Leading International Marathi News Daily
शनिवार, ४ जुलै २००९
  वाडा पडला..
पण आठवणी ताज्या, टवटवीतच!
  सीआरझेड कायदा पूर्ण की अपूर्ण?
  सहकारी गृहनिर्माण संस्था
उपविधींमधील खाचखळगे
  गृहनिर्माण संस्था आणि गुन्हे
  न्यायालयीन निवाडा
मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय
ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळाले नसले तरी पाणीपुरवठा बंद करता येणार नाही
  घर कौलारू
दोन महापूरही पचविलेले‘पारपुंड’चे पाध्ये-गुर्जरांचं घर
  वास्तुरंग
  मेलबॉक्स
  वरदान विजेचे.. १
वीजेचा वापर.. पण जरा जपून

 

वरदान विजेचे.. १वीजेचा वापर.. पण जरा जपून
विद्युत ऊर्जेचा शोध हा मानवासाठी वरदान खरा, पण त्याच वीजेच्या टंचाईमुळे निर्माण होणारे भारनियमन हा सध्याचा मोठा बिकट प्रश्न बनला आहे. वीजेचा अनावश्यक वापर, अयोग्य उपकरण, वीजेची चोरीे अशा अनेक बाबी या विद्युत पुरवठय़ाशी निगडिच आहे. आबालवृद्धांपर्यंत साध्या बटनाला होणारा स्पर्श तुमच्या जीवनात प्रकाश उजळवून टाकतो पण त्यासाठी गरज आहे ती वीजेचा वापर सावधपणे, प्रामाणिकपणे आणि दर्जेदार उपकरणे वापरून करण्याची. वीज साठविता येत नाही म्हणूनच ती वापरताना हात काहीसा आखडता घेतला तरी हरकत नाही.. अशा या वीजेबाबत माहिती देणारी एक मालिका वास्तुरंगच्या वाचकांसाठी खास देत आहोत.
इमारत व त्यातील आकर्षक फ्लॅट, सुंदर रंगांनी रंगवलेला, उंची फर्निचरनी सजवलेला, मात्र त्या सर्वात खऱ्या अर्थाने प्राण ओतत असतो तो म्हणजे ‘वीज प्रवाह’ किंवा ‘विद्युत प्रवाह’. विजेचा शोध हा मानवजातीसाठी वरदान आहे. विजेशिवाय जगणे म्हणजे जीवन असह्य़ व अशक्यच म्हटले तरी वावगे ठरणार नाही पण या वीज वापरण्यात, त्यात हलगर्जीपणा केल्यास

 

ते वरदानसुद्धा शाप ठरू शकते. विजेमुळे होणारे नुकसान म्हणजे जीवितहानी, वित्तहानी व मालमत्ताहानी व इतर कोणत्याही अपघातांपेक्षा खूपच अधिक नाशकारक, विध्वंसक ठरू शकतात. तर अशा वरदान व शाप ठरू पाहणाऱ्या या विजेविषयी..
वीजनिर्मितीनंतरचा प्रवास
वीजनिर्मिती केंद्रापासून पुढे मोठमोठय़ा पॉवरहाऊसमध्ये व तेथून हाय-टेन्शन वायरमधून वेगवेगळ्या क्षमतेच्या सबस्टेशनमध्ये वीज आणली जाते. सबस्टेशनमधून लहान-मोठय़ा ट्रॉन्सफॉर्मरमध्ये वीज विभागली जाते. एखाद्या रहिवासी व अन्य श्रेणीतील इमारतीच्या प्रकल्पातील ट्रान्सफॉर्मरमधून इमारतीच्या खाली असलेल्या मीटर रूममधील एचआरसी युनिटमध्ये विजेचा प्रवास तेथून पुढे बस बार (Bus Bar) मधून मीटपर्यंत सुरूच राहतो. मीटरमधून मेन सर्किट ब्रेकर बॉक्समध्ये व तेथून सरळ वर असलेल्या आपल्या फ्लॅटच्या मेन डिस्ट्रिब्यूशन बॉक्समध्ये वीज येत असते व त्या फ्लॅटच्या डिस्ट्रिब्यूशन बॉक्समधून फ्लॅटच्या प्रत्येक रूममध्ये म्हणजे हॉल, डायनिंग, किचन, बेडरूम्स, बाथरूम व एकंदरीत सर्वच भागामध्ये विजेचा संचार होत असल्याने जेव्हा आपण बटण दाबतो तेव्हा बल्ब वा टय़ूब लागलेली आपल्याला दिसत असते. टी.व्ही., फ्रिज, टेप सर्व काही बटण दाबताच चालू होतात व मनुष्याला सर्वच सोयीसुविधा याच विजेमुळे मिळत असतात. तर अशी ही वीज शेकडो किलोमीटरचा प्रवास करून आपल्या जीवनात रात्री असलेल्या अंधाराचा नाश तर करतेच पण दिवसासुद्धा, क्षणोक्षणी आपली साथ देत असते.
