Leading International Marathi News Daily

बुधवार, १ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

महाबळेश्वरमध्ये दहावीचा निकाल ९० टक्के
महाबळेश्वर, ३० जून/वार्ताहर

 

नुकत्याच जाहीर झालेल्या दहावी परीक्षेच्या निकालामध्ये महाबळेश्वर केंद्राचा निकाल ९०.१४ टक्के लागला. त्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूल मेटगुताडचा १०० टक्के निकाल तर कोयना खोरे विद्या विकास हायस्कूल शिरवलीचा ९६.७७ टक्के, अंजुमन खैरुल उर्दू हायस्कूलचा ९५.२३ टक्के, महाबळेश्वर पालिका संचलित गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचा ९०.४७ टक्के व छाबडा इंग्रजी माध्यम हायस्कूलचा ८१.८१ टक्के व छत्रपती शिवाजी हायस्कूल वाडा कुंभरोशीचा ७३.३३ व शेरु गंगाधर माखरिया हायस्कूलचा ७०.५८ टक्के निकालाचा समावेश आहे. महाबळेश्वर केंद्रात महाबळेश्वर शहरातील ४ शाळा व तालुक्यातील तीन अशा एकूण सात शाळांचा समावेश आहे. या वर्षी या केंद्रातून एकूण १२५० विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यामध्ये ७८६ मुले व ४६४ मुली यांचा समावेश होता. यातील ११२५ विद्यार्थी पास झाले. त्यात ७२६ मुले व ३९९ मुलींचा समावेश आहे.
महाबळेश्वर केंद्रातील शाळा, त्यात बसलेले व उत्तीर्ण झालेले विद्यार्थ्यांना मिळालेले गुण-
न्यू इंग्लिश स्कूल मेटगुताड (ता.महाबळेश्वर)चा निकाल १०० टक्के लागला. प्रथम क्रमांक हृषिकेश अरुण बावळेकर ९१.२३ टक्के, द्वितीय क्रमांक महेश दगडू ढेबे ९०.३० टक्के, तृतीय क्रमांक निलेश काशिनाथ ढेबे ८९.२३ टक्के गुण मिळाले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डी. एम. बावळेकर, उपाध्यक्ष बबन बावळेकर, सचिव एम. के. वाशिवले व मुख्याध्यापक शिवाजी निकम यांनी अभिनंदन केले.
महाबळेश्वर पालिका संचलित गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे ११४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, निकाल ९०.४७ टक्के लागला. कोमल अरविंद बांदल ८३.८४ टक्के व सुनीता सुभाष केळगणे ८३.८४ टक्के या दोघांनी प्रथम, तर प्रश्नजक्ता लक्ष्मण काळे ८२.९३ टक्के द्वितीय तर तृतीय क्रमांक दीपाली राजेंद्र लोखंडे ७८.६१ टक्के पटकावला.
शेठ गंगाधर माखरिया हायस्कूलमध्ये प्रथम क्रमांक विशाल विनायक सपकाळे (७४ टक्के) प्रथम, द्वितीय क्रमांक तृप्ती रवींद्र भगत तर तृतीय क्रमांक अश्फीया इस्माईल मानकरने पटकावला.
देवीबाई नारायणदास छाबडा (इंग्रजी माध्यम) हायस्कूलमध्ये प्रथम क्रमांक नीतू दुलाल हिला मिळाला. तिला ७१.४१ टक्के गुण मिळाले. द्वितीय क्रमांक प्रवीण सुधाकर जाधवने पटकावला (६८ टक्के), तृतीय क्रमांक शाहरूख सलीम डांगे हिला (६६ टक्के) मिळाला.
अंजुमन खैरुल इस्लाइ उर्दू हायस्कूलमध्ये अन्सारी शगुक्ता मसऊद व सुतार अलमास खलील यांनी ६१.५३ टक्के (प्रथम), द्वितीय क्रमांक शाजिया रियाज डांगे ६०.९२ टक्के (द्वितीय), तर शाहरूख अख्तर शेखने ६०.३३ टक्के (तृतीय) मिळविले.