Leading International Marathi News Daily

मंगळवार, ३० जून २००९

सर्व महाविद्यालये गर्दीने तुडुंब
गुणवत्ता वाढल्याने प्रवेशासाठी जीवघेणी स्पर्धा
नागपूर, २९ जून/प्रतिनिधी
दहावीचे निकाल जाहीर होताच शहरातील महाविद्यालयांची जबरदस्त कमाई सुरू झाली आहे. निकालानंतर अवघ्या तीन दिवसांत सर्वच महाविद्यालयात विज्ञान आणि अन्य विशेष अभ्यासक्रमांच्या असणाऱ्या जागांच्या तुलनेत चारपट प्रवेश अर्जाची विक्री झाले आहे. यंदा गुणवत्तेची स्पर्धा मोठी असल्यामुळे विद्यार्थी प्रवेशासाठी तगमग करीत असून ओळख, शिफारशींचा जोरदार वापर सुरू आहे.

अवघाचि संसार सुखाचा करीन ।
आनंदे भरीन तिन्ही लोक ।।

श्रद्धा आणि बुद्धी ही मानवजातीला मिळालेली फार मोठी देणगी आहे. श्रद्धा आणि विश्वास हा मानवी जीवनाचा पाया असून, ज्ञानलालसा हे ध्येय असलं पाहिजे, असं सर्व संतांना वाटतं. ईश्वराच्या सगुण-निर्गुण अस्तित्वाविषयीच्या शंका-कुशंकांना संतांच्या जीवनात स्थान नाही. ‘रूप पाहता लोचनी । सुख झाले हो साजणी ।। ही संतांची सुखानुभूती आहे. योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजणी असं ज्ञानदेव निक्षून सांगतात. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवोनिया ।। अशी तुकोबांची अनुभूती आहे. म्हणूनच भेदातीत होऊन सृष्टीच्या कणाकणात सर्वाभूती ते परमचैतन्य अर्थात विष्णुतत्त्व पाहायची दिव्य जीवनदृष्टी मिळालेल्या जगद्गुरू तुकाराम महाराजांना सर्व जग ‘विष्णुमय’ भासतं । विविधतेने नटलेल्या या सृष्टीच्या मुळाशी एकमेवाद्वितीय चैतन्य आहे.

बीपीएड रॅकेटमधील भरडलेल्या विद्याथ्यरंना फुटला कंठ
नागपूर, २९ जून / प्रतिनिधी

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात सध्या गाजत असलेल्या बीपीएड परीक्षेत पैसे देऊन उत्तीर्ण करणाऱ्या रॅकेटच्या विरोधात आणखी काही विद्यार्थ्यांनी मौन सोडले असून आज तेही प्र-कुलगुरूंच्या भेटीला विद्यापीठात दाखल झाल्याने तक्रारकर्त्यां विद्यार्थ्यांची एकूण संख्या ३४ झाली आहे. हे सर्व परप्रश्नंतीय विद्यार्थी ‘माफीचे साक्षीदार’ झाले असून आणखी कोणकोण या रॅकेटमध्ये सामील आहेत, याचा विद्यार्थ्यांच्या मदतीने छडा लावला जात आहे. विद्यार्थ्यांनी या प्रकरणात स्वत:हून पुढे यावे, असे आवाहन प्र-कुलगुरू गौरीशंकर पाराशर यांनी केले आहे.

घरकुल व रस्त्यांच्या कामात तडफ
संदीप रेवतकर

राष्ट्रवादी काँग्रेसचे हिंगणघाटचे आमदार राजू तिमांडे यांची आमदार म्हणून ही पहिलीच पंचवार्षिकी. राजकीय वारसान हक्काने ते या पदावर पोहोचलेले नाहीत. जे काही मिळवले ते स्वकष्टाने. महाविद्यालयीन निवडणुकांपासून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. हिंगणघाट पालिका निवडणुकीत त्यांनी पराभवाचे तोंड बघितले पण, त्यानंतर पंचायत समिती सदस्य म्हणून त्यांनी त्यांच्या धडपडय़ा स्वभावाची सगळ्यांना साक्ष पटवली.

