Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ३ जुलै २००९

वसंतदादा कारखान्याची मालमत्ता विकून
ऊसबिले देण्याचे साखर आयुक्तांचे आदेश
सांगली, २ जुलै / प्रतिनिधी
साखर आयुक्त राजेंद्र चव्हाण यांनी वसंतदादा साखर कारखान्याच्या स्थावर व जंगम मालमत्ता विकून शेतकऱ्यांची ऊसबिले भागविण्याचे आदेश दिले आहेत. महसूल नियमानुसार कारखान्यावर कारवाई करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्याम वर्धने यांनी दिली. दरम्यान, सांगली जिल्ह्य़ाच्या विकासाचे मंदिर हळूहळू उद्ध्वस्त होत असल्याच्या बातम्यांनी सभासद व शेतकऱ्यांतून संचालक मंडळाविषयी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

प्रधान समिती अहवालाच्या अंमलबजावणीसाठी समिती - जयंत पाटील
सातारा, २ जुलै/प्रतिनिधी

राम प्रधान समितीने सादर केलेल्या मूळ अहवालावरील कार्यवाही अहवालाची अंमलबजावणी बाबतच्या सूचना करण्यासाठी छोटी समिती नेमण्यात आली असून तिचा अहवाल येत्या पंधरा-वीस दिवसात प्रश्नप्त होईल. त्यानंतर त्याची कार्यवाही होईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सांगली, कराड, पाटणसह महाबळेश्वरला पावसाची हजेरी
सांगली, २ जुलै / प्रतिनिधी

गेला दीड महिना हुलकावणी देणाऱ्या पावसाने आज सांगली जिल्ह्य़ात तुरळक सरीच्या रूपाने हजेरी लावली. दुष्काळाच्या भीतीने हैराण झालेल्या शेतक ऱ्यांना एवढय़ा पावसावर समाधान मिळणार नसून मोठय़ा पावसाची आवश्यकता आहे. सांगली शहरासह जिल्ह्य़ाच्या विविध भागात आज दुपारनंतर तुरळक पावसाने थोडासा दिलासा दिला. सांगली शहरात दुपारी पावसाची रिपरिप सुरू झाली. सायंकाळच्या दरम्यान पावसाचा जोर थोडासा वाढला आणि लोकांनी आपल्या रेनकोट व छत्र्या बाहेर काढल्या. पडत्या पावसात भिजण्याचा आनंद लहानग्यांनी मनमुराद लुटला. पाऊस चालू असताना तो मोठा यावा, अशी अपेक्षा धरत माणसं पावसात भिजत मार्ग काढत होती. परंतु अपेक्षित असा पाऊस झालाच नाही. किमान आज सुरुवात तरी झाली, असे म्हणत समाधान मानावे लागले.

विधानसभा जागावाटपाबाबत पक्षश्रेष्ठींचाच अंतिम निर्णय-मुख्यमंत्री
सोलापूर, २ जुलै / प्रतिनिधी

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात नेत्यांनी कालपासूनच जाहीर वक्तव्ये करणे बंद केले असून जागावाटपाच्या संदर्भात दिल्लीचे काँग्रेस श्रेष्ठीच अंतिम निर्णय घेतील, असे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. उद्या (शुक्रवारी) पंढरपूर येथे आषाढी एकादशीनिमित्त पांडुरंगाच्या शासकीय महापूजेसाठी गुरुवारी दुपारी ४.३० वाजता त्यांचे सोलापूर येथे विमानाने आगमन झाले. त्या वेळी विमानतळावर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.

पणन विभागाच्या परवानगीविनाच कोल्हापूर बाजार समिती सभापतींनी
३ कोटींची जागा विकली ५० लाखांना
कोल्हापूर, २ जुलै / प्रतिनिधी
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींनी राज्य शासनाच्या पणन विभागाची परवानगी न घेता आणि समितीच्या संचालकांना अंधारात ठेवून ३ कोटी रुपये किमतीची जमीन एका कंपनीला केवळ ५० लाख रुपयांना विकल्याचे प्रकरण समितीच्या काही संचालकांनीच उघडकीस आणले आहे. दरम्यान खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी बाजार समितीच्या एकूण सर्वच कारभाराची चौकशी पणन विभागाच्या संचालकांनी करावी अशी मागणी केली आहे.

