Leading International Marathi News Daily

रविवार, ५ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेची निदर्शने
औरंगाबाद, ४ जुलै/खास प्रतिनिधी

केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलमध्ये केलेली दरवाढ आणि महावितरणने प्रस्तावित वीज दरवाढ

 

केल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने औरंगाबाद जिल्ह्य़ात ११ ठिकाणी तीव्र निदर्शने करण्यात आली.
शहरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खासदार चंद्रकांत खैरे, माजी खासदार प्रदीप जयस्वाल आणि जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली.
केंद्र आणि राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. पेट्रोल, डिझेल आणि वीज दरवाढ रद्द झालीच पाहिजे, अशा घोषणा या वेळी देण्यात आला.
सर्वसामान्यांवरील अन्यायाकारक दरवाढीचा तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी संजीव जयस्वाल यांना निवेदन दिले.
निदर्शनामध्ये माजी महापौर व शहरप्रमुख विकास जैन, महिला आघाडी जिल्हा संघटक सुनीता आऊलवार, सभागृह नेता गजानन बारवाल, जयवंत ऊर्फ बंडू ओक, राजू वैद्य, लता दलाल, नंदकुमार घोडेले आदी नेते सहभागी झाले होते.