Leading International Marathi News Daily

रविवार, ५ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

ग्रामरोजगार सेवकांचा आयुक्त कार्यालयावर मोर्चा
परभणी, ४ जुलै/वार्ताहर

ग्रामीण जनतेला मागेल त्याला काम पुरवण्यासाठी हजारो कोटींचा निधी केंद्र शासनाने राज्य

 

सरकारला उपलब्ध करून दिला आहे. तथापी महाराष्ट्र सरकारने रोजगार हमी योजना व ग्रामरोजगार सेवकांची प्रचंड उपेक्षा चालविली आहे. गेल्या २ ते ३ वर्षापासून महाराष्ट्रातील २१ हजार ग्रामरोजगार सेवकांना एक पैसाही वेतन देण्यात आलेला नाही. एवढेच नाही तर अनेक जिल्ह्य़ांत ग्रामरोजगार सेवकांना नेमणूकपत्रेही देण्यात आलेली नाहीत. या शासनाच्या जनताविरोधी धोरणाविरुद्ध महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक संघटना व सिटू प्रणीत संघटनेने आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून १४ जुलैला औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयावर मराठवाडाव्यापी मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संघटनेचे सरचिटणीस राजन क्षीरसागर यांनी दिली.
या मोर्चाचे नेतृत्व सीटूचे सरचिटणीस डॉ. डी. एल. कराड, अ. भा. शेतमजूर युनियनचे कुमार शिराळकर, सरचिटणीस राजन क्षीरसागर, प्रकाश चौधरी, उद्धव भवलकर, प्रश्न. बाबासाहेब सरवदे आदी करणार आहेत. तरी यात ग्रामरोजगार सेवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.