इमारतीची उंची, मजल्यांची, एकूण फ्लॅटची संख्या, फ्लॅटचा आकार व त्यातील इलेक्ट्रीक पॉइन्टची संख्या या सर्वावरती विजेच्या एकूण लोडचा व वापर होणारे ‘अँपियर’ ठरवले जाते. लिफ्ट, वॉटरपंप, फायरपंप, कॉमन इमारतीतील लाईटस्, पॅसेज-जिन्यातील दिवाबत्ती, गार्डन लाईटस् यासाठी लागणाऱ्या विजेचा हिशोबसुद्धा ठेवावा लागतो. व त्यानुसारच इमारतीला ट्रान्सफॉर्मरमधून विजेचा पुरवठा केला जातो. विजेच्या एकूण खर्चावरूनच इमारतींना सिंगल फेज किंवा थ्री फेज सप्लाय देण्यात येतो.
मीटररूम ते फ्लॅटपर्यंतचे मेन वायरिंग सिंगल फेज वायरिंग
लहान इमारती म्हणजे ४ ते ७ मजली यांमध्ये शक्यतो सिंगल फेज वापरला जातो. एक फेजची लाल (R) वायर २.५ चौ. मिमि. किंवा ४ चौ.मिमि. व काळी (Bl) वायर न्यूट्रल म्हणून वापरली जाते व हिरव्या (Green) रंगाची वायर ‘मेन अर्थिग’ म्हणून वापरली जाते. मीटर रूम मधून थेट फ्लॅटच्या मेन डिस्ट्रीब्युशन बॉक्सपर्यंत केल्या जाणाऱ्या वायरिंगला मेन वायरिंग म्हटले जाते व त्यानंतर फ्लॅटच्या सर्वच रूममधील इलेक्ट्रिक पॉइंटवर विजेच्या भाराची वर्गवारी केली जाते.
उदा. एक फेज (R) लाईट पॉइन्टस्, फॅन Red एसी, गीझर, फ्रिज
(B) Black न्यूट्रल
थ्री फेज वायरिंग
आठ मजल्यांपासून जास्त मजले असणाऱ्या इमारतींना ‘टॉवर’ म्हटले जाते. म्हणून आठ ते जास्तीत जास्त २५ मजल्यांपर्यंतच्या व त्याहीपेक्षा उंच असणाऱ्या इमारतींना थ्री फेज सप्लाय देण्यात येतो. मीटरमधून RYB-Black (Red- Yellow- Blue- Black याप्रमाणे तीन वायर या तीन फेजच्या व काळी वायर न्यूट्रल म्हणून वापरली जाते. यामध्ये ६ चौ.मिमि. किंवा १० चौ.मिमि. जाडीची वायर मेन वायरिंग म्हणून वापरली जाते व त्याच्याबरोबरच ४ चौ.मिमि. हिरवी (Green) वायर मेन अर्थिग म्हणून वापरली जाते. फ्लॅटच्या मोठय़ा एरियावर व त्यातील बेडरूम्स, किचन, टॉयलेट व हॉल-डायनिंग इ. प्रत्येकासाठी स्वतंत्र फेजवर विजेच्या भाराची वर्गवारी करण्यात येते. त्यासाठी २.५, १.५ व १.० चौ.मिमि. जाडीच्या वायरचा उपयोग केला जातो. मेन वायरिंग इमारतीच्या स्वतंत्र इलेक्ट्रिक डक्टमधून केली जात असते.
उदा. H पहिली फेज (R) Red- हॉल- डायनिंग लाईटस ए.सी., टी.व्ही., फॅन H दुसरी फेज (Y) Yellow- फ्रीज, ओव्हन, किचन, पॅसेज लाइटस्, फॅन. H तिसरी फेज (B) Blue- बेडरूम लाईटस्, फॅन, एसी, गिझर.H (B) Black- न्यूट्रल (Neutral)-
विजेचे मीटर
इलेक्ट्रिक मीटर हे दोन प्रकारचे वापरले जातात.
१) सिंगल फेज मीटर (Single Phase Meter) :- सिंगल फेज दोन वायर (1 Phase 2 wire)- असा हा मीटर ५ ते २० अॅम्पियर करन्ट क्षमतेचा असतो. या मीटरमधून एक फेज (R) व एक न्यूट्रल अशा दोन वायरमधून वीज प्रवाहाचे काम केले जाते. लहान इमारती तसेच लहान घरे, छोटय़ा आकाराचे फ्लॅटस् याकरिता शक्यतो सिंगल फेज मीटर वापरले जातात. त्यासाठी ५ किलोव्ॉटपेक्षा कमी लोड असले पाहिजे.
२) थ्री फेज मीटर (ळँ१ी ढँं२ी टी३ी१) :- थ्री फेज चार वायर (3 ढँं२ी 4 ६्र१ी) अशा स्वरूपाचा हा मीटर १० ते ४० अॅम्पियर करंट वाहून नेऊ शकतो. या मीटरमधून फइ हे तीन फेज व एक (इ) न्यूट्रल अशा चार वायर वापरल्या जातात.
