Leading International Marathi News Daily

मंगळवार, ३० जून २००९

(सविस्तर वृत्त)

जॅग्वॉर व लॅण्डरोव्हर ..
बस नामही काफी है
प्रतिनिधी

 

टाटा मोटर्सने जॅग्वॉर व लॅण्डरोव्हर विकत घेण्याचा घेतलेला निर्णय हा धाडसी होता व अशा कंपन्यांच्या आरामदायी व अलिशान मोटारींना पुन्हा एकदा वैभव प्राप्त करून देऊ शकू, असा आशावाद व्यक्त करून टाटा मोटर्सकडे आज हे ब्रॅण्ड आहेत हीअभिमान वाटावे अशी बाब आहे, अशा शब्दात टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
जॅग्वॉर व लॅण्डरोव्हरला भारतीय बाजारपेठेत आता दाखल करण्यात आले आहे ते टाटा मोटर्सने घेतलेल्या त्या निर्णयामुळे. रविवारी या दोन्ही ब्रॅण्डच्या मोटारी भारतीय बाजारपेठेत दाखल करण्यात आल्या. जगामध्ये अतिशय लोकप्रिय व प्रेस्टिज मानल्या जाणाऱ्या या मोटारींचे भारतातील आगमन आता अशा मोटारी खरेदी करणाऱ्या खास वर्गातील भारतीय ग्राहकांना आनंददायी ठरणार आहे. जून २००८ मध्ये २.३ अब्ज डॉलरना अमेरिकेच्या फोर्ड मोटरकडून या दोन ब्रॅण्डची खरेदी टाटा मोटर्सने केली. या दोन ब्रॅण्डच्या मोटारींच्या लोकप्रियतेमागे खूप मेहनत व संशोधन झाले आहे. उत्पादनापर्यंत हे ब्रॅण्ड आणण्यासाठी त्यामागे झालेली मेहनत म्हणूनच कारणी लागली होती व हे ब्रॅण्ड जगात अनेक ठिकाणी लोकप्रिय झाले होते.
सीजय हाऊस या शोरूममध्ये टाटा मोटर्सने हे दोन्ही ब्रॅण्ड ठेवले असून भारतातील मोटारींच्या वाढत्या संख्येत आता आणखी अलिशान श्रेणीतील गाडय़ांची ही भर पडली आहे.
सलून पद्धतीमधील जॅग्वॉर एक्सएफ, एक्सएफआर आणि एक्सकेआर या तीन श्रेणींमध्ये असून युटिलिटी सदरात असलेली लॅण्डरोव्हर डिस्कव्हरी ३, रेंजरोव्हर स्पोर्ट आणि रेंजरोव्हर अशा तीन प्रकारांमध्ये असणार आहे. खरे म्हणजे या मोटारींना अलिशानपणा, गती, ताकद आणि भक्कमपणा, सामथ्र्यपूर्ण गती अशी वैशिष्टये हेच त्यांचे सौंदर्य ठरावे. ‘बस नामही काफी है’ इतकीच ओळख जॅग्वॉर व लॅण्डरोव्हर यांना पुरेशी ठरते.