Leading International Marathi News Daily

मंगळवार, ३० जून २००९

प्रादेशिक

विकासकामे वेळेत होणे महत्त्वाचे- राष्ट्रपती
मुंबई, २९ जून/प्रतिनिधी

वेगाने बदलणाऱ्या आजच्या युगामध्ये लोकांच्या वाढत्या अपेक्षांची योग्यप्रकारे पूर्ती कशी करता येईल, याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले पाहिजे. लोक प्रगतीसाठी आतूर झालेले आहेत आणि म्हणून विकासकामांची वेळेवर पूर्तता होणे अतिशय महत्वाचे आहे, अशा शब्दांत राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी आज महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींना चार खडे बोल सुनावले.

.. तर उच्च शिक्षणातील बदल आधीच घडले असते!
नीरज पंडित, मुंबई, २९ जून

उच्च शिक्षणातील बदलांसंदर्भात अहवाल देणाऱ्या प्रा. यशपाल समितीने सुचविलेल्या शिफारशींची याआधीच अंमलबजावणी करणाऱ्या ‘वीर जिजामाता टेक्निकल इन्स्टिटय़ूट’ (व्हीजेटीआय) या महाविद्यालयाला विनाकारण चौकशीच्या फेऱ्यांत अडकावे लागले आहे. या बदलांकडे जुन्याच चष्म्यातून पाहणाऱ्या काही शिक्षणतज्ज्ञांमुळेच ही नामुश्की ओढवल्याची चर्चा आहे.

पालिकेच्या जकातउत्पन्नात घट : विकास प्रकल्पांवर परिणाम होणार
बंधुराज लोणे, मुंबई, २९ जून

महापालिकेच्या उत्पन्नात सिंहाचा वाटा असणाऱ्या जकातीच्या उत्पन्नात चालू वर्षांत लक्षणीय घट होत आहे. परिणामी पालिकेच्या तिजोरीत ठणठणाट होण्याची चिन्हे असून विकासकामांवरही विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. आश्चर्य म्हणजे एवढय़ा महत्त्वाच्या खात्यासाठी पूर्णवेळ अधिकारी देण्याची गरज पालिका प्रशासनाला वाटत नसल्याचेही दिसून आले आहे.

पूर्णवेळ अधिकारीच नाही!
जकात विभागाच्या सहआयुक्त व्ही. राधा यांची काही महिन्यांपूर्वी बदली झाली. त्यांच्या काळात जकातवसुलीचे विक्रमी उत्पन्न झाले होते. जकातचोरी रोखणे, दलालांना आळा घालण्यासाठी त्यांनी धडक मोहीम हाती घेतली होती. तसेच रेल्वे, विमानतळ आणि इतर संस्थांकडूनही जकातवसुलीचा त्यांनी सपाटाच लावला होता. दलालांशी संधान बांधणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवरही त्यांनी अंकुश लावला होता. ठेकेदार, दलाल यांची बाजू घेऊन येणाऱ्या नगरसेवकांनाही राधा यांनी कधीच थारा दिला नाही. मात्र आता हे काम थंडावले असून जकातीसारख्या महत्वाच्या विभागाला पूर्णवेळ अधिकारीच देण्यात आलेला नाही. सध्या या विभागाचा अतिरिक्त भार एस. एस. शिंदे यांच्याकडे आहे. मात्र राधा यांच्या तुलनेत शिंदे खूपच कमी पडत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

यशच्या हत्येचा तपास घोंघावतोय अनिल शहा कुटुंबियांभोवतीच
डोंबिवली, २९ जून /प्रतिनिधी

यश शहा याच्या हत्ये प्रकरणातील धागा अजून पोलिसांना मिळालेला नाही. पोलीस या या प्रकरणाने चक्रावून गेले आहेत. या हत्येची सर्व सूत्रे पुन्हा अनिल शहा यांच्या कुटुंबियांभोवती फिरत असल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे. परिचित व्यक्तींचेच हे काम आहे आणि तो सुगावा लावण्याच्या मागावर आहोत, असे पोलीस सांगत आहेत.