विदर्भातील वारकरी पंढरीकडे..
नागपूर, २९ जून / प्रतिनिधी
सुखी संसाराची सोडुनिया गाठ, पाऊले चालती पंढरीची वाट.. आषाढी एकादशीला चार दिवस शिल्लकअसून विदर्भातील विविध ठिकाणचे पाचशेहून अधिक वारकरी वारीत सहभागी झाले आहे. नागपुरातील अनेक वारकरी पंढरपूरला जाण्यासाठी आळंदीपासून निघालेल्या तुकोबारायाच्या पालखीत विठ्ठलनामाचा गजर करीत सहभागी झाले आहेत. आषाढी वारी म्हटली की कोणाला निमंत्रण नाही व सामानाची जमवाजमव नाही.

मुरली मनोहर जोशींची नागपुरात शैक्षणिक धोरणावर संघ नेत्यांशी चर्चा
नागपूर, २९ जून / प्रतिनिधी
केंद्र सरकारने प्रस्तावित केलेल्या शैक्षणिक धोरणावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील विविध संघटनांची भूमिका जाणून घेण्यासाठी नागपुरात आल्याचे भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री मुरली मनोहर जोशी यांनी विमानतळावर पत्रकारांशी बोलताना सांगितले. येत्या बुधवारी दिल्लीत भाजपचे मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांची बैठक होत असून त्यात पक्षाच्या भूमिकेवर शिक्कामोर्तब करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

विदर्भाला लाभणार पहिली पूर्णवेळ कला व सांस्कृतिक अकादमी
रिमा लागू-वामन केंद्रेंच्या हस्ते रविवारी उद्घाटन
नागपूर, २९ जून / प्रतिनिधी
विदर्भाच्या कला व सांस्कृतिक क्षेत्रातील होतकरू तरुण-तरुणींना एकाच छत्राखाली व्यावसायिक पद्धतीने शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या ठाकरे आर्ट अँड कल्चरल अ‍ॅकेडमीचे येत्या रविवारी, ५ जुलै रोजी हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री रिमा लागू आणि मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ दिग्दर्शक वामन केंद्रे यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे, अशी माहिती अकादमीचे प्रमुख सल्लागार शरद ठाकरे आणि संचालिका प्रिती धापुलकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

पोलीस खात्याकडून जागरूक नागरिकाचीही दिशाभूल
वस्तुस्थिती दडपणे अंगलट आले
नागपूर, २९ जून/ प्रतिनिधी

माहितीच्या अधिकाराखाली विचारण्यात आलेल्या प्रश्नांची खोटी माहिती देऊन शहर पोलिसांनी संबंधिताची, तसेच नागरिकांचीही दिशाभूल करण्याचा प्रकार एका जागरूक नागरिकामुळे उघडकीला आला आहे. ‘लोकसत्ता’मध्ये प्रकाशित वृत्ताच्या आधारे ही माहिती विचारण्यात आली होती. गेल्या ३ मे रोजी रात्री हॉटेल प्रश्नईडसमोर चुकीच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एका नगरसेवकाच्या कारला पोलिसांनी जामर लावल्यामुळे संतापून त्यांनी सुमारे २५ मिनिटे या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक अडवून धरली होती.

१० जुलैपासून सर्व भारतीय भाषा संमेलन
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येणार
नागपूर, २९ जून / प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीतर्फे १० ते १२ जुलै दरम्यान सर्व भारतीय भाषा संमेलन आयोजित करण्यात आल्याची माहिती अकादमीचे सदस्य सचिव जयप्रकाशसिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली. संमेलनाचे उद्घाटन आयएमए सभागृहात दहा तारखेला सकाळी दहा वाजता मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते होईल.

