Leading International Marathi News Daily

बुधवार, १ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

समाजवादी प्रश्नध्यापक सभेचा गडहिंग्लजमध्ये मोर्चा
गडिहग्लज, ३० जून/वार्ताहर

 

शासनाने विनाअनुदान धोरण रद्द करावे, विद्यार्थ्यांना समान व मोफत शिक्षण मिळावे, या मागणीसाठी अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभा व शैक्षणिक व्यासपीठामार्फत मोर्चाने जाऊन प्रश्नंताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
सकाळी दहा वाजता एम.आर.हायस्कूल येथून मोर्चाला सुरुवात झाली. शहरातील प्रमुख मार्गावरून फिरून मोर्चा प्रश्नंत कार्यालयावर आला. प्रश्नंताधिकारी सुनंदा गायकवाड यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले. शासनाने विनाअनुदान धोरण रद्द करावे, शिक्षणातील धनदांडगाई, कॅपिटेशन फी रद्द करावी, प्रत्येक मुला-मुलीला शिक्षणाचा हक्क मिळावा, बालवाडी ते उच्च शिक्षण फीविना समान व गुणवत्तापूर्ण असे मिळावे, संपूर्ण शिक्षणाची आर्थिक जबाबदारी केंद्र व राज्य सरकारने घ्यावी, या मागण्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या नावे असणाऱ्या निवेदनामध्ये करण्यात आल्या आहेत.
निवेदनावर शैक्षणिक व्यासपीठाचे बचाराम काटे, माध्यमिक शिक्षक संघाचे दत्ता देशपांडे, टी. डी. एफ. चे वाय. बी. बांदेकर, कल्याणराव पुजारी, शिवाजीराव होडगे, शैलेश पाटील, प्रश्न. पी. एम. भोईटे आदींच्या सह्य़ा आहेत. मोर्चामध्ये शिक्षक, पालक यांच्यासह शहरातील शाळांमधील विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. मोर्चा शांततेमध्ये सुरू असताना बंदोबस्तासाठी असणारे गडिहग्लजचे पोलीस निरीक्षक श्रीकांत खोत यांनी शिक्षकांशी हुज्जत घातल्याने शिक्षकांनी त्यांचा निषेध केला.