इचलकरंजी पालिकेच्या इतिहासातील पहिली घटना
शासननियुक्त नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली सभा होणार
इचलकरंजी, २ जुलै / वार्ताहर
श्रीमंत नगरपालिकेच्या ११६ वर्षाच्या इतिहासात शासननियुक्त नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली पालिकेची सर्वसाधारण सभा प्रथमच होत आहे. प्रश्नंताधिकारी तथा शासननियुक्त नगराध्यक्ष विजयसिंह देशमुख यांना हा मान मिळाला असून त्यांच्या अध्यक्षतेखाली पुढील आठवडय़ात वेगळेपण अधोरेखीत करणारी ही सभा होणार आहे.

वन्यप्रश्नण्यांपासून शेतीचे नुकसान झाल्यास एकरी ४ हजार भरपाई
कोल्हापूर जिल्हा परिषदेचा निर्णय
कोल्हापूर, २ जुलै / प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या वतीने आजरा, चंदगड, भुदरगड, शाहूवाडी अशा दुर्गम व डोंगराळ भागातील शेतीचे वन्यप्रश्नण्यांपासून होणारे नुकसान पाहता प्रतिगुंठय़ास १०० रुपयेप्रमाणे नुकसान भरपाई दिली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष भारत पाटील यांनी दिली. जिल्हा परिषदेचा कृषी विभाग व शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू सभागृहात कृषिदिन साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी उपाध्यक्ष भारत पाटील बोलत होते.

विठ्ठलराव शिंदे कारखान्यात अतिशुध्द साखर उत्पादन सुरू
देशातील पहिलाच प्रकल्प
सोलापूर, २ जुलै/प्रतिनिधी
माढा तालुक्यातील पिंपळनेर येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने देशातील सहकार क्षेत्रात पहिलाच गंधकविरहित अतिशुध्द (रिफायनरी) साखर उत्पादन प्रकल्प कार्यान्वित केल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष, आमदार बबनराव शिंदे यांनी दिली. दहा वर्षापूर्वी उभारण्यात आलेल्या या साखर कारखान्याने साखर उत्पादनात देशात अनेक विक्रम प्रस्थापित केले. त्यामुळे नवी दिल्लीतील नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप. शुगर फॅक्टरीज यांच्याकडून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले.

लाचखोर सरकारी वकिलास अटक
गडिहग्लज, २ जुलै / वार्ताहर

फिर्यादीच्या अपिलाच्या खर्चासाठी ५०० रुपयांची लाच मागणाऱ्या जिल्हा सत्र न्यायालयातील सहायक सरकारी वकील शांतीनाथ सातगोंडा पाटील व न्यायालयातील कनिष्ठ लिपीक विनोद शामराव कांबळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करून अटक केल्यामुळे न्यायालयीन वर्तुळात खळबळ उडाली आहे. कुमारी अरुणा अशोक शिंत्रे (रा.हसूरचंपू ता.गडिहग्लज) यांनी फिर्याद दिलेल्या एका दाव्याचा निकाल अतिरिक्त सत्र न्यायालय गडिहग्लजच्या न्यायालयात विरोधात गेला. निर्दोष झालेल्या निकालाच्या विरोधात िशत्रे हिला जिल्हा सत्र न्यायालयात अपील करायचे होते. सदर अपिलाचा खर्च शासनाकडून केला जात असताना अपिलाच्या खर्चासाठी सहायक सरकारी वकील शांतीनाथ पाटील यांनी न्यायालयातील कनिष्ठ लिपीक विनोद कांबळे यांच्यामार्फत सरकारी वकील कार्यालयात ५०० रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक मधुकर शिंदे, सहायक फौजदार महादेव जाधव आदींनी सापळा रचून दोघांनाही पकडून लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याखाली अटक केली आहे. सहायक सरकारी वकील पाटील व लिपीक कांबळे यांना पकडण्यापूर्वी लाचलुचपत विभागाने रीतसर न्यायालयाची परवानगी घेतली होती.