दाखले, प्रमाणपत्रे वेळेत मिळेनात!
विद्यार्थी, नागरिकांमध्ये नाराजी
नागपूर, २९ जून/प्रतिनिधी

दहावी आणि बारावीचा निकाल लागल्यानंतर नवीन प्रवेश तसेच विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशाच्या तसेच नोकरी संदर्भातील प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक असणारी प्रमाणपत्रे व महत्त्वपूर्ण कागदपत्रे मिळण्यास प्रचंड विलंब होत असल्याने विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. महसूल खात्याकडे पुरेसा कर्मचारीवर्ग नसल्यामुळे या गैरसोयीमध्ये आणखीनच भर पडली आहे.

खाण उद्योगावर मंदी आणि पर्यावरणवाद्यांचे सावट -चॅटर्जी
नागपूर, २९ जून / प्रतिनिधी

अर्थव्यवस्थेवर असलेले मंदीचे सावट आणि पर्यावरणवादी संस्थांकडून होणारा विरोध हे भारतीय खाण उद्योगाच्या विकासातील प्रमुख अडथळे असल्याने सध्या एकूणच व्यवसायावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे उत्पादन क्षमता, खनिजांच्या किमती आणि निर्यात व्यवसायावरही याचा विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे या उद्योगाला चालना देण्यासाठी सरकारने काही सकारात्मक पावले उचलण्याची गरज असल्याचे आवाहन इंडियन ब्युरो ऑफ माईन्सचे खनिज अर्थतज्ज्ञ प्रश्न.के.के. चॅटर्जी यांनी केले.

एलआयसीची ‘जीवन साथी प्लस’
पती, पत्नी दोघांनाही एकाच पॉलिसीत सुरक्षा
नागपूर, २९ जून/प्रतिनिधी

आरोग्य, पेन्शन आणि कर्ज यासारख्या गरजा लक्षात घेऊन भारतीय आयुर्विमा महामंडळाने ‘जीवन साथी प्लस’ ही नवी योजना ग्राहकांसाठी सादर केली आहे. मध्यमवर्गीय क्षेत्रातील ग्राहकांना लक्षात घेऊन एलआयासीने ही योजना सादर केली असल्याचे नागपूर विभागाचे विभागीय व्यवस्थापक पी. दासगुप्ता यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. एलआयसीने ही योजना नव्या स्वरूपात सादर केली आहे.

विदर्भात पेरणीची लगबग
* मूग व उडिदाच्या क्षेत्रात घट
*सोयाबीन व कपाशीला पसंती
नागपूर / अमरावती, २९ जून / प्रतिनिधी

गेल्या दोन दिवसात झालेल्या दमदार पावसामुळे विदर्भात पेरणीच्या कामांना सुरुवात झाली असली तरी मान्सूनच्या पावसाचे उशिरा झालेले आगमन पीक नियोजनावर परिणाम करणारे ठरले आहे. यंदाच्या खरीप हंगामात मूग, उडीद पिकाच्या पेऱ्यात २० ते ३० टक्के घट तर सोयाबीन आणि कपाशीची पेरणी समान प्रमाणात राहील, असा अंदाज कृषी खात्यातील सूत्रांनी वर्तवला आहे.

जातीविहिन समाजाची निर्मिती झालीच नाही
आरक्षणावरील परिसंवाद वक्त्यांचा सूर
नागपूर, २९ जून / प्रतिनिधी