आघाडी दोन्ही पक्षांच्या फायद्याची, पण निर्णय लवकर व्हावा - शरद पवार
मुंबई, २९ जून / खास प्रतिनिधी

आघाडीवरून काँग्रेसचे राज्यातील नेते वेगवेगळे इशारे देत असले तरी काँग्रेसचे नवी दिल्लीतील नेते राष्ट्रवादीबरोबर आघाडी कायम ठेवण्याच्या मताचे आहेत. आघाडी होण्याचे दोन्ही पक्षांच्या फायद्याचे असून, आघाडीचा निर्णय लवकरात लवकर व्हावा, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज व्यक्त केली.

कसाबविरुद्धचा सगळ्यात महत्त्वाचा पुरावा अभियोग पक्षातर्फे न्यायालयात सादर!
मुंबई, २९ जून / प्रतिनिधी

सीएसटी रेल्वे स्थानकात २६/११च्या रात्री पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब आणि अबू इस्माईल यांनी केलेला अंदाधुंद गोळीबार आणि बॉम्बस्फोटात जखमी झालेल्या चार साक्षीदारांनी आज न्यायालयात कसाबला ओळखले. चारपैकी तीन साक्षीदारांनी कसाबने केलेल्या गोळीबारात आपण जखमी झाल्याचे विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम. एल. टहलियानी यांना सांगितले.

कोटय़वधींच्या निर्मल स्वच्छतागृहांची लाचलुचपत खात्याकडून चौकशी
ठाणे, २८ जून/प्रतिनिधी

एमएमआरडीएच्या निर्मल एम.एम.आर योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या ३९८ वस्ती स्वच्छतागृहाच्या बांधकामांचा पुरताच बोजवारा उडाला असून, नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यात मूळ ठेकेदार असलेल्या स्वयंसेवी संस्थांनी शासकीय नियमांना हरताळ फासून नेमलेल्या उपकंत्राटदारांनी अपुऱ्या निधीमुळे स्वच्छतागृहांची कामे अर्धवट सोडली आहेत.

वांद्रे - वरळी सी लिंकचे आज उदघाटन
मुंबई २९ जून / प्रतिनिधी

देशातील पहिला सागरी सेतू, निव्वळ दोन केबल-स्टेडवर उभा राहिलेला वास्तूशिल्पाचा अप्रतिम कलाविष्कार, मुंबईत गेटवे ऑफ इंडियानंतर पाहण्यासारखे दुसरे आधुनिक पर्यटन स्थळ, आणि स्वतंत्रप्राप्तीनंतर भारतीय अभियंत्यांच्या कल्पकतेतून उभी राहिलेली पहिला विलोभनीय सागरी पुल अशा अनेक विशेषणांनी बहुचर्चित असलेल्या मुंबईतील वांद्रे वरळी सी लिंक सागरी सेतूचे आज दुपारी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या हस्ते उदघाटन होत आहे.

वीजेच्या प्रश्नावर पालिकेत राजकारण!
मुंबई, २९ जून / प्रतिनिधी

वीज दरवाढीबाबत पालिकेतील सत्ताधारी आणि विरोधी पक्षात राजकारण रंगले असून या प्रश्नावर महापौरांनी सभागृहात बोलण्याची संधी न दिल्याच्या निषेधार्थ विरोधकांनी आज सभात्याग केला.
विरोधी पक्षनेते राजहंस सिंह यांनी वीज दरवाढीबाबत हरकतीचा मुद्दा उपस्थित केला होता. यावर बोलण्याची संधी मिळावी अशी अनेक नगरसेवकांनी महापौरांना विनंती केली होती. मात्र महापौरांनी राजहंस यांचा हरकतीचा मुद्दा फेटाळून लावला आणि सभागृह नेते सुनील प्रभू यांना निवेदन करण्याची संधी दिली. त्यामुळे संतापलेल्या विरोधकांनी सभात्याग केला. या प्रश्नावर सभागृहात आवाज उठविण्याचे श्रेय घेण्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांत स्पर्धा लागल्याचे चित्र दिसत होते.

