Leading International Marathi News Daily

मंगळवार, ३० जून २००९


सेतू बांधला सागरी..
आठ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर वांद्र-वरळी सागरी सेतू पूर्ण झाला.. या सेतूचे आज उद्घाटन होणार आहे. उद्घाटनाच्या पूर्वसंध्येला ‘लेझर शो’ने उजळून निघालेला सेतू.. (छाया : वसंत प्रभू)

८० वर्षांचा रॉक स्टार..
प्रतिनिधी

सुनीता संचेती.. चारचौघांसारखी तिचीही रंगीबेरंगी स्वप्ने होती. पण वयाच्या १६ व्या वर्षी मज्जारज्जूचा विकार जडला आणि त्यानंतर स्वप्ने साकारणे तर राहू द्या; साधे सामान्यांसारखे जगणेही मोठे आव्हान होऊन तिच्यासमोर उभे ठाकले. दीपा मलिक.. विविध क्रीडाप्रकारांत २५ सुवर्णपदके, २ लिम्का रेकॉर्डस्, दीपाची क्रीडाक्षेत्रातील कारकीर्द वयाच्या ३६ व्या वर्षी सुरू झाली, आणि त्याला कारण ठरला तिच्या मज्जारज्जूचा विकार.. या विकारामुळे दीपाचे जीवन आमूलाग्र बदलले.

पंचनामा श्वेतपत्रिकेचा
पाणीपुरवठय़ाचे गणित जुळण्यासाठी उजाडणार २०२१ साल!

संदीप आचार्य

गेल्या दोन दशकांपासून पाण्याची मागणी आणि पुरवठा यांचे गणित बिघडण्यास सुरुवात झाल्याचे दिसून येते. वाढत्या अनधिकृत झोपडय़ा राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडून विविध विकास कामांसाठी देण्यात आलेले अतिरिक्त चटई क्षेत्र कारणीभूत असून मुंबईची पाण्याची गरज सर्वार्थाने भागविण्यासाठी २०२१ साल उजाडेल, असे पालिकेच्याच श्वेतपत्रिकेवरून दिसून येते.


अॅड‘मिशन’
अकरावीच्या विनाअनुदानित अभ्यासक्रमांसाठी भरमसाठ शुल्क

प्रतिनिधी
अकरावीच्या विनाअनुदानित अभ्यासक्रमांसाठी संस्थाचालकांनी भरमसाठ शुल्क निश्चित केले असून हे पाच ते ४० हजार रूपयांदरम्यान आहे. जवळपास दीडशे महाविद्यालयांमध्ये असे मनमानी शुल्क निश्चित करण्यात आले आहे. अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या माहिती पुस्तिकेतूनच ही धक्कादायक बाब समाोर आली. संस्थाचालकांच्या या मनमानीमुळे अगोदरच प्रवेशाची चिंता लागून राहिलेल्या विद्यार्थी-पालकांचे आता या भरमसाठ शुल्कामुळे तोंडचे पाणी पळाले आहे.

प्रवास हा नक्षत्राचा
आठवणींची शिदोरी आणि लोकसंगीताची मैफल

प्रतिनिधी

लोकशाहीर विठ्ठल उमप वय वष्रे ७९ आणि ज्येष्ठ गायिका सुलोचना चव्हाण (माई) वय वष्रे ७७.. महाराष्ट्राच्या लोकसंगीताचा अभिजात आणि समृद्ध वारसा जपणारी दिग्गज मंडळी.. शुक्रवारी ‘प्रवास हा नक्षत्राचा’ या कार्यक्रमानिमित्त शिवाजी नाटय़मंदिरात एक सुमधुर मैफल रंगली.. आणि एकमेकांच्या साक्षीने लोकसंगीताच्या अवकाशातील या ध्रुवताऱ्यांचा प्रवास उलगडत गेला, तेव्हा सारीच रसिकमंडळी मुग्ध झाली..

मुंबईत विभागात सेना-काँग्रेस ‘आघाडी’ची मुसंडी
मध्य रेल्वे कर्मचारी पतपेढीवर ‘एनआरएमयू’चा लाल बावटा

प्रतिनिधी

मध्य रेल्वे कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या गेल्या आठवडय़ात झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत २६६ पैकी १६४ जागाजिंकून ‘नॅशनल रेल्वे मजदूर युनियन’ने (एनआरएमयू) पतसंस्थेवर आपले वर्चस्व कायम राखले आहे. मात्र त्याचवेळी सेंट्रल रेल्वे मजदूर संघ (सीआरएमएस) आणि रेल कामगार सेनेच्या ‘आघाडी’नेही मुंबई विभागात ७७ पैकी २५ जागाजिंकून जोरदार मुसंडी मारली आहे.

उत्तम खोब्रागडे यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार
प्रतिनिधी

बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक उत्तम खोब्रागडे यांची ‘इंटरनॅशनल अचिव्हर्स अॅवॉर्ड’ या प्रतिष्ठित पुरस्काराकरिता निवड झाली आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा २८ ऑगस्टला बँकॉक येथील इंटरनॅशनल अचिव्हर्स समिटमध्ये होणार आहे. या शिखर परिषदेमध्ये विविध क्षेत्रांमधील आणि देशांमधील ३०० हून अधिक प्रतिनिधी सहभागी होतील. भारतीय अर्थव्यवस्था प्रगती व विकासाकडे वाटचाल करीत आहे व बेस्ट उपक्रमामध्ये सार्वजनिक हिताच्या दृष्टिकोनातून बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापकांनी त्यांच्या तीन वर्षांच्या कारकिर्दीमध्ये वाहतूक व विद्युतपुरवठा शाखेमध्ये सुरू करण्यात आलेले अलीकडचे विशेष प्रकल्प यासाठी विचारात घेतले आहेत. यामध्ये उत्तम खोब्रागडे यांच्या देण्यात आलेल्या लक्षणीय योगदानाबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यक्तींच्या हस्ते त्यांना ‘इंटरनॅशनल अचिव्हर्स अॅवॉर्ड’ प्रदान करण्यात येईल.

नवोदित कलावंतांना आवाहन
प्रतिनिधी : श्री वझिरा गणेश निर्मिती संस्था, बोरिवली या संस्थेतर्फे स्त्री-भ्रुण हत्या, एड्स या प्रश्नांवर जनजागृतीसाठी विनामूल्य नाटय़प्रयोग सादर करण्यात येतात. या नाटय़प्रयोगांसाठी कलाकारांची आवश्यकता आहे. १८ ते ३० वर्षे वयोगटातील कलाकारांना प्राधान्य देण्यात येईल. अधिक माहितीसाठी मृणालिनी बेंद्रे (९९६९३०९५८५) व अमित तांबे (९८६९४५७३००) यांच्याशी संपर्क साधावा.

गौरी गणपतीसाठी गाडय़ांची सोय
प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्हा मित्रमंडळातर्फे गौरी-गणपतीसाठी गावी जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बस सेवेचे आयोजन केले आहे. या गाडय़ा मालवण, सावंतवाडी, देवगड व विजयदुर्गपर्यंत २०-८-२००९ व २१-८-२००९ रोजी संध्याकाळी ठीक ५ वाजता डोंबिवलीहून सोडण्यात येणार आहेत. आगाऊ आरक्षण ०१-०७-२००९ मंडळाच्या जनसंपर्क कार्यालयात सुरू होणार आहे. संपर्क- ९८६९४४८४१४.