Leading International Marathi News Daily

मंगळवार, ३० जून २००९

पाऊस पडून गेल्यावर मन भिरभिरता गारवा
पाऊस पडून गेल्यावर मन गारठा गारवा
खरंच! सौमित्रच्या तोंडून निघणाऱ्या या ओळी ऐकून अगदी वर्षांतल्या कोणत्याही दिवशी तुम्ही मनोमन गारवा अनुभवत असाल. त्यात आता खराखुरा पाऊस पडून गाण्यात वर्णन केल्याप्रमाणेच चहुकडे गारवा पसरल्यानंतर प्रत्येक तरुण मनात एक वेगळेच वातावरण निर्माण होत असते. पहिला पाऊस पडताच मातीचा दरवळणारा सुगंध सदैव तसाच राहावा असेच मनोमन वाटत असते. नकळत या पहिल्या पावसाच्या गोडव्यात हृदयात काही प्रसन्न भावना जन्म घेतात. आजुबाजूचा मंद गारवा त्यास अधिकच भरच घालतो.

लहान असतानाच आपण भावी आयुष्याची स्वप्नं रंगवत असतो. कधी ही स्वप्नं सत्यात उतरतात, तर कधी या स्वप्नांत रंग भरायचेच राहून जातात. पण आपली स्वप्नं कॅन्व्हासवर उतरवली ती संदीप पोपेरेने. लहानपणापासूनच चित्रकलेची आवड असल्याने आपण मोठं होऊन चित्रकार व्हायचं हे त्यानं आधीच ठरवलं होतं; परंतु घरची परिस्थिती बेताची. वडील शेतकरी असल्यामुळे शेतीची सारी कामे करीत संदीपला त्याचं स्वप्न पूर्ण करायचं होतं. संदीप म्हणतो की, अजूनही चित्रकला खेडय़ा-पाडय़ात पोहोचलेली नाही, त्यामुळे त्याकडे कोणी करियरच्या दृष्टिकोनातून पाहत नाही. मलाही खूप लोकांनी यासाठी विरोध केला आणि तिथूनच माझ्या संघर्षांला सुरुवात झाली, हे सांगताना त्याचे डोळे पाणावले. सुरुवातीला मी साईन बोर्ड, दिवाळी, गणपतीला घराच्या भिंती रंगवायचो. तेव्हा माझ्या शिक्षकांनी मला मार्गदर्शन केले.

प्रकाश पदुकोण, पुलेला गोपीचंद, अपर्णा पोपट अशा मोजक्याच नावांची परंपरा लाभलेल्या भारतीय बॅडमिंटनला गेल्या दशकभरात- सायना नेहवालच्या रूपाने एक भक्कम आधार मिळाला. गेल्याच आठवडय़ात जकार्ता येथे इंडोनेशियन ओपन ही अत्यंत उच्च दर्जाची सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धा जिंकून सायनाने पुन्हा एकदा भारतीय क्रीडा विश्वाचे लक्ष वेधून घेतले. लहान वयातच निरनिराळ्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये सातत्याने आपला ठसा उमटवत सायनाने तिच्यामधील गुणवत्तेची चुणूक दाखवली होती. विविध जागतिक स्पर्धामध्ये अनेक नामांकित उच्च दर्जाच्या मलेशियन, इंडोनेशियन खेळाडूंना हरवत तिने या स्पर्धेपूर्वीच जागतिक क्रमवारीत ७ व्या क्रमांकावर झेप घेतली. इंडोनेशियन ओपन जिंकून सातत्याने हा आनंद द्विगुणीतच केला.

प्रिय मिहिर..
हाय! अरे, दहावीचा रिझल्ट लागला परवा. आमच्या अनीशला ८७ टक्के मिळाले; पण कितीही मार्क मिळो
यांना समाधानच वाटत नाही. एवढसं तोंड करून बसला होता सबंध दिवस! अर्थात, त्याचंही काही फारसं चुकत नाही म्हणा! बाहेर स्पर्धा आणि टक्क्यांची रस्सीखेच एवढी वाढलीय, की वर्षभर अभ्यास करून इतके चांगले मार्क मिळवूनसुद्धा आपल्याला हव्या त्या ठिकाणी, हव्या त्या कोर्सला अ‍ॅडमिशन मिळेल याची काही शाश्वतीच नाही. त्यातच ९०:१०, पर्सन्टाईल, On line Admission्ल हे इतके घोळ इथे चालू आहेत. त्याचेही दडपण मुलांच्या मनावर येत असणार. पण मुलांना काय वाटतंय याचा विचार करण्याची कोणाला इच्छा आहे!! असो.

कॅम्पसवर ‘फ्रेम्स’ अनेक असतात, पण त्या ‘क्लिक’ करणं फार थोडय़ांना जमतं. आपमे हैं वह बात? तर मग उचला कॅमेरा आणि तुम्ही काढलेले फोटोज् campusmood@gmail.com वर पाठवा. अट एकच. फोटो कॉलेजशी, कॉलेज जीवनातील ‘हट के प्रसंगांशी आणि एकंदरीतच ‘कॅम्पसच्या मूड’शी मॅच होणारे हवेत. सवरेत्कृष्ट फोटोला ‘कॅम्पस मूड’मध्ये प्रसिद्धी दिली जाईल. आणि हो! फोटोला शीर्षक तसेच फोटोबरोबर तुमचे नाव, कॉलेज व फोन नंबर पाठवण्यास विसरू नका.

‘व्यावसायिकता व मानवतेचा समतोल’
विल्सन महाविद्यालयातील बीएमएसचे एकूण ३६ विद्यार्थी ‘साइफ’ (स्टुडण्ट्स इन फ्री एंटरप्राइज) या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या सहकार्याने यावर्षी धारावी येथील गरजू महिलांना सोबत घेऊन जेवणाचे डबे पुरवण्याचा व्यवसाय करीत आहेत. समाजातील दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात सामील करण्यासाठी ‘साइफ’ वेगवेगळ्या पद्धतींनी काम करते. याशिवाय अशा घटकांची प्रगती तरुणांमार्फत व्हावी आणि व्यावसायिक दृष्टिकोनांतून समाजाची प्रगती करण्याचे कौशल्य विकसित व्हावी हे या कार्यामागचे मुख्य उद्दिष्ट आहे.