उद्यापासून हिरानंदानी ते सीएसटी बेस्ट सेवा
ठाणे,२९जून/प्रतिनिधी
वाढती लोकसंख्या आणि अपुरी पडणारी टीएमटीची सेवा लक्षात घेऊन बेस्ट ठाणेकरांच्या सेवेत रूजू झाली आहे. प्रवाशांकडून मिळणारा वाढता प्रतिसाद पाहून १ जुलैपासून हिरानंदानी इस्टेट (पातलीपाडा) ते सीएसटी अशी वातानुकुलीत सेवा सुरू करण्याचा निर्णय बेस्ट व्यवस्थापनाने घेतला आहे. त्यामुळे घोडबंदरवाशीयांना मुंबईला जाण्याचा रेल्वेऐवजी पर्यायी मार्ग उपलब्ध झाला आहे. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि भ्रष्टाचारात रुतलेल्या ठाणे परिवहन सेवेचा पुरताच बोजवारा उडाला असल्याने ठाणेकर प्रवाशांच्या सेवेत बेस्टला रुजू व्हावे लागले. ठाण्यात बेस्टची सेवा सुरू झाली आणि घोडबंदरवाशीयांचा त्रास कमी झाला. ही सेवा विस्तारत बेस्टने ब्रह्मांड, लोकमान्यनगर, वृदांवन आदी भागात सेवा देऊन वातानुकुलीत सेवेवर भर दिला.
आता १ जुलैपासून हिरानंदानी इस्टेट ते सीएसटी अशी वातानुकुलीत बेस्ट सेवा विस्तारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना रेल्वेऐवजी बेस्टचा पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे.

मुंबई विद्यापीठ सिनेटवर प्रा. मीरा नार्वेकर यांची निवड
मुंबई, २९ जून / प्रतिनिधी

मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर आज प्रा. मीरा मिलिंद नार्वेकर यांची निवड झाली. विद्यापीठाच्या स्थायी समितीच्या बैठकीत आज झालेल्या निवडणुकीत मीरा नार्वेकर यांनी ‘बुक्टू’च्या उमेदवार प्रा. ट्रावेरीस ग्रिसालिया यांचा ५ - ३ असा दोन मतांनी पराभव केला. विद्यापीठ सिनेटवरील शिक्षक मतदारसंघातील प्रतिनिधीची बुक्टूच्या तपोती मुखोपाध्याय यांच्या रुपाने असलेली एक जागा रिक्त झाल्याने स्थायी समितीच्या बैठकीत आज निवडणूक झाली. प्रा. मीरा नार्वेकर या पार्ले येथील संघवी महाविद्यालयात अध्यापन करतात.

जलजोडण्यांच्या दुरुस्तीचा भार आता ग्राहकांच्या माथी मारण्याचा प्रयत्न
मुंबई, २९ जून / प्रतिनिधी

मुंबईकरांना पालिकेकडून देण्यात येणाऱ्या जलजोडण्या पंधरा वर्षांनी बदलणे बंधनकारक करण्याचा आणि त्याचा खर्च ग्राहकांच्या माथी मारण्याचा एक प्रस्ताव स्थायी समितीत चर्चेसाठी सादर करण्यात आला आहे. शहरातील इमारतींचे दर पंधरा वर्षांनी परिक्षण करण्यात येते. तसेच परिक्षण जलजोडण्यांचे करावे आणि त्याच्या दुरुस्तीचा खर्च ग्राहकांनी आणि पालिकेने करावा, असा हा प्रस्ताव आहे. या जलजोडण्या जमिनीखाली असल्याने पाण्याची गळती होणे, त्या खराब होणे अशा तक्रारी येत असतात. त्यामुळे दर पंधरा वर्षांनी या जलजोडण्यांची पाहणी करून ग्राहकांना त्या बदलणे, दरुस्त करणे बंधनकारक करावे, असे या प्रस्तावात म्हटले आहे. या प्रस्तावाबाबत आता सत्ताधारी आणि विरोधक काय भूमिका घेतात ते १ जुलै रोजी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत स्पष्ट होईल.