अखिल भारतीय धम्मसेनेतर्फे राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त ‘शाहू महाराजांचे आरक्षण धोरण आणि वर्तमान आरक्षण धोरण’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. रवि शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिसंवादात प्रश्न. जैमिनी कडू, किर्तनकार अशोक सरस्वती व प्रश्न. देविदास घोडेस्वार यांनी विचार मांडले. राजर्षी शाहू महाराजांनी तत्कालिन समाजव्यवस्थेवर आणि राज्य यंत्रणेवर प्रस्थापित ब्राह्मणी वर्चस्वाला मात देण्यासाठी आणि सामाजिक समतेच्या स्थापनेची प्रक्रिया गतिशिल करण्यासाठी अस्पृश्यांसहीत सर्वच मागासवर्गीयांच्या शिक्षणाचा पुरस्कार केला. या वर्गांनी शिक्षणासाठी प्रवृत्त व्हावे म्हणून इ.स. १९०२ मध्ये शासकीय सेवेत ५० टक्के आरक्षणाची घोषणा केली. शैक्षणिक उत्थानासाठी स्वतंत्र शाळा काढल्या. परंतु शाळांमुळे सामाजिक समतेच्या प्रक्रियेला बाधा येते हे जाणून महाराजांनी १९१९ ला आदेश काढून स्वतंत्र शाळा बंद केल्या आणि सर्वच जाती धर्माची मुले एकाच सरकारी शाळेत शिकतील, असे घोषित करून शिक्षणाचा प्रसार केल्याचे प्रश्न. देविदास घोडेस्वार यांनी सांगितले. जातीव्यवस्था नष्ट करून जातीविहिन समाजाची निर्मिती हा आरक्षणाचा हेतू आहे. पन्नास वर्षापासून आरक्षण धोरण राबविण्यात येत असूनही जातीविहिन समाजरचना निर्मितीचा हेतू साध्य झाला नाही, असेही वक्तयांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रश्नस्ताविक भय्याजी खैरकर यांनी केले तर संचालन दिनेश अंडरसहारे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुरेश तेलंग, डॉ. मनोज मेश्राम, राजेश रायपुरे, सोपान बेताल, नागेश वानखेडे आदी कार्यकर्त्यांंनी परिश्रम घेतले.

‘हिडन एक्सप्रेशन्स’चे उद्घाटन
नागपूर, २९ जून / प्रतिनिधी

सिस्फाच्या प्रश्न. ज्योती सुताणे यांनी रेखाटलेलेल्या ‘हिडन एक्सप्रेशन्स’ या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन दंत शल्यिचिकित्सक डॉ. अनिल पिंपळापुरे यांच्या हस्ते करण्यात आले. सिस्फाकी छोटी गॅलरीत झालेल्या या कार्यक्रमाला संस्थेचे सचिव निखिल मुंडले व अधिष्ठाता चंद्रकात चन्न्ो उपस्थित होते. यावेळी डॉ. पिंपळापुरे म्हणाले, निसर्गापासून मनुष्य नेहमीच प्रेरीत होतो व सुप्त किंवा दडलेल्या भावना अभिव्यक्ततीत रूपांतरीत करीत असतो. मी स्वत पक्षीमित्र आहे आणि निसर्गात रमणे ही मुख्य आवड असल्याने सुताणे यांनी रेखाटलेल्या चित्रांनी सुखावलो. हिडन एक्सप्रेशन्स या चित्रप्रदर्शनातील ज्योती सुताणे यांच्या भावना क्षितीजाच्या पलिकडे घेऊन जातात. दगड, शिळांच्या माध्यमाने मानवाने त्याची अभिव्यक्ती साकारली, तसेच दगडाच्या चेहऱ्यावरील भाव ज्योती सुताणेंनी अचूक टिपले आहेत. कधी त्रिमितीत घेऊन जाणारी तर कधी चित्राच्या पृष्ठभागावरच रेंगाळणारी स्पेस, कधी वास्तविक तर कधी अमूर्त वाटणारी घटक मांडणी या प्रदर्शनाच्या माध्यमातून प्रेक्षकांशी हितगुज करीत आहे. या प्रदर्शनात ज्योती सुताणे यांनी साकारलेले १२ बाय ५ फूटाचे चित्र आकर्षण ठरले आहे. १ जुलैपर्यंत सायंकाळी ४.३० ते ८.३० पर्यंत हे प्रदर्शन रसिकांसाठी खुले राहील.

