Leading International Marathi News Daily

रविवार, ५ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

सेतू सुविधा केंद्रचालकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
हिंगोली, ४ जुलै/वार्ताहर

औंढा नागनाथ तहसील कार्यालयांतर्गत सेतु सुविधा केंद्रचालकाविरुद्ध संगणकातील अभिलेख्यात

 

फेरबदल करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी औंढा नागनाथ पोलिसात मारोती शिंदे यांच्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून आरोपींना अद्यापि अटक नाही. पोलीस निरीक्षक गिरी पुढील तपास करीत आहेत.
पोलीस सूत्रांनुसार, औंढा नागनाथ सेतु सुविधा केंद्रचालक पृथ्वीराज अशोक पाईकराव (रा. कंजारा) व नारायण कुमाजे कुटे या दोघांनी संगनमत करून सेतु सुविधा केंद्रातील संगणकातील तलाठी सजा साळणा येथील फेरक्रमांक ७०३ वरील कर्जबोजा अभिलेखामध्ये फेरबदल करून कर्जबोजा सुमारे २० हजार रुपये कमी करून शासनाची फसवणूक केली असल्याची तक्रार तहसील कार्यालयातील कनिष्ठ लिपिक मारोती शिंदे यानी ४ जुलेला दिलेल्या तक्रारीवरून दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा २ जुलैला घडल्याचे उघड झाले आहे.