Leading International Marathi News Daily

रविवार, ५ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

डॉ. विठ्ठल लहाने यांचा सत्कार
लातूर, ४ जुलै/वार्ताहर

दुभंगलेले ओठ व टाळूवर तीन हजार मोफत शस्त्रक्रिया पूर्ण केल्याबद्दल ‘डॉक्टर्स डे' निमित्त

 

एम. डी. प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. विठ्ठल लहाने यांचा माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
भालचंद्र रक्तपेढी सभागृहात या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी डॉ. अमरनाथ सोलपुरे होते. याप्रसंगी माजी प्रश्नचार्य अनिरुद्ध जाधव उपस्थित होते. डॉ. पाटील म्हणाले, सध्याच्या जमान्यात डॉक्टरांची प्रतिमा डळमळीत होत आहे. सर्वाधिक अज्ञान वैद्यकीय क्षेत्रात आहे. डॉ. विठ्ठल लहाने यांनी समाजातील दु:ख जाणून घेऊन गरजूंना मोफत सेवा प्रदान करण्याचे पवित्र कार्य हाती घेतले आहे.
डॉ. सोलपुरे म्हणाले, वैद्यकीय क्षेत्रात डॉ. लहाने यांनी आपल्या कार्यातून एक वेगळा ठसा निर्माण केला आहे.
डॉ. विठ्ठल लहाने यांनी, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीनेच मला घडविले आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत लातुरात सेवेचा प्रश्नरंभ केला. जे मी प्रश्नप्त केले ती सर्व रुग्णांची किमया आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. याप्रसंगी चार्टर्ड अकाऊन्टन्ट पी. एस. काबरा, बजरंग भुतडा, अरविंद औरादे, आर. के. देशमुख, हरिभाऊ जवळगे, इंदुमती सावंत आदी उपस्थित होते.