Leading International Marathi News Daily

बुधवार, १ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

खामगावात नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्षांचा सत्कार
खामगाव, ३० जून / वार्ताहर

 

खामगाव शहराचा सर्वागीण विकास करून खामगाव नगरपालिकेला महाराष्ट्रात लौकिक मिळावा, असे विधायक कार्य नवनिर्वाचित नगराध्यक्ष व पदाधिकारी करतील, असा विश्वास आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी व्यक्त केला. नगराध्यक्ष अशोक सानंदा, उपाध्यक्ष सईदाबानो इब्राहीमखाँ व माजी नगराध्यक्षांचा सत्कार नगरपालिकेच्यावतीने नुकताच करण्यात आला.
या प्रसंगी दिलीप सानंदा होते. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष अलका सानंदा, भारती राजपूत, कमलसिंह गौतम, सरस्वती खासने, सैय्यद गणी, राजाराम काळणे, गोपाळराव कोल्हे, रामविजय बुरूंगले, अनिल नावंदर, वैभव डवरे, माधुरी बोबडे, गणेश माने, डॉ. तबस्सुम हुसैन, बुडू जमादार, किशोर जोशी, अनिलकुमार राजपूत उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना आमदार सानंदा म्हणाले की, खामगाव शहरातील पाणी समस्या कायमची निकाली काढण्यासाठी वर्षभरात १९ कोटीची पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होणार आहे. ६८ कोटींच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे कामही करण्यात येणार आहे. त्यामुळे खामगावकरांना मुबलक पाणी मिळणार आहे. असे सांगून दिलीप सानंदा पुढे म्हणाले की, नवनिर्वाचित नगराध्यक्ष अशोक सानंदा हे सर्वाना सोबत घेऊन चालणारे आहेत. पालिका कर्मचाऱ्यांनी सुद्धा कर्तव्याची जाणीव ठेवून कामे करावी. पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी विकासासाठी समन्वय ठेवावा, असे आवाहन आमदार सानंदा यांनी केले. कोणत्याही प्रकारे मतभेद व पक्षपात न करता प्रत्येक वॉर्डात विकासाची कामे करण्यात येतील, अशी ग्वाही नगराध्यक्ष सानंदा यांनी यावेळी दिली.
यावेळी माजी नगराध्यक्ष कमलसिंग गौतम, राष्ट्रवादी गटनेता वैभव डवरे यांचीही भाषणे झाली. प्रश्नस्ताविक अनिल नावंदर यांनी केले. संचालन झनके यांनी केले.