वारकऱ्यांना खाऊ वाटप
वाई, २ जुलै/वार्ताहर
मागील तीन वर्षापासून महर्षी कर्वे स्त्री-शिक्षण संस्थेच्या वाई येथील कन्याशाळेच्या वतीने संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यानिमित्त लोणंद या ठिकाणी वारकऱ्यांना खाऊवाटपाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. याही वर्षी खाऊवाटपाबरोबरच समाजात लोकजागृती व्हावी या हेतूने शाळेतील कलाशिक्षक चंद्रकांत ढाणे यांनी स्वच्छता अभियान, लोकसंख्यावाढ, पाण्याची स्वच्छता, पर्यावरण यासारख्या ज्वलंत समस्या असलेल्या प्रश्नांवर परिणामकारक अशी घोषवाक्ये असलेली शंभर पोस्टर्स शाळेतील विद्यार्थिनींनी दिंडी मार्गावर प्रदर्शनाच्या रूपाने सादर केली. असंख्य वारकरी हे संदेश वाचूनच पुढे जात होते. यानिमित्त ‘नको वाढ लोकसंख्येची, गरज आहे वनसंपदेची’ या घोषवाक्यावर चंद्रकांत ढाणे यांनी साकारलेल्या भित्तिचित्राचे प्रकाशन संस्थेचे संचालक पोपटलाल ओसवाल यांच्या हस्ते करण्यात आले. अनेक वारकऱ्यांसह मुख्याध्यापिका उषा पुराणिक, पर्यवेक्षक विजयकुमार सावंत, आजन्म सेविका प्रज्ञा कुलकर्णी, अरुण देव, डॉ. जयश्री जगताप, कविता खटावकर, अॅड. सूर्यकांत खामकर व विश्वास पवार यांनी या उपक्रमाची प्रशंसा केली. या समाजप्रबोधनात्मक अशा उपक्रमासाठी अमोल क्षीरसागर, सुरेखा जमदाडे, मंगल कांबळे, मनीषा जोशी व शिवाजी जमदाडे यांचे सहकार्य लाभले.

दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेचा मोर्चा
इचलकरंजी, २ जुलै / वार्ताहर
कोल्हापूर जिल्हय़ात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने गुरुवारी प्रश्नंताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. एक महिन्यानंतर उगवलेला पाऊस आणि त्याचवेळी शिवसेनेचा कोरडा दुष्काळ मागणीचा मोर्चा यांची एकाचवेळी गाठ पडल्याने हा मोर्चा चर्चेचा विषय ठरला.मोहन आर्केड येथील शिवसेनेच्या शहर कार्यालयापासून मोर्चा निघाला. कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतक ऱ्यांवरील संकट सोडवा आदी घोषणा देत शिवाजी पुतळा मार्गे मोर्चा प्रश्नंत कार्यालयावर पोहोचला. पोलिसांनी मोर्चा अडवण्याचा प्रयत्न केला. अपुऱ्या पोलिसांना न जुमानता शिवसैनिकांनी मुख्य प्रवेशद्वार ढकलून कार्यालयात घोषणा देत प्रवेश केला. मोर्चाचे नेतृत्व जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, उपजिल्हा प्रमुख गजानन जाधव, शहरप्रमुख बंडा मुसळे, तालुकाप्रमुख साताप्पा भवान, शिरोळ तालुकाप्रमुख मधुकर पाटील, जिल्हा संघटक मंगल चव्हाण, अजित पाटील, महादेव गौड, महेश बोरा, पिंटू गळदगे आदींनी केले.

