Leading International Marathi News Daily

रविवार, ५ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

औरंगाबाद जिल्ह्य़ाच्या पाणलोटाच्या दहा अब्जाच्या आराखडय़ास मंजुरी
औरंगाबाद, ४ जुलै/खास प्रतिनिधी

औरंगाबाद जिल्हा पाणलोट विकास समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. या

 

बैठकीत पाणलोटाच्या दहा अब्ज रुपयांच्या आराखडय़ाला मंजुरी देण्यात आली आहे.
यामध्ये कृषी, सामाजिक वनीकरण, वनविभाग, लघु पाटबंधारे, भूजल सर्वेक्षण, सिंचन, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या १० अब्ज २ कोटी ३४ लाख रुपयांची कामे प्रस्तावित करण्यात आली आहे.
गेल्या दोन वर्षात राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत १७०४ शेतकऱ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. त्यावर ८ कोटी ३६ लाख रुपये खर्च झाल्याची माहिती जिल्हाधिकारी संजीव जयस्वाल यांनी दिली.
मराठवाडा पाणलोट विकास मिशन अंतर्गत औरंगाबाद तालुक्यातील २१ गावांमध्ये पावणेदहा कोटी रुपयांची कम्पार्टमेंट बंडिंग, मातीनाला बांध, सिमेंट बंधारे, हॅड्रो फॅक्चरिंग, सीसीटी आदी कामे झाली आहेत.
या कामाचे परिणाम पुढील वर्षीपासून दिसणार आहेत, असे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी या बैठकीत सांगितले.
या बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी डी. एम. मुगळीकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डी. आय. गायकवाड, जिल्हा उपनिबंधक अनिल दापशेडे आदी उपस्थित होते.