Leading International Marathi News Daily

रविवार, ५ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

मानसीच्या मारेक ऱ्यांना आणखी दोन दिवसांची पोलीस कोठडी
औरंगाबाद, ४ जुलै/खास प्रतिनिधी

मानसी देशपांडेच्या हत्याप्रकरणातील मारेकरी जावेद खान ऊर्फ टिंगऱ्या, प्रदीप चंडालिया, राम

 

बोडखे या तिघांना आणखी दोन दिवस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम. एस. बडे यांनी दिले आहे.
मानसी देशपांडेची हत्या १२ जूनला झाली होती. तब्बल दहा दिवसांच्या तपासानंतर औरंगाबाद पोलिसांनी मुख्य आरोपी जावेद खानला अटक केली. तिच्या हत्येमध्ये कट रचणाऱ्या प्रदीप चंडालिया व राम बोडखे यांनाही पोलिसांनी अटक केली. शनिवारी या तिन्ही आरोपींना न्यायालयासमोर उभे करण्यात आले. शनिवारी त्यांची १४ दिवसांची पोलीस कोठडी संपणार होती.
रासायनिक प्रयोगशाळेचा अहवाल नजीकच्या काळात येण्याची शक्यता आहे. या अहवालामध्ये मानसीवर जावेद खानने संभोग केला होता की नाही हे स्पष्ट होणार आहे. तसेच दुसरा आरोपी राम बोडखे याच्याकडून मोबाईल जप्त करायचा आहे. तपासात प्रगती असली तरी अजून या गुन्ह्य़ाचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीचे आणखी काही साथीदार आहेत का, याबाबतही तपास करायचा आहे, असे सहायक सरकारी वकील सय्यद जावेद काझी यांनी न्यायालयात सांगितले. न्यायालयाने या तिन्ही आरोपींची पोलीस कोठडी ६ जुलैपर्यंत वाढविण्याचे आदेश दिले आहेत.