Leading International Marathi News Daily

बुधवार, १ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

टाकवडेतील पुलाची उंची वाढवून घेण्याचे आश्वासन
इचलकरंजी, ३० जून / वार्ताहर

 

केंद्र शासनाच्या नाबार्ड योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अनुदानातून टाकवडे-शिरढोण-नृसिंहवाडीस जोडणाऱ्या मार्गावरील टाकवडे वेस ओढय़ावरील पुलाची उंची वाढण्याचे काम लवकरच मंजूर करून घेऊ असे आश्वासन खासदार राजू शेट्टी यांनी इचलकरंजीतील शेतक ऱ्यांच्या शिष्टमंडळास दिले.
ते म्हणाले इचलकरंजीतून टाकवडे-शिरढोण-कुरूंदवाड व नृसिंहवाडीस जोडणारा हा मार्ग पूर्वी जिल्हा मार्ग होता. सध्या मार्गास राज्यमार्ग म्हणून शासनाने मान्यता दिल्यामुळे टाकवडे वेस ओढय़ावरील पुलाची उंची वाढविण्याकरिता कोणतीही आर्थिक किंवा तांत्रिक अडचणी निर्माण होणार नाहीत. त्यामुळे लवकरच या पुलाची उंची वाढवण्याचे काम हाती घेण्यात येईल.
शहरातील मळे भाग शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने खासदार राजू शेट्टी यांची भेट घेतली. त्यावेळी जिल्हा परिषद व पंचायत समितीमार्फत शासन ग्रामीण भागातील शेतक ऱ्यांना बी बियाणे पासून ट्रॅक्टपर्यंत अनुदान व विशेष घटक योजनेतून सोई सवलती देत असते परंतु याचा लाभ शहरी भागातील शेतकऱ्यांना मिळत नाही. या प्रश्नाकडे विजय भोसले यांनी खासदार राजू शेट्टी यांचे लक्ष वेधले. त्यावर खासदार शेट्टी यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जयश्री भोज यांच्याशी चर्चा दूरध्वनीवरून केली.
या शिष्टमंडळात श्रेणीक मगदूम, बसगोंडा बिरादार, अविनाश कोरे, भरमू वठारे, अजित देवमोरे, अप्पासो मगदूम, अर्जुन पाटील, कल्लाप्पा देवमोरे आदी शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.