Leading International Marathi News Daily

रविवार, ५ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

‘पक्ष कार्यकर्ते संघटनेपासून दुरावत चालल्याची तक्रार ’
सिल्लोड, ४ जुलै/वार्ताहर

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये रमत नसल्यामुळे पक्ष कार्यकर्ते

 

संघटनेपासून दूर चालल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी २ जुलैला झालेल्या पक्षाच्या बैठकीत केला. औरंगाबाद जिल्हा निरीक्षक हरिश्चंद्र लघाने पाटील यांची बैठकीत प्रमुख उपस्थिती होती.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सदस्य नोंदणी अभियान राबविण्यासंदर्भात सिल्लोड तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस माजी जिल्हा परिषद अध्यक्ष द्वारकादास पाथ्रीकर, शिवाजी बनकर, माजी नगराध्यक्ष बनेखाँ पठाण, भाऊराव लोखंडे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. प्रश्नरंभी तालुका अध्यक्ष श्रीरंग पाटील साळवे यांनी प्रश्नस्ताविक केले. त्यानंतर सदस्य नोंदणी अभियानासासंदर्भात सूचना व मनोगत व्यक्त करताना कार्यकर्त्यांनी पक्ष निरीक्षकांसमोर ज्येष्ठ नेते मंडळी व पदाधिकारी सामान्य कार्यकर्त्यांमध्ये मिसळत नाहीत. पक्षाच्या बैठकीस उपस्थित राहत नसल्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात पडत असल्याचे सांगितले तर नगर परिषद निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात निवडणुका लढविणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर अद्याप कारवाई झाली नाही. अशा मंडळींवर त्वरित कारवाई करण्याची मागणीही या वेळी करण्यात आली.