आठ मजल्यांपासून ते २४-३० मजली उंच इमारतींसाठी अशा स्वरूपाचा मीटर वापरला जातो. उंच इमारतींसाठी जास्त वीज वापरावी लागत असल्याने त्या ठिकाणी थ्री फेज मीटर पुरविला जातो. त्यासाठी विजेचा लोड हा ५ किलोव्ॉटपेक्षा जास्त असणे जरूरी असते.
अर्थिग (Earthing)
घरातील दररोजच्या वापरातील अनेक उपकरणांना धातूचा पत्रा असतो. जर का त्या उपकरणात दोष असल्यास त्या धातूला व्होल्टेज येत असते व त्या पत्र्याला स्पर्श झाल्यास माणसाच्या शरीरातून वीजप्रवाह वाहू शकतो व शॉक लागून प्रसंगी मृत्यू ओढवू शकतो म्हणून असा धोका टाळण्यासाठी त्या उपकरणांच्या बाहेरील पत्र्याची तारेच्या सहाय्याने जमिनीशी जोडणी केली जाते. त्यालाच ‘अर्थिग’ असे म्हणतात. वीजगळती दोष निर्माण झाल्यास सर्किटमधील फ्यूज जळून वीजपुरवठा बंद होतो व परिणामी तो वीजप्रवाह अर्थिग वायरमधून गेल्याने मनुष्य सुरक्षित राहू शकतो.
अर्थिग करण्याची पद्धत : इमारतीच्या बाजूला व मीटररूमजवळच दोन ते तीन मीटर खोल व दोन मीटर बाय दोन मीटर रुंद खड्डा करून त्यामध्ये मधोमध एक फूट बाय एक फूट आकाराची तांब्याची अर्थिग प्लेटला दोन तांब्याच्या तारा नटबोल्टने जोडून जी.आय. पाईपमधून या तारा खड्डय़ाच्या बाहेर काढून जोडल्या जातात व वरील प्रत्येक फ्लॅटसाठी स्वतंत्र मेन अर्थिग वायर दिली जाते. अर्थिग प्लेटभोवती कोळसा व मीठ यांचे मिश्रण तीन पोती टाकून तो खड्डा विटा व मातीने बंद केला जातो. मातीतील ओलसरपणा कोळसा व मीठ शोषून घेत असल्याने अर्थिग प्लेटचा जमिनीशी संबंध चांगल्या प्रकारे राहू शकतो. त्या खड्डय़ाच्या बाजूला उन्हाळ्यात पाणी टाकता यावे यासाठी एक जी.आय. पाईप उभा केला जातो. त्यातून मिठाचे पाणी टाकल्यास माती ओलसर राहण्यास मदत होत असते परिणामी चांगली अर्थिग मिळते.
अर्थिगचा घरात प्रवेश : जमिनीपासून इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यांपर्यंत अर्थिग नेण्यासाठी इलेक्ट्रिक डक्ट (Electric Duct) मध्ये २०x३, २५x३, ५०x५, किंवा ५०x६ या जी.आय. पट्टीचा उपयोग केला जातो. व त्या त्या मजल्यांवरील प्रत्येक फ्लॅटसाठी त्या डक्टमधून ४ चौमिमी हिरव्या रंगाची वायर कनेक्ट करून फ्लॅटच्या आतील मेन डिस्ट्रीब्युशन बॉक्समध्ये अर्थिग पोहोचवली जाते व तेथून त्या फ्लॅटमधील प्रत्येक खोली साठी वापरली जाते. यामुळे पूर्ण इमारतच सुरक्षित होण्यास मदत होत असते.
अर्थिगचा वापर : प्रत्येक ५, १५ अॅम्पियर प्लग पॉइन्ट (Plug Point), एसी, टीव्ही, गिझर, हिटर, ओव्हन, टोस्टर, मिक्सर ग्राइंडर, ब्लेंडर, रोटी मेकर, कॉम्प्युटर, फ्रीज, डीश वॉशर, वॉशिंग मशीन, ड्रायर इ. साठी स्वतंत्ररित्या अर्थिग वापरणे सर्वात जास्त सुरक्षित होते. घरातील वायर लाइट पॉइन्टस् व फॅन पॉइन्टसाठी सुद्धा अर्थिग वायर दिल्यास घराची सुरक्षितता जास्त वाढू शकते. पण खर्च जास्त होत असल्याने त्याकडे सर्रास दुर्लक्ष केले जाते.
वरील सर्वच गोष्टीची जर का आपण व्यवस्थित काळजी घेतली तर भविष्यात होणारे वीज अपघात, हलगर्जीपणामुळे लागणाऱ्या आगीपासून आपण सर्वजण आपल्याबरोबर आपले संपूर्ण कुटुंब सुरक्षित ठेवू शकतो. मानवजातीसाठी असलेले हे वीज वरदान खऱ्या अर्थाने ठरवू शकतो.
सुधीर मुकणे
लेखक संपर्क- ९८२१३८६६१४