Leading International Marathi News Daily

बुधवार, १ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

‘डिजिटल’ विद्यापीठाचे ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे उद्घाटन
अमरावती, ३० जून / प्रतिनिधी

 

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील ‘डिजिटल युनिव्हर्सिटी पोर्टल’ व ‘सांख्यिकी कक्षा’चे उद्घाटन ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे शिक्षण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पुणे येथून झाले. यावेळी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. कमलसिंह, एमकेसीएलचे व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत, पुणे विद्यापीठाच्या सांख्यिकी विभागाचे माजी विभागप्रमुख प्रश्न. जे.व्ही. देशपांडे, प्रकल्प व्यवस्थापक डॉ. अतुल वाडेगावकर, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. सरदेसाई प्रश्नमुख्याने उपस्थित होते.
विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’च्या माध्यमातून उद्घाटन झाले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ ‘डिजिटल’ विद्यापीठ झाल्यामुळे राज्यातीलच नव्हे तर भारतातील सर्व विद्यापीठांशी हे विद्यापीठ ‘ऑनलाईन’ जोडल्या गेले आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ही एक चांगली सुविधा उपलब्ध झाली आहे. सांख्यिकी कक्षाच्या माध्यमातून विद्यार्थी, शिक्षकांचे संशोधन आणि इतर संपूर्ण माहिती अद्ययावत स्वरूपात ठेवण्यात येणार असल्याने सहज संदर्भासाठी हे ‘पोर्टल’ महत्त्वाची भूमिका बजावेल, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी सांगितले. कुलगुरू डॉ. कमलसिंह आणि हा प्रकल्प कार्यान्वित करणाऱ्यांनी जे परिश्रम घेतले. त्याबद्दल विखे पाटील यांनी कौतुकही केले.
माहिती तंत्रज्ञानाद्वारे माहितीचे आदान-प्रदान करण्याची सुलभ संधी विद्यार्थ्यांना प्रश्नप्त झाली आहे. ‘एमकेसीएल’च्या ‘वेबसाईट’ला भेट देणाऱ्या लोकांची संख्या आशिया खंडात सर्वाधिक आहे. ‘पोर्टल’वरील उपलब्ध सेवेचा त्यांनी लाभही घेतला आहे. यावर्षी विद्यापीठ ‘पोर्टल’द्वारे ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली आणि भविष्यात परीक्षा आवेदनपत्रे भरण्यापासून ते रोजगारांच्या संधीच्या माहितीपर्यंत अनेक सेवा विद्यार्थ्यांना सहजपणे उपलब्ध होणार आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनादेखील या उपक्रमाद्वारे दूर शिक्षणाचा लाभ घेता येणार आहे. ‘डिजिटल’ विद्यापीठ म्हणून अमरावती विद्यापीठ लवकरच नावारूपास येईल, यापुढे सर्वच परीक्षा व मूल्यांकन ऑनलाईन करण्याचा मानस ‘एमकेसीएल’चे विवेक सावंत यांनी यावेळी व्यक्त केला.
पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंह यांनी २००७ पासून २९ जून हा दिवस सांख्यिकी दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले आहे. शिक्षण क्षेत्रात सांख्यिकी कक्षाला अधिक महत्त्व आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आता ‘डिजिटल’ विद्यापीठ बनले आहे. विद्यापीठाच्या सेवा भविष्यात सर्वाना उपयुक्त राहतील, असा विश्वास कुलगुरू डॉ. कमलसिंह यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
ग्रामीण भागात ‘इंटरनेट’ची सुविधा मोठय़ा प्रमाणात उपलब्ध नसली, तरी येत्या सहा महिन्यांत महाविद्यालयांच्या माध्यमातून ही सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल. शिक्षणाची गंगा विद्यापीठ ‘पोर्टल’च्या माध्यमातून खेडोपाडी पोहोचवण्याचा आपला उद्देश असल्याचे डॉ. कमलसिंह यांनी यावेळी सांगितले. येत्या १ ऑगस्टपासून विद्यापीठात ‘पोर्टल’ची सेवा सुरू होणार असल्याचे कुलसचिव प्रश्न. जयंत देशपांडे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. राजेश सिंह यांनी केले. यावेळी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. जी.एन. वानखडे, डॉ. पी.एम. खोडके, अधिष्ठाता प्रश्न. ए.पी. बोडखे आदी उपस्थित होते.