Leading International Marathi News Daily

मंगळवार, ३० जून २००९

राज्य

राज ठाकरे यांना सशर्त जामीन
कल्याण, २९ जून/प्रतिनिधी

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना सोमवारी कल्याण रेल्वे न्यायालयाचे न्यायदंडाधिकारी कृपेश मोरे यांनी एक लाख रुपयांचा वैयक्तिक जातमुचलका दोन गटात तणाव निर्माण होईल अशी कोणतीही भडक लेखी व तोंडी कृती करायची नाही, अशा अटींवर जामीन मंजूर केला. मनसेच्या कार्यकर्त्यांनी गेल्या वर्षी उत्तर भारतीयांविरुद्ध आंदोलन छेडले होते. याप्रकरणी कल्याण रेल्वे न्यायालयात गुन्हा दाखल झाला होता.

पालखी पुढे नेण्यावरून वारकऱ्यांमध्ये दोन तट
कैलास ढोले/भारत मगर
अकलूज/ माळशिरस, २९ जून

संतांवरील आक्षेपार्ह लिखाणावरून ज्ञानेश्वर पालखी सोहळा समाजाने ताठर भूमीका घेत स्वत: मुख्यमंत्र्यांनी वाखरी येथे येऊन संबंधितांवर कारवाईचे आश्वासन द्याव्ये अन्यथा पालखी पंढरपुरात नेणार नाही, असा इशारा दिला आहे तर दुसऱ्या बाजूला पालख्या वाखरीपासून पुढे न नेण्याच्या निर्णयात सहभागी होण्यास जगद्गुरू संत तुकोबारायांच्या पालखीतील वारक ऱ्यांनी नकार दिला असून तुकोबांची पालखी पंढरपुरास नेण्यात येईल, असे पालखी सोहळाप्रमुखांनी ठामपणे सांगितले आहे.

जमिनींचे साठेकरार केलेल्या ६५० शेतकऱ्यांना पोलीस बंदोबस्तात भूसंपादन नोटीसा
अलिबाग, २९ जून /प्रतिनिधी

गेल्याच आठवडय़ात रिलायन्सच्या महामुंबई एसईझेड करिता सक्तीचे भुमी संपादन करण्याच्या प्रस्तावास सर्वोच्च न्यायालयाने मुदत वाढ नाकारल्यावर, आज प्रकल्पा बरोबर जमिनींचे साठेकरार केलेल्या सुमारे ६५० शेतकऱ्यांना भूमी संपादन कायदा कलम-९(१),(२) अन्वये व्यवहार मान्यता सुनावणी नोटीसा तलाठय़ांच्या माध्यमातुन पोलीस बंदोबस्तात बजावण्यास प्रारंभ करण्यात आला असल्याने शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आह़े

स्फोटातील पीडितांच्या कुटुंबियांनाच सोनिया गांधी यांच्या दौऱ्यात ‘नो एंट्री’
नाशिक, २९ जून / खास प्रतिनिधी

मालेगाव बॉम्ब स्फोटानंतर त्याच्याशी संबंधित काही पीडितांनी ज्या पद्धतीने सोनिया गांधीच्या पुढय़ात शासनकृत मदतीचे धनादेश भिरकावून दिले होते, त्याच प्रकाराची पुनरावृत्ती सोनियांच्या उद्याच्या मालेगाव दौऱ्यात होवू नये, म्हणून अतिसंवेदनशील झालेल्या स्थानिक यंत्रणेने तसेच काँग्रेसच्या मंडळींनी विशेष खबरदारी घेतली आहे.

ज्येष्ठ पत्रकारानेही अनुभवला टिपिकल पोलिसी खाक्या
नवी मुंबई, २९ जून (प्रतिनीधी)

सर्वसामान्यांसाठी सदैव तत्पर, असा संदेश देत एकीकडे शहर पोलिस दल आणि आमआदमीत सुसंवाद वाढावा, यासाठी नवी मुंबईचे नवे पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी नव्या योजनांचे सुतोवाच केले असतानाच, दुसरीकडे मोठय़ा अपेक्षेने आपली व्यथा घेउन पोलिस ठाण्याची पायरी चढणाऱ्या तक्रारदाराला हद्दीचा वाद उभा करत ताटकळत ठेवणारा टिपीकल पोलीसी खाक्या या भागात नुकताच एका घटनेवरुन दिसून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

‘जो जें वांछील..’ चालीवर आरोग्य विद्यापीठाकडून आयुर्वेद अभ्यासक्रमांची खिरापत !
अभिजीत कुलकर्णी, नाशिक, २९ जून

किमान गुणांची मर्यादा नाही, विशिष्ट विद्याशाखेची अट नाही, मुळात जे पदच अस्तित्वात नाही त्याच्या सहायकाच्या पात्रतेसाठीचा अभ्यासक्रम, एकाच वेळी एकाच नावाचे पण भिन्न कालमर्यादेचे अभ्यासक्रम.. असे ‘जो जें वांछील तो तें लाहो’चे धोरण आयुर्वेद शाखेच्या नव्या अभ्यासक्रमांना मान्यता देताना महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने ठेवल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.

दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे समुपदेशन व मार्गदर्शन
जळगाव, २९ जून / प्रतिनिधी
दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे समुपदेशन व मार्गदर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच विद्यापीठस्तरीय आपतकालिन समायोजन प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याचे विद्यापीठातर्फे कळविण्यात आले आहे.

परदेशी शिक्षणातील एजंटगिरीला आता आळा घालणार
केंद्रीय मंत्री वायलर रवी यांची माहिती
पुणे, २९ जून/खास प्रतिनिधी
अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमानंतर घसघशीत पगाराची नोकरी लावण्याचे आमिष दाखवून परदेशी संस्थांमध्ये विद्यार्थी भरती करणाऱ्या बोगस एजंटगिरीला केंद्र सरकार आता आळा घालणार आहे. देशोदेशीची विद्यापीठे व शिक्षण खात्याला या एजंटगिरीबद्दल धोक्याची सूचना देण्यात आली असून, लवकरच कडक कायदाही केला जाणार आहे.

सिंगलफेज योजना सुरू न केल्यास आंदोलनाचा इशारा
देवळा, २९ जून / वार्ताहर

शहरातील वाजगावरोड शिवारात सिंगलफेज योजना त्वरीत सुरू न झाल्यास वीज वितरण कंपनीच्या कार्यालयास कुलूप ठोकण्यात येईल, असा इशारा परिसरातील नागरिकांनी सहाय्यक अभियंता यु. एच. धोंगडे यांना कार्यालयात घेराव घालून दिला.
देवळा तालुक्यात बहुतांश भागात सिंगलफेज योजना सुरू करण्यात आली असली तरी वाजगावरोड शिवारात योजना सुरू झालेली नाही. वाजगाव रस्त्यावरील परिसर गेल्या तीन वर्षांपासून अंधारात असून विद्यार्थ्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे. रात्री विजेअभावी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे विनाविलंब सिंगलफेज योजना सुरू करण्याची मागणी करण्यात आली निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. धोंगडे यांना निवेदन देण्याप्रसंगी अनिल आहेर, अशोक पाटील, ध्यानाबाई वाघ, बाजीराव पवार, किशोर आहेर आदी नागरिक उपस्थित होते.

आणखी चार दिवस पावसाचा जोर वाढणार नाही
पुणे, २९ जून / खास प्रतिनिधी

कोकणासह राज्याच्या काही भागांत आज पावसाच्या तुरळक सरींनी हजेरी लावली. मात्र, गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत त्याचा जोर पुन्हा कमी झाला असून, येत्या चार दिवसांत तरी त्यात विशेष वाढ होण्याची शक्यता नसल्याचे पुणे वेधशाळेतर्फे जाहीर करण्यात आले. सामान्यत: जास्त पावसाच्या समजल्या जाणाऱ्या सहय़ाद्रीच्या घाट क्षेत्रातही पाऊस कमीच होता.
महाराष्ट्रातील या महिन्याच्या पावसाचे प्रमाण अजूनही कमीच आहे. ते लगेच तरी भरून निघण्याची शक्यता नाही, कारण येत्या चार-पाच दिवसांत पावसात विशेष वाढ होण्याची चिन्हे नाहीत. आज दिवसभरात अलिबाग येथे ३६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. याशिवाय कुलाबा-मुंबई (२ मिलिमीटर), सांताक्रुझ (१०), रत्नागिरी (०.४), महाबळेश्वर (१३), नाशिक (०.२), सांगली (०.२) येथेही पाऊस पडला. याचप्रमाणे घाट क्षेत्रातही पाऊस पडला, पण त्याचे प्रमाणही अतिशय कमी होते. भीरा (१०), लोणावळा (१०), कोयना नवजा (१०), खोपोली (१०), ताम्हिणी (२०) येथे त्याची नोंद झाली. पुणे वेधशाळेच्या संचालक डॉ. मेधा खोले यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या चार दिवसांत तरी बंगालच्या उपसागरात पावसाच्या दृष्टीने अनुकूल वातावरण निर्माण होण्याची शक्यता नाही.