Leading International Marathi News Daily

रविवार, ५ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

राष्ट्रवादी काँग्रेसचे आज औरंगाबादमध्ये विभागीय शिबिर
औरंगाबाद, ४ जुलै/खास प्रतिनिधी

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी मराठवाडय़ातील आठही जिल्ह्य़ांतील राष्ट्रवादी

 

काँग्रेस पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांचे विभागीय शिबिर येथील सिडको नाटय़गृहात उद्या (रविवारी) आयोजित करण्यात आले आहे.
ही माहिती राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत वाणी यांनी दिली. हे शिबिर दिवसभर चालणार आहे. या शिबिराचे उद्घाटन रविवारी सकाळी ९ वाजता प्रदेशाध्यक्ष आर. आर. पाटील यांच्या हस्ते होणार आहे. उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, जलसंपदामंत्री अजित पवार, गृहमंत्री जयंत पाटील, अर्थमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील, खासदार सुप्रिया सुळे, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे, माजी प्रदेशाध्यक्ष अरुणभाई गुजराती आदी नेते या शिबिरात मार्गदर्शन करणार आहेत.
मराठवाडय़ातील सर्व आजी-माजी मंत्री, आमदार, खासदार, स्थानिक स्वराज्य संस्था, सहकार आणि शिक्षण क्षेत्रातील सर्व सदस्य व पदाधिकारी या शिबिराला उपस्थित राहणार आहेत, असे औरंगाबादचे जिल्हाध्यक्ष प्रश्न. किशोर पाटील यांनी सांगितले.
राज्यभरात सात शिबिरांचे आयोजन केले जात आहे. त्यातील पहिले शिबिर पुणे येथे २८ जूनला झाले. औरंगाबादमध्ये रविवारी होणारे दुसरे शिबिर आहे. यानंतर कोपरगाव (१२ जुलै), अकोला (१९ जुलै), नागपूर (२६ जुलै), ठाणे (३० जुलै) आणि रत्नागिरी (२ ऑगस्ट) अशी एकूण ५ शिबिरे होणार आहेत, असे शिबिर संयोजक वसंत वाणी यांनी सांगितले. आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपूर्ण ताकदीने उतरणार आहे.
पुरोगामी मतांचे विभाजन टाळावे हा राष्ट्रवादीचा प्रश्नमाणिक हेतू आहे, असे वसंत वाणी यांनी सांगितले. धर्मनिरपेक्ष व पुरोगामी मतांचे विभाजन होऊन अन्य धर्माध शक्तींना फायदा होऊ नये या प्रश्नमाणिक हेतूनेच काँग्रेस पक्षासमवेत आघाडी करण्याचा आमचा निर्णय आहे.
काँग्रेसने आमचा सन्मान राखावा ही भावना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची आहे. आमचा सन्मान राखला गेला नाही तर २८८ मतदारसंघांत लढण्याची राष्ट्रवादीची तयारी आहे, असा संदेशही या शिबिरातून दिला जाणार आहे, असे वाणी यांनी सांगितले.