सहामाही प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या परीक्षा ७ जुलैपासून
नागपूर, २९ जून / प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या सहामाही प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या परीक्षा येत्या ७ जुलैपासून सुरू होत आहेत. मंडळाचे व्यवसाय प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालवणाऱ्या संस्थाचालकांनी जुलै २००९ मध्ये होणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांच्या कार्यालयातून वेळेत प्रश्नप्त करून घ्यावे. अधिक माहितीसाठी २५६१४८१ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

शिक्षकांसाठी शालेय स्तरावर नवोपक्रम स्पर्धा
नागपूर, २९ जून / प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत २००९-२०१० या शैक्षणिक वर्षासाठी महाराष्ट्र राज्यातील प्रश्नथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी शालेय स्तरावरील नवोपक्रम स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. संशोधनात्मक कार्याची आवड असणाऱ्या शिक्षकांनी या स्पध्रेत भाग घ्यावा, असे आवाहन परिषदेने केले आहे. शिक्षकांनी त्यांच्या उपक्रमाबद्दलची माहिती चार प्रतीमध्ये आवश्यक त्या प्रमाणपत्रासह संबंधित जिल्हय़ाच्या बीएड कॉलेजमधील विस्तार सेवा केंद्राकडे येत्या १५ ऑक्टोबपर्यंत पोहोचतील या बेताने पाठवावी. परिषदेकडे परस्पर आलेले नवोपक्रम स्वीकारले जाणार नाहीत. या स्पध्रेच्या सविस्तर माहितीसाठी संबंधित बीएड कॉलेजमधील जिल्हा विस्तार सेवा केंद्र जिल्हय़ाचे शिक्षणाधिकारी किंवा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्रश्नचार्य यांच्याशी संपर्क साधावा.

पशुचिकित्सकांचे काम बंद आंदोलन सुरूच
नागपूर, २९ जून / प्रतिनिधी

पशुसंवर्धन खात्यातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे अविवेकी व उदासीन धोरण तसेच प्रलंबित मागण्याप्रकरणी पदविकाधारक, प्रमाणपत्रधारक पशुचिकित्सकांचे काम बंद आदोंलन अद्यापही सुरू आहे. या आंदोलनामुळे ग्रामीण भागातील पशुवैद्यकीय सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. राज्यातील सुमारे चार कोटी पशुधन व ३.५ कोटी कुक्कुट पक्ष्यांच्या आरोग्याची व व्यवस्थापनाची काळजी या संवर्गातील कर्मचाऱ्यांकडून ग्रामीण क्षेत्रात घेतली जाते. या संवर्गाच्या सेवा ग्रामीण शेतकरी व पशुपालकांनी तसेच, सरकारने प्रशंसित केल्या आहेत. या आंदोलनात राज्यातील पशुसंवर्धन खात्यातील सेवारत असलेल्या तसेच, जिल्हा परिषदअंतर्गत कार्यरत असलेले ३ हजार पदविकाधारक, प्रमाणपत्रधारक, पशुचिकित्सक सहभागी झाले आहेत.

आर्थिकदृष्टय़ा मागास गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना
नागपूर, २९ जून / प्रतिनिधी

दहावीच्या परीक्षेत ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या आर्थिकदृष्टय़ा मागास विद्यार्थ्यांसाठी इन्फाय फाऊंडेशनतर्फे शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी मदत व्हावी म्हणून ही शिष्यवृत्ती देण्यात येत असून पात्रतेसाठी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. शिष्यवृत्तीसंदर्भात अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी किंवा त्यांच्या पालकांनी ५८०, शुभांकर, १ ‘ए’ मेन रोड, जयनगर, सातवा प्लॉट, बंगलोर या पत्यावर किंवा सरस्वती- ९९००९०६३३८, शिवकुमार- ९९८६६३०३०१, बिंदू- ९९६३५३४६६७ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