पतसंस्थांमधील ठेवी परत मिळण्यासाठी ठेवीदारांचे आंदोलन
फलटण, २ जुलै/वार्ताहर
पतसंस्थांमधील ठेवी परत मिळाव्यात, या मागणीसाठी आज येथील ठेवीदारांनी रास्ता रोको व जेलभरो आंदोलन केले. या वेळी ४० जणांनी स्वत:ला अटक करून घेतली. येथील श्रीमंत मालोजीराजे सहकारी गृहतारण संस्था व फलटण ट्रेडर्स सहकारी पतसंस्थेमधील ठेवीदारांच्या ठेवी मिळाव्यात, या मागणीसाठी व ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राज्यभर पुकारलेल्या जेलभरो आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी माजी नगरसेवक बबनराव क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली येथील क्रांतिसिंह नाना पाटील चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

औरंगाबादच्या मुस्लिम मराठी साहित्य संमेलनास संस्थेच्या सचिवाचाच विरोध
सोलापूर, २ जुलै/प्रतिनिधी
औरंगाबाद येथे येत्या १०, ११ व १२ जुलै रोजी होणाऱ्या आठव्या अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनास तीव्र विरोध दर्शवित अ. भा. मुस्लिम मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रश्न. फक्रुद्दीन बेन्नूर यांच्या कार्यपध्दतीवर परिषदेचे सचिव डॉ. अजीज नदाफ व माजी कोषाध्यक्ष अ. लतीफ नल्लामंदू यांनी टीका केली आहे. औरंगाबाद येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाबाबत विश्वासात घेतले गेले नाही अथवा साहित्य परिषदेचे नवे पदाधिकारी निवडताना संबंधितांना पूर्व सूचना दिल्या गेल्या नाहीत. त्यामुळे नव्या पदाधिकाऱ्यांची निवड बेकायदेशीर असल्याचा आरोप डॉ. नदाफ व नल्लामंदू यांनी परिषदेचे अध्यक्ष प्रश्न. बेन्नूर यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात केला आहे. प्रश्न. बेन्नूर यांनी सोलापूर सोशल अर्बन बँकेत संस्थेचे बेकायदेशीर खाते उघडून संस्थेशी संबंध नसलेल्या व्यक्तीच्या मदतीने खाते हाताळत आहेत. याशिवाय संस्थेचे हिशेब पारदर्शक ठेवण्यात आले नसून लेखापरीक्षणही वेळोवळी करण्यात आले नाही. संस्थेतर्फे एकूण सात साहित्य संमेलने भरवून त्याचा हिशेब वार्षिक सर्वसाधारण सभेसमोर सादर करण्यात आला नाही, असे विविध आरोपही निवेदनात करण्यात आले आहेत.

बजाज अलियान्जकडून मृताच्या वारसाला ९ लाखांचा विमा अदा
सोलापूर, २ जुलै / प्रतिनिधी
रस्ते अपघातात मरण पावलेल्या एका डॉक्टरच्या वारसदार पत्नीला बजाज अलियान्ज लाइफ इन्शुरन्स कंपनीकडून ९ लाखांची विमा देय रक्कम अदा करण्यात आली. डॉ. सोपान पांडे (रा. बेगमपूर, ता. मोहोळ) यांनी बजाज अलियान्ज लाइफ इन्शुरन्स कंपनीच्या कॅपिटल युनिट गेन पॉलिसीमध्ये ९० हजारांची गुंतवणूक केली होती. दरम्यान, मंगळवेढा तालुक्यातील गोणेवाडीत त्यांचा मोटारसायकल अपघातात मृत्यू झाला होता. त्यांनी कॅपिटल गेन पॉलिसीअंतर्गत ९ लाखांची विमा घेतलेला असल्यामुळे त्यांच्या पत्नी मल्लिका पांडे यांना कंपनीकडून ९ लाखांचा धनादेश कंपनीचे पंढरपूर शाखाधिकारी प्रशांत मोगले व विकास अधिकारी विठ्ठल चव्हाण आणि विमा सल्लागार अरविंद झेंडेकर आदींच्या उपस्थितीत अदा करण्यात आला.

