Leading International Marathi News Daily

रविवार, ५ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

गोविंदराव राठोड यांची विधानसभेसाठी तयारी सुरू
नांदेड, ४ जुलै/वार्ताहर

खासदार भास्करराव पाटील-खतगावकर व माजी आमदार अविनाश घाटे यांच्या सत्काराचे

 

आयोजन करून काँग्रेसचे गोविंदराव राठोड यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे मानले जाते.
खासदार भास्करराव पाटील-खतगावकर व वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माजी आमदार अविनाश घाटे यांचा उद्या (रविवारी) मुखेड तालुक्यातल्या वसंतनगर येथे जाहीर सत्कार आयोजित करण्यात आला आहे. विमुक्त जाती सेवा समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या सत्कार सोहळ्याला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम, जि. प. अध्यक्षा वैशाली चव्हाण, सभापती उदय पाटील-राजूरकर, उद्धवराव पाटील-कौडगावकर, डॉ. सुरेश किनीकर आदींची उपस्थिती राहणार आहे.
मुखेड विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव होता. पुनर्रचनेत हा मतदारसंघ खुला झाला. येथून निवडणूक लढविण्यास अनेकजण इच्छुक आहेत. त्यापैकी हनमंत पाटील-बेटमोगरेकर, गोविंद राठोड व स्वप्नील चव्हाण हे तिघेजण काँग्रेसतर्फे उमेदवारी मिळविण्यासाठी मोर्चेबांघणी करीत आहेत. राठोड यांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. आज खतगावकर व घाटे यांच्या सत्काराचे आयोजन म्हणजे निवडणुकीच्या तयारीचाच एक भाग आहे, असे मानले जाते.