Leading International Marathi News Daily

बुधवार, १ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

बाळासाहेब पाटलांनी विधानसभेत मतदारसंघाचे किती प्रश्न मांडले- भोसले
कराड, ३० जून/वार्ताहर

 

केवळ घोषणाबाजी आणि आश्वासनांची खैरात करणाऱ्या कराड-उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधींनी जनतेच्या हिताचे किती प्रश्न विधानसभेत मांडले याचे उत्तर त्यांनी जनतेला द्यावे, असा प्रश्न राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अतुल भोसले यांनी आमदार बाळासाहेब पाटील यांना केला आहे.
इंदोली (ता. कराड) येथे भोसले युवा प्रतिष्ठानची स्थापना त्यांच्या हस्ते झाली. या वेळी भोसले यांनी आमदार पाटलांच्या नाकर्तेपणाचा समाचार घेतला. अध्यक्षस्थानी इंदोली सोसायटीचे अध्यक्ष संभाजीराव निकम हे होते. तर काशिनाथ चव्हाण, शिवाजीराव यादव, जगन्नाथ थोरात, जितेंद्र जगताप, मोहनराव कदम, दत्तात्रय साळुंखे यांच्यासह ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती.
भोसले पुढे म्हणाले की, जनतेच्या कल्याणासाठीच भोसले कुटुंबीयांची समाजाशी नाळ जोडली गेली आहे. त्यामुळेच आमच्या कर्तृत्वालाही परमेश्वराने साथ दिली. आजपर्यंत आमच्या घराण्याने केलेली लोकांची प्रश्नमाणिक सेवा येणाऱ्या काळात फळास जाईल, असा विश्वासही व्यक्त करून केवळ या परिसराचा मतासाठी उपयोग करणाऱ्यांनी इथल्या प्रश्नांची सोडवणूक केली नसल्याची खंत भोसले यांनी व्यक्त केली.
सक्षम दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वाची समाजाला गरज असताना इथल्या राजकारण्यांनी केवळ राजकारणाचा वापर स्वत:च्या हितासाठीच केला. आपली अकार्यक्षमता चव्हाटय़ावर येईल या भीतीने आम्ही उभारत असलेल्या जयवंत शुगरच्या निर्मितीस विरोध केला. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हितासाठी उभारण्यात येणाऱ्या या कारखान्याच्या उभारणीस अनेक अडचणी आणल्या. अशी टीका त्यांनी केली. मात्र लवकरच सुरू होत असलेल्या तारळे धरणाच्या पाणी अडवण्याच्या प्रश्नरंभापूर्वी म्हणजे दिवाळी सणाच्या मुहूर्तावर जयवंत शुगर सुरू करणारच असल्याची ग्वाही अतुल भोसले यांनी दिली.
यावेळी स्थानिक नेतेमंडळींनी विद्यमान आमदारांच्या कामावर जोरदार टीका करताना, यापुढे अतुल भोसले यांच्या पाठीशी ठाम राहण्याचा निर्धार व्यक्त केला.