पालिका कर्मचाऱ्यांचा इचलकरंजीत मोर्चा
इचलकरंजी, २ जुलै / वार्ताहर
राज्यातील नगरपरिषद कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू करावा या मागणीसाठी नगरपरिषद कर्मचारी समन्वय समितीच्यावतीने मंगळवारी नगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला. या मागण्यांची पूर्तता लवकर न झाल्यास १३ जुलैपासून बेमुदत संप करण्याचा इशारा कामगार नेते कॉ. सूर्याजी साळुंखे यांनी दिला. राज्यातील नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी समन्वय समितीच्या वतीने टप्प्याटप्प्याने आंदोलन केले जात आहे. याअंतर्गत मंगळवारी समन्वय समितीच्या कामगारांनी पालिकेवर मोर्चा काढला. मोर्चा पालिकेसमोर आल्यावर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. समितीचे राज्याचे सरचिटणीस सूर्याजी साळुंखे, खजिनदार शंकर असगर यांनी मुख्याधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेवेळी कामगारांच्या समस्यांची मांडणी केली. पालिका कर्मचाऱ्यांचे वेतन व निवृत्ती वेतनावर राज्य शासनाने १०० टक्के अनुदान द्यावे, शहराच्या हद्दवाढीमुळे नवीन नोकरभरती त्वरित करावी, कचरा उठावाचे काम ठेकेदाराकरवी करण्याएैवजी रोजंदारी कर्मचाऱ्यांकरवी करावे आदी मागण्यांवर चर्चा करण्यात आली.

छाबडा शिक्षण संस्थेच्या नìसग स्कूलला ‘इंडियन नर्सिंग कौन्सिल’ची मान्यता
सातारा, २ जुलै / प्रतिनिधी

डी. एन. छाबडा ग्रामीण शिक्षण संस्थेने ‘इंडियन नìसग कौन्सिल व महाराष्ट्र शासन मान्यताप्रश्नप्त ए. एन. एम. कोर्स सुरू केला आहे. ए. एन.एम. हा एकूण दीड वर्षाचा कोर्स असून त्यामध्ये प्रश्नमुख्याने शरीररचना शास्त्र, मानसशास्त्र, समाजशास्त्र, प्रसूतीशास्त्र, बालरोगशास्त्र आदी अभ्यास विषयांचा समावेश आहे. कोर्सच्या प्रवेशासाठी दहावी उत्तीर्ण ही किमान पात्रता आहे.


दरवाजा तोडून सराफी दुकानातील ४२ लाखांचा ऐवज लंपास
माळशिरस, २ जुलै/वार्ताहर
शटरचा दरवाजा तोडून चोरटय़ांनी येथील श्रीनाथ ज्वेलर्स या दुकानातील ४२ लाखांचा ऐवज लंपास केल्याची तक्रार दुकानाचे मालक विजय तुपे यांनी दिली आहे.येथील शिवाजी चौकातील श्रीनाथ ज्वेलर्स हे सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे दुकान पोलीस ठाण्याच्या पाठीमागेच आहे. विशेष म्हणजे तीन वर्षापूर्वी याच दुकानाची चोरी होऊन ४ लाखांचा ऐवज गेला होता. मात्र अद्याप त्याचा तपास लागलेला नाही. सोमवारच्या रात्री अज्ञात चोरटय़ांनी या दुकानाचे दरवाजे कटावणी व हातोडीने तोडून आतील तिजोरीसह सर्व घेऊन दुकान साफ केले. यामध्ये ८ लाख रु. किमतीचे चांदीचे दागिने, ८ लाखांचे अष्टपैलू मणी,साडेतीन लाखांची डोरली, ४ लाखांची सोन्याची मोड व १ लाख रुपये रोख असा समावेश होता. येथून सुमारे ३० कि.मी. अंतरावरील पिरळे चौकातील एकशिव रस्त्यावर चोरटय़ांनी तोडलेली मोकळी तिजोरी दिसून आली. पोलिसांनी मात्र दिवसभरात पंचनामे करण्यापलिकडे कसलाही तपास केल्याचे दिसले नाही.