संत गुलाबबाबांचा आजपासून जन्मोत्सव
नागपूर, २९ जून / प्रतिनिधी

श्री संत गुलाब बाबांचा जन्मोत्सव सोहोळा सिरपेठ येथील श्री संत गुलाबबाबा सेवा आश्रम येथे उद्या, ३० जूनपासून दोन दिवस आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.मंगळवारी, ३० जूनला सकाळी ७ वाजता स्वामी रामदेवबाबा पतंजली योगपीठाचे प्रशिक्षक प्रभाकर सावळकर व प्रतिभा सावळकर तसेच, पतंजली योग संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. नामदेव फटिंग यांच्या उपस्थितीत नि:शुल्क योग प्रश्नणायाम शिबीर होईल. सकाळी १० वाजता डॉ. जयंत इटकेलवार यांच्या सहकार्याने नि:शुल्क रोग निदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. सायंकाळी ५ वाजता हरिपाठ, आरती आणि रात्री ६.३० वाजता नाम संकिर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी, १ जुलैला सकाळी ७.३० वाजता श्रींचे अभ्यंग स्नान, पूजा, आरती, सकाळी ९ वाजता पालखी व रथ पूजन, ९.३० वाजता पालखी रथयात्रा, दुपारी १ वाजता रामकृष्ण साठवणे महाराज यांचे गोपालकाला कीर्तन, दुपारी ४ वाजता जन्मोत्सव सोहोळा आणि सायंकाळी ५ वाजता महाप्रसाद वितरण करण्यात येईल. भाविकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन आश्रमाचे अध्यक्ष रामदास सोनकुसरे, सचिव श्रीकृष्ण कावळे यांनी केले आहे.

प्रदूषणासंदर्भात मनसेचे प्रश्नदेशिक परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन
नागपूर, २९ जून/ प्रतिनिधी
शहरात प्रदूषण पसरवणाऱ्या गाडय़ांपासून शहरवासियांचे संरक्षण करावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. शहराध्यक्ष रमेश नाचनकर आणि मध्य विभागाचे अध्यक्ष विक्रम गुप्ता यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने प्रश्नदेशिक परिवहन अधिकारी लांडे व बढिए यांची भेट घेऊन एक निवेदन सादर केले. त्यात नागपुरातील दुचाकी, ऑटोरिक्षा चालक आणि पाचचाकी वाहनांमुळे मोठय़ा प्रमाणात प्रदूषित होत आहे. सर्वाच्याच प्रकृतीवर याचा विपरित परिणाम होतो आहे. याबाबत रितसर निवेदन प्रश्नदेशिक परिवहन अधिकाऱ्यांना देण्यात आले. जीवघेण्या प्रदूषण वाढवणाऱ्या चालकांवर कडक कारवाई करण्याची मागणी संघटनेने केली. यावेळी अशोक बगमारे, प्रमोद राऊत, विक्रमजीत गुप्ता, प्रणय खुराणा आणि शोएब आदी उपस्थित होते.

डिगडोहची अश्विनी गुजर तालुक्यात प्रथम
हिंगणा, २९ जून / वार्ताहर
शालांत परीक्षेत डिगडोहच्या शांती विद्या भवनची विद्यार्थिनी अश्विनी रमेश गुजर हिने ८९.६९ टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. नेहरू विद्यालय हिंगण्याची श्रृतिका बबन कांबळे ८९ टक्के गुणाने द्वितीय तर यशवंत विद्यालय गुमगावची पपिता विष्णू साठवणे ही ८७.३९ टक्के गुण घेऊन तिसरी आली आहे. तालुक्याची निकालाची टक्केवारी ८६ आहे.लोकसेवा विद्यालय खैरी पन्नासे, महात्मा गांधी विद्यालय वानाडोंगरी, चित्रलेखा देवी भोसले हायस्कूल कान्होलीबारा व श्रीकृष्ण हायस्कूल सावंगी (आसोला) या चार शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. नेहरू विद्यालयाची पल्लवी शेटे (८७ टक्के), पूजा राजलखन त्रिपाठी (८६ टक्के), शांती विद्या भवनची मोनाली राऊत (८५ टक्के), सवरेदय विद्यालयाचा आशीष चक्रवर्ती याने (८० टक्के) शाळेतून प्रथम स्थान पटकावले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शाळेच्या मुख्याध्यापक, शिक्षक व संस्थाचालकांनी अभिनंदन केले आहे.

