Leading International Marathi News Daily

रविवार, ५ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

सिडकोची थकबाकी वसुली मोहीम गतिमान
औरंगाबाद, ४ जुलै/खास प्रतिनिधी

सिडकोच्या मालमत्तेवरील मासिक हप्ते व सेवाशुल्क आकारावरील थकबाकी रक्कम वसूल

 

करण्यासाठी सिडको प्रशासनाने मोहीम सुरू केली आहे.
सिडकोच्या प्रशासक मनीषा जायभाय यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत नोटीस दिली जात आहे. मासिक हप्ते व सेवाशुल्कावरील थकबाकी तातडीने भरावी, असे आवाहन सिडकोचे मुख्य प्रशासक मनोहर भगत यांनी केले आहे.
सिडको प्रशासनाने विविध उत्पन्न गटातील लोकांसाठी १३ विविध गृहनिर्माण योजना राबविल्या आहेत. भूखंडाचे वाटपही झाले आहे. काही मालमत्तांवर मासिक हप्ते, सेवाशुल्काची मोठी रक्कम थकीत आहे. थकबाकी वसुलीसाठी सिडको प्रशासनाने अधिकाऱ्यांचे पथक तयार केले आहे. हे पथक थकबाकीदारांच्या घरी जाऊन वसुली करणार आहे.
थकबाकी रकमेचा भरणा न केलेल्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा आणि घर तसेच भूखंड जप्त करण्याचा निर्णय सिडको प्रशासनाने घेतला आहे.