बँकांनी नैतिकतेपेक्षा व्यावसायिक कौशल्य जोपासण्याची गरज- तोष्णीवाल
सोलापूर, २ जुलै/प्रतिनिधी
आर्थिक क्षेत्रात झपाटय़ाने होत असलेले बदल लक्षात घेऊन नागरी बँका व पतसंस्थांनी नैतिक अधिष्ठानापेक्षा व्यावसायिक कौशल्य आत्मसात करण्यावर भर द्यावा, अशी अपेक्षा सहकार विभागाचे सहनिबंधक डॉ. किशोर तोष्णीवाल (पुणे ) यांनी व्यक्त केली. येथील विद्यानंद सहकारी बँकेच्या बाराव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कृतज्ञता अभिव्यक्ती सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी उपमहापौर राजेंद्र कलंत्री, पणन उपसंचालक श्रीकांत मोरे, जिल्हा उपनिबंधक अशोक भांडवलकर, ज्येष्ठ वकील विजय मराठे आदी उपस्थित होते. बँकेचे अध्यक्ष शरदचंद्र गांधी यांनी स्वागत व प्रश्नस्ताविक केले. यावेळी श्रीकांत मोरे, अ‍ॅड. विजय मराठे आदींची भाषणे झाली. समारंभाचे सूत्रसंचालन सरोजिनी नादरगी व रेखा बोर्दांडे यांनी केले.

स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी सोलापुरात मार्गदर्शन केंद्र
सोलापूर, २ जुलै/प्रतिनिधी
केंद्रीय लोकसेवा आयोग व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी सोलापुरात जेआयआयटी करीअर मॅनेजमेंटतर्फे मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात येत असून या केंद्राचा शुभारंभ येत्या ५ जुलै रोजी सकाळी १० वाजता विजापूर रस्त्यावरील सैफुल चौकाजवळ सूर्या कॉम्प्लेक्समध्ये होणार आहे. नुकतीच केंद्रीय लोकसेवा आयोगाची आयएएस परीक्षा उत्तीर्ण झालेल्या बालाजी मुळे यांच्या हस्ते या मार्गदर्शन केंद्राचा शुभारंभ होत असून अध्यक्षस्थानी सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बाबासाहेब बंडगर हे भूषविणार आहेत. याबाबतची माहिती संस्थेचे प्रमुख प्रकाश साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत सांगितली. गेल्या तीन वर्षापासून या मार्गदर्शन केंद्रात पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण, इंग्रजी संभाषण कला, स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारीसाठी मार्गदर्शन केले जाते.

बाळासाहेब देसाई कारखान्याचा दोनशे रुपयांचा दुसरा हप्ता जमा
कराड, २ जुलै/वार्ताहर

लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने येत्या गळीत हंगामाच्या यशस्वीतेसाठी सुयोग्य नियोजन केले असून अडीच लाख मेट्रीक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. तरी कार्यक्षेत्रातील शेतक ऱ्यांनी आपला ऊस कारखान्याकडे पाठवून हंगाम यशस्वी करावा, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष डॉ. दिलीप चव्हाण यांनी केले.कारखान्याच्या मिल रोलर पूजनप्रसंगी ते बोलत होते. उपाध्यक्ष अ‍ॅड. बाळासाहेब जाधव, माजी अध्यक्ष ज्ञानदेव शिर्के, कार्यकारी संचालक व्ही. ए. देसाई यांच्यासह संचालक मंडळ व सभासदांची या वेळी उपस्थिती होती. डॉ. दिलीप चव्हाण पुढे म्हणाले की, कारखान्याने या वर्षी मेट्रीक टनास १२०० रुपये प्रमाणे पहिला हप्ता दिला असून २०० रुपयाप्रमाणे दुसरा हप्ता जिल्हा बँकेकडे वर्ग करण्यात आला आहे. येत्या गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी कारखान्याची यंत्रणा सज्ज झाली आहे. व्यवस्थापनाने सुयोग्य नियोजन केले आहे. तरी ऊस उत्पादक शेतक ऱ्यांनी आपल्याच कारखान्याला ऊस घालून सहकार्य करावे.