व्यसनाधीनतेचे परिणाम गंभीर -डॉ.माने
नागपूर, २९ जून / प्रतिनिधी
व्यसनाधीनतेला सामाजिक प्रतिष्ठा प्रश्नप्त झाली असून ही बाब अत्यंत गंभीर असल्याने समाजाला त्याचे परिणाम भोगावेच लागतील, अशी भीती सामाजिक कार्यकर्ते डॉ. मिलिंद माने यांनी व्यक्त केली. कोराडी मार्गावरील नवचैतन्य व्यसनमुक्ती केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या मादक पदार्थविरोधी दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. जागतिक आरोग्य संघनेच्या अहवालानुसार, मानवासाठी जीवघेण्या ठरलेल्या आजारांमध्ये व्यसनाधिनतेला स्थान मिळाले आहे. एड्स, कर्करोगानंतर सर्वात जास्त लोक व्यसनांमुळे मरण पावतात. हा जसा शारीरिक व मानसिक आजार आहे, तसाच तो कौटुंबीक आजारही आहे. घरामध्ये जेव्हा एखाद्या व्यक्तीला व्यसन जडते तेव्हा संपूर्ण कुटुंबालाच त्याचा त्रास सहन करावा लागतो. घरातले वातावरण बिघडून जाते. अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होतात, असे डॉ. माने म्हणाले.केंद्राचे संस्थापक अशोक नगराळे यांनी, व्यवनाधिनतेतून बाहेर पडण्यासाठी सकारात्मक विचार करण्याचे आवाहन केले. यावेळी अशोक साठे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संचालन सामाजिक कार्यकर्ते यशवंत कुळकर्णी यांनी केले तर, आभार डॉ. शिवराज देशमुख यांनी मानले. कार्यक्रमासाठी संतोष राऊत, दिनकर रॉय, सचिन वानखेडे आदींनी सहकार्य केले.

१ जुलैला ‘डॉक्टर्स डे’; स्नेहांचलला गौरवणार
नागपूर, २९ जून/प्रतिनिधी

‘डॉक्टर्स डे’ निमित्त इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नागपूर शाखेतर्फे १ जुलैला विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. यावेळी सामाजिक कार्यकर्ते गिरीश गांधी, कस्तुरबा आरोग्य संस्थेच्या सचिव डॉ. प्रतिभा नारंग प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. याप्रसंगी दिवंगत डॉ. व्ही.एन. वांकर स्मृति पुरस्कार अजनी येथील स्नेहांचल पॅलिएटीव्ह केअर सेंटरला देण्यात येणार आहे. जिम्मी राणा यांनी सुरू केलेल्या या केंद्रात कॅन्सरच्या गरीब रुग्णांवर निशुल्क उपचार करण्यात येणार आहेत. ‘डॉक्टर्स डे’चे औचित्य साधून वरिष्ठ डॉक्टर्स आणि शिक्षकांचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे. यामध्ये डॉ. सी.एस. वैद्य, डॉ. एस.आर. जोहरापूरकर, डॉ. प्रभाकर दशपुत्र, डॉ. वीरेश गुप्ता, डॉ. सुभाष श्रीराव, डॉ. डब्लू.पी. थेरगावकर, डॉ. एस.एम. पाटील, डॉ. संजीवनी पटवर्धन, डॉ. आनंद डोंगरे यांचा समावेश राहील. यावेळी पत्रकार मनीष अवस्थी आणि अ‍ॅड. जुगलकिशोर गिल्डा यांचाही सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला सदस्यांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयएमएचे अध्यक्ष डॉ. अनिल लद्धड आणि सचिव डॉ. संजय दमके यांनी केले आहे.

हिंगण्यातील शुभम् शेंदरेचे सुयश
हिंगणा, २९ जून / वार्ताहर

हिंगणा (रायपूर) येथील शुभम् प्रकाशराव शेंदरे याने दहावीच्या परीक्षेत ९०.४६ टक्के गुण मिळवले. त्याला सर्वच विषयात प्रवीण्य मिळाले. तो यशोदा मराठी माध्यमिक विद्यालय (इंग्रजी माध्यम) त्रिमूर्ती नगर रिंगरोड येथील विद्यार्थी आहे.शुभम् हा विद्यालयातूनही दुसरा आला असून त्याने िहगणा तालुक्यात सर्वाधिक गुण मिळवून प्रथम स्थान पटकावले आहे. त्याने यशाचे श्रेय आई-वडील व शिक्षकांना दिले आहे.