Leading International Marathi News Daily

बुधवार, १ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

शिवाजी महाराज पुतळा परिसराचे सौंदर्यीकरण
खामगाव, ३० जून/ वार्ताहर

 

शिवाजी नगर भागात ३० लक्ष रुपये खर्च करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरातील सौंदर्यीकरण करण्यात येत आहे. या कामाची पाहणी आमदार दिलीप सानंदा यांनी नुकतीच केली. यावेळी प्रवीण कदम, वैभव डवरे, गणेश माने, नरेंद्र पुरोहित, सुनील लाहुडकर, नीलेश ढवळे, गजानन केवारे, रवींद्र घाडगे, बाबा जोगदंड, कडूचंद घाडगे, अभय मोहिते, देवीदास कोल्हे, धीरज बोरकर, योगेश काळे, चंद्रकांत रेठेकर, श्रीकृष्ण पडोळे, उमेश भराटे, विक्की घोरपडे उपस्थित होते.
या सौंदर्यीकरण कामामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सौंदर्यीकरण, मराठा समाज सभागृहाचे नूतनीकरण, गॅलरी, प्रवेशद्वार, क्राँक्रिट पेवर बॉक व आकर्षक अशी विद्युत रोषणाई याचा समावेश आहे. सौंदर्यीकरणाच्या कामामुळे या परिसराचा चेहरा मोहरा बदलत असून शहराच्या लौकिकात अधिक भर पडणार आहे. या सौंदर्यीकरणाबरोबरच राष्ट्रमाता माँ जिजाऊ यांची प्रतिकृती बसवण्यात येणार आहे.
सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा स्थापित होणार
अ.भा. हिंदू महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शालिग्राम जोशी यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने आमदार दिलीप सानंदा यांची भेट घेऊन टिळक मैदानात पूर्व नियोजित स्थानावर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा लवकरात लवकर स्थापित करण्याची मागणी केली. गेल्या अनेक वर्षापासून येथील टिळक मैदानात नेताजींचा पुतळा स्थापित करण्यात यावा यासाठी येथील जनता मागणी करीत आहे. त्याप्रमाणे पालिकेने सुद्धा पुतळा बसवण्याचा ठराव करून पुतळा तयार केला आहे परंतु, अनेक कारणावरून हा कार्यक्रम लांबणीवर पडत आहे. यामुळे येथील नागरिकात तीव्र असंतोष निर्माण होत आहे. आमदार सानंदांनी लवकरात लवकर पुतळा स्थापित करण्याचे आश्वासन दिले. चंद्रहास फेरण उदय किसन व्याससह अनेक कार्यकर्ते होते.