Leading International Marathi News Daily

रविवार, ५ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

सहाव्या वेतन आयोगात औषध निर्माता पदावर अन्याय
औरंगाबाद, ४ जुलै/खास प्रतिनिधी

सहाव्या वेतन आयोगात राज्यातील शासकीय-निमशासकीय आरोग्य सेवेत कार्यरत असलेल्या

 

औषधी निर्माता या पदास लागू करण्यात आलेली वेतनश्रेणी अन्यायकारक आहे याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संघटनेमार्फत आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय, प्रश्नथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, महानगरपालिकेचे दवाखाने आदी ठिकाणी औषध निर्माता संवर्गातील औषध निर्माता हे पद जनतेच्या आरोग्य सेवेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे. शासनाने सहावा वेतन आयोग लागू करताना औषधी निर्मात्यांवर अन्याय केला आहे, याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर काळ्या फिती लावून धरणे आंदोलन आणि सामूहिक रजा आंदोलन केले जाणार असल्याची माहिती औषध निर्माता संघटनेचे जिल्हाध्यक्ष पी. एम. इंगळे यांनी दिली.
सहाव्या वेतन आयोगात पदविकाधारकांसाठी ९,३००-३४,८०० ही वेतनश्रेणी लागू केली आहे. परंतु औषध निर्मितीतील तांत्रिक अभ्यासक्रम हा पदविका अभ्यासक्रम आहे. असे असूनसुद्धा औषध निर्माता संवर्गाला ५२००-२०,२०० ही चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची वेतनश्रेणी लागू केली आहे. यामुळे राज्यातील पाच हजार औषध निर्माता कर्मचाऱ्यांवर अन्याय निर्माण झाला आहे. वास्तविक फार्मसी पदविकाधारकाला ९,३००-३४,८०० ही वेतनश्रेणी लागू करणे आवश्यक आहे.
राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी लवकरच आंदोलन हाती घेतले जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या ५० प्रश्नथमिक आरोग्य केंद्राच्या औषध निर्मात्यांची बैठक ६ जुलैला सकाळी ११ वा. जिल्हा परिषदेत आयोजित करण्यात आली आहे.