होते. प्रवास संभवतात.
दिनांक : २९ ते ३ शुभ काळ.
महिलांना : यश मिळेल, निराशा संपेल. मन प्रसन्न राहील.

नवे प्रश्न त्रास देतील
चतुर्थातल्या राहूचे अनिष्ट परिणाम शुक्र- मंगळ राश्यांतरामुळे नव्या नव्या प्रश्नांमधून त्रास देत राहणं शक्य आहे. काही प्रश्न अटीतटीचे ठरतील. परंतु सूर्य, बुध, गुरू, शनी यांचं सहकार्य अनिष्टता इभ्रतीपर्यंत पोहोचणार नाही. नियमित उपक्रमांना धक्का बसू देणार नाही, परंतु बेसावध राहणे, अवास्तव साहस करणे आणि प्रलोभनांच्या मागे धावणे यामुळे पायावर धोंडा पाडून घेण्यासारखं होईल. संयम आणि सत्य या वेळी देवासारखं आपलं संरक्षण करतील.
दिनांक : १ ते ४ दरम्यान त्याची प्रचीती येईल.
महिलांना : प्रिय आप्तांच्या भेटी, नवीन कार्याशी संबंध, शुभवार्ता समजतील, वाद टाळा.

तडकाफडकी निर्णय नको
चतुर्थात गुरू, अष्टमात सूर्य, त्यात बुधाचा प्रवेश यामुळे वेळापत्रकात छोटे-मोठे बदल करावे लागतील. परंतु शनी-राहूचे सहकार्य आणि शुक्र-मंगळाची राश्यांतरे आधार देतील आणि प्रकरण निकालात काढण्यास उपयुक्त ठरतील. प्रपंचातले कलह, मिळकतीची प्रकरणं, आर्थिक देवघेव, भागीदारीतील समस्या यामध्ये तडकाफडकी निर्णय घेऊ नका. बुध, नेपच्यून नवपंचम योग शोधकार्यात, धार्मिक उपक्रमांत आनंद देतो. अचानक यात्रा संभवतात. बुध-हर्षल केंद्रयोगात महत्त्वाच्या वस्तू गहाळ होणे शक्य असते. सावध राहा.
दिनांक : ३०, ३, ४ शुभकाळ.
महिलांना : शोध घेऊन यश मिळवावे लागेल.

फायदा घ्या, विलंब नको
पराक्रमी गुरू, मकर-राहू भाग्यात शनी आणि बुध, गुरू नवपंचम योग, धनू व्यक्तींचा प्रभाव प्रस्थापित व्हावा असेच प्रतिसाद या ग्रहांमधून उमटणार आहेत. शुक्रवारी मंगळ षष्ठात येताच शत्रूची पळापळ सुरू होईल. आपले कार्यमार्ग निर्वेध होऊ लागतील. याचा फायदा उठवण्यास विलंब व्हायला नको. व्यवहार करारात बसवा आणि कृतीला प्रारंभ करा. व्यापार, अधिकार, राजकारण, आर्थिक देवघेव, मिळकतीची खरेदी-विक्री यांचा त्यात समावेश करायला हवा.
दिनांक : २८ ते २ शुभकाळ.
महिलांना : रागरंग बघून केलेल्या कृतींना यश मिळेल.

शासकीय नियम सांभाळा
राशिस्थानी राहू, कुंभ राशीत गुरू आणि शुक्र-मंगळाच्या राश्यांतरातून अष्टमातील शनीची नियंत्रित होणारी अनिष्टता मकर व्यक्तींच्या प्रयत्नात वेग येईल. विचारात उत्साह प्रकटेल आणि कृती यशस्वी ठरतील. असे शुभ परिणाम असले तरी व्यापार, राजकारण, अर्थप्राप्ती, प्रापंचिक प्रश्न यामध्ये मस्ती नको. आणि शासकीय नियमही सांभाळायला हवेत. त्यातून मिळणारे यश व्यापक, आकर्षक होईल. कलावंत चमकतील, शोध कार्यात प्रशंसा व्हावी. घरात आनंदाचे वातावरण असेल.
दिनांक : २९ ते ३ शुभकाळ.
महिलांना : प्रवास होतील, समाजात चमकाल, संसाराची गाडी रुळावर येईल.

सावध राहा, सरळ वागा
गुरू कुंभ राशीत, शनी सप्तमात, रवी- बुध पंचमात आणि बुध- गुरूचा नवपंचम योग व्यवहाराची बहुतेक समीकरणे अचूक सोडवता येतील. परंतु शुक्र-मंगळातील राश्यांतरातून काही परिणाम अचानक अडचणी आणू शकतात. त्यासाठी कार्यपद्धती सरळ ठेवणे, अवघड मार्गावर सावध राहणे एवढी पथ्यं शनिवापर्यंत ठेवली तर व्यापार, कला, साहित्य, राजकारण यामध्ये अपेक्षित यशाचा टप्पा सहज गाठता येईल. प्रवास कराल, शेतीच्या कामात आनंद वाटेल, परमेश्वरी चिंतनात एकाग्रता आणता येईल.
दिनांक : १ ते ४ शुभकाळ.
महिलांना : संधी साधा, यश मिळेल.

वाद-स्पर्धा टाळा
सूर्य, बुध, शनी, गुरू अशा ग्रहांच्या अशुभ काळात प्रयत्न-यशाचा समन्वय बुद्धी शक्तीच्या पुढे असतो. काही प्रसंग वादातून वादळ निर्माण करतात. प्रपंच, प्राप्ती, परिचित प्रतिष्ठा असे विभाग त्यात सापडण्याचा संभव असतो. लाभात राहू आणि शुक्र-मंगळाची राश्यांतरे देवासारखी साथ देतील आणि इभ्रत वाचवतील. नियमित कार्ये त्यातून सुरू ठेवता येतील. कठोर निर्णय, साहसी कृती कटाक्षाने टाळा. देवधर्म मन:शांती देईल.
दिनांक : २९, ३०, ३, ४ शुभकाळ.
महिलांना : झेपतील अशाच जबाबदाऱ्या घ्या. त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा.