Leading International Marathi News Daily

बुधवार, १ जुलै २००९

जिंकण्याची जिद्दच जगण्याचा अर्थ
जगण्याच्या धडपडीतून सापडलेला हा शोध माणसासाठी केवढा उपकारक होता, हे आता मागे वळून पाहताना लक्षात येते. गरज ही शोधाची जननी असते, हे कसे खरे आहे, याची अनेक उदाहरणे त्यानंतरच्या काळात माणसाने पाहिली. दूध ते तूप ही जशी शोधाची एक साखळी होती, तशीच भूगर्भातील इंधनासाठी उपयुक्त असणारे वायू आणि द्रव यांच्या प्रत्यक्ष वापरापर्यंतच्या शोधाची एक साखळी आहे. सापडलेल्या वायूचे माणसाच्या दैनंदिन व्यवहारात अपरिहार्य होणे हीच माणसासाठी एक मोठी देणगी होती.

व्हयं म्हाराजा!
बाबल्याक जाग इली आणि बाबल्यान मोठो आळस दिल्लो. आज हापीसात जावक कंटाळो इलो. त्यामुळे बाबल्यान आज सायबाक फोन केल्यानी, ‘माझी तब्येत बिघडल्यानी म्हणान मीया आज काय येवचय नाय.’ तेचेर बाबल्याचो सायब म्हणालो, ‘अरे उगाच दांडी कित्यक मारतय. आज कुडाळच्या जवळ असलेल्या गावात बसान लॅपटॉपाचेर बसान काम कर.’ बाबल्याक याच उत्तर सायबाकडून अपेक्षित होता. गेल्या वर्षी कोकण रेल्वेर बुलेट रेल्वे सुरु झाली आणि बाबल्यान मुंबय सोडल्यानी. त्येका कोकणात जावक आता जेमतेम एक तास लागता. आणि कधी रेल्वे चुकल्यानीच तर सागरी महामार्गावरुन व्हॉल्वोने तो गेलो तरी दोन तास लागतत.

घडामोडी
कोकण
तुझ्या गळा माझ्या गळा!

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून काँग्रेस आघाडीचे नीलेश राणे विजयी झाल्यामुळे कोकणात पुन्हा एकवार कांग्रेसी वारे वाहू लागले आहेत. राज्याचे महत्त्वाकांक्षी उद्योगमंत्री नारायण राणे या निवडणुकीतील मताधिक्याबाबत फारसे समाधानी नसले, तरी तो विषय मागे टाकून आता ते खासदार चिरंजीवांसह रत्नागिरी-सिंधुदुर्गावर पकड बसविण्याच्या प्रयत्नांना लागले आहेत. ते शिवसेनेमध्ये असताना या प्रदेशाची सुभेदारी विधानसभेतील सध्याचे विरोधी पक्षनेते रामदास कदम आणि राणे यांच्यात विभागलेली होती. त्यावेळी सेनेचे हे दोन ढाणे वाघ उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण वाटून सांभाळत होते. दोन वर्षांंपूर्वी राणे काँग्रेसमध्ये गेल्यानंतर ही विभागणी सेना आणि काँग्रेस या दोन पक्षांमध्ये झाली. अर्थात त्यापैकी कदम यांचा प्रभाव खेड-दापोली पलीकडे कधीच निर्माण होऊ शकला नाही. उलट चिपळूण-रत्नागिरी राष्ट्रवादीकडे, तर संगमेश्वर-राजापूर राणेंबरोबर काँग्रेसच्